कवठे येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार 

शिरूर तालुका

शिरूर (अरुणकुमार मोटे): अष्टविनायक महामार्गावरील कवठे येमाई येथील घोडे वस्ती नजीक वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यूमुखी पडल्याची घटना घडली. ही घटना रविवारी (ता. १२) रात्री च्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच शिरूर वनपरीक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल नितीन म्हात्रे, वन कर्मचारी नारायण राठोड, वन मजूर हनुमंत कारकुड घटनास्थळी दाखल झाले. रेस्क्यू टीम च्या मदतीने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी मृत बिबट्याला शिरूर येथे शवविच्छेदनासाठी नेण्यात आले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अष्टविनायक मार्गावर कवठे येमाई येथील घोडेवस्ती येथे विष्णु भाईक यांच्या शेतानजीक रस्ताओलांडताना बिबट्याला वाहनाची जोरदार धडक बसली. या धडकेत बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. या धडकेत बिबट्याला नव्वद फूट वाहनाने फरपटत नेले. हा बिबट्या नर असून अंदाजे चार वर्षाचा असून या मृत बिबट्यावर शिरूर येथे शवविच्छेदन करण्यात येणार असल्याचे शिरूर चे वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांनी सांगितले. कवठे आणि परिसरात अजूनही बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने पिंजर्याची संख्या वाढवण्यात यावी अशी नागरिकांमधून मागणी होत आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत