तळेगाव ढमढेरेत विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला जीवदान

शिरूर तालुका

निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची कामगिरी

शिक्रापूर: तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील एका खोल विहिरीमध्ये पडलेल्या कोल्ह्याला जीवदान देत निसर्गाच्या सानिध्यात निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना यश आले आहे.

तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील सुनील देंडगे यांच्या विहिरीमध्ये एक कोल्हा पडल्याची माहिती प्राणीमित्र प्रविणकुमार जगताप व डॉ. चंद्रकांत केदारी यांनी निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शेरखान शेख यांना दिली. त्यानंतर शेरखान शेख, अमोल कुसाळकर, पूजा बांगर, शुभम माने, विक्रम ठाकूर यांनी सदर ठिकाणी धाव घेत पाहणी केली असता विहिरीमध्ये कोल्हा असल्याचे दिसले.

दरम्यान शेरखान शेख व अमोल कुसाळकर यांनी विहिरीमध्ये उतरुन कोल्ह्याला शिताफीने पकडून विहिरीतून बाहेर काढले. यावेळी शुभम देंडगे, विकास देंडगे, नंदकुमार जाधव, महेंद्र देंडगे, सुरेश ढमढेरे, प्रथमेश जोशी, महादेव पंडित यांसह आदी उपस्थित होते.

दरम्यान विहिरीतून बाहेर काढलेल्या कोल्ह्याची माहिती शिरुर वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर वनपरीमंडळ अधिकारी गौरी हिंगणे यांना देत नियतक्षेत्र अधिकारी प्रमोद पाटील यांच्या उपस्थितीत कोल्ह्याला निसर्गाच्या सानिध्यात मुक्त करण्यात आले.