शिरुर तालुक्यातील माजी सैनिकांची आरोग्य तपासणी

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथील मेसाई माता मंदिरामध्ये सुभाषचंद्र बोस यांच्या १२६ व्या जयंतीच्या निमित्ताने नुकतीच माजी सैनिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून यावेळी माजी सैनिकांनी उस्फुर्त प्रतिसाद नोंदविला असल्याची माहिती स्पंदन वैद्यकीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष डॉ. शरद लांडगे यांनी दिली आहे.

कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथील मेसाई माता मंदिरामध्ये सुभाषचंद्र बोस यांच्या १२६ व्या जयंती व माजी सैनिक संघटनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने माजी गृह मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत स्पंदन वैद्यकीय सामाजिक संस्था व आयमॅक्स हॉस्पिटल वाघोली यांच्या वतीने माजी सैनिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

सदर उपक्रमासाठी आयमॅक्स हॉस्पिटलचे संचालक डॉ. संदीप कांबळे, स्पंदन वैद्यकीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष डॉ. शरद लांडगे, डॉ. नवीन काळे, डॉ. गणेश भोसले, डॉ. बाबाजी लंघे, डॉ. शीतल कावरे, डॉ. अक्षय चोरे, डॉ. स्वप्नील पवार यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी या आरोग्य शिबिरासाठी सर्व माजी सैनिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला असून तब्बल १५३ माजी सैनिकांची आरोग्य तपासणी यावेळी करण्यात आली.

दरम्यान माजी सैनिक संघटनेचे शिरुर तालुकाध्यक्ष संभाजी धुमाळ व कार्याध्यक्ष सुरेश उमाप यांच्या हस्ते सर्व डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला. टीमचा सत्कार करण्यात आला. तर शिक्रापूरचे सरपंच रमेश गडदे यांनी सदर ठिकाणी भेट देत स्पंदन वैद्यकीय सामाजिक संस्था व आयमॅक्स हॉस्पिटल वाघोली यांच्या उपक्रमाचे कौतुक केले.