रामलिंग महिला उन्नतीच्या वतीने जिजाऊ तसेच स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी

शिरूर तालुका

शिरुर (किरण पिंगळे-शेलार) रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्था ही नावासाठी काम करत नाही. तर आम्ही समाजाचे काहीतरी देणे लागतो यासाठी काम करत आहोत. आम्हीपण रामलिंग येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण घेतले असून शाळेतील या मुलांना कोणतीही मदत लागली तर आम्ही निश्चितच ती करु विद्यार्थ्यांनी राष्ट्रमाता जिजाऊ तसेच स्वामी विवेकानंद जयंती साजरी करतानाच त्यांचा एक तरी गुण अंगीकारला पाहिजे असे मत शिरुर ग्रामीण विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक शरद पवार यांनी व्यक्त केले.

 

रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने (दि 12) जानेवारी रोजी राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ तसेच स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाची सुरवात राष्ट्रमाता जिजाऊ तसेच स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करुन करण्यात आली. यावेळी वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली शाळेतील विद्यार्थ्यांनी भाषणातून राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांचा जीवनपट उलगडन्याचा प्रयत्न केला. वक्तृत्व स्पर्धेत चांगली भाषणे करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला.

 

यानंतर रामलिंग महिला उन्नती सामाजिक संस्थेच्या वतीने दरवर्षी जिजाऊ जयंती निमित्त देण्यात येणारा जिजाऊ पुरस्कार शिरुर ग्रामीणचे उपसरपंच बाबाजी वर्पे यांच्या मातोश्री मंजुळा वर्पे यांना देण्यात आला. तर स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त आदर्श युवक पुरस्कार शिरुर विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक तसेच उद्योजक शरद सोपान पवार यांना देण्यात आला.

 

यावेळी रामलिंग महिला उन्नती सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डीले, शिरुर ग्रामीणचे माजी सरपंच तुषार दसगुडे, माजी उपसरपंच रमेश चव्हाण, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माऊली रेपाळे, उपाध्यक्ष प्रल्हाद पवार, यशस्विनी वेलफेअर फाऊंडेशनच्या नम्रता गवारी, शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या राधा रेपाळे, निकिता देव्हाडे, ललिता साबळे, दगडे तसेच शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका मांजरे तसेच सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणीताई कर्डिले तर आभार शाळेचे शिक्षक डी बी वाघमारे सर यांनी मानले.