शिरूर तालुक्यात भरधाव मोटारसायकलची धडकेत महिला गंभीर जखमी, चालक फरार

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील सरदवाडी गावच्या हद्दीत सावी हॉटेलसमोर रस्त्यावर रिक्षाची वाट पाहत उभ्या असलेल्या महिलांवर काळ्या रंगाच्या भरधाव मोटारसायकलने जोरदार धडक दिल्याने एक महिला गंभीर जखमी झाली आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात अज्ञात मोटारसायकल चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ जुलै २०२५ रोजी रात्री ०९:४५ वाजता सदरवाडी […]

अधिक वाचा..

ट्रेलरच्या धडकेत कामगाराचा मृत्यू…

चाकण: चाकण तळेगाव मार्गावर खालुंब्रे, ता. खेड गावच्या हद्दीत आज सकाळी साडेसहाच्या सुमारास कंपनीत कामासाठी निघालेल्या दुचाकीवरील कामगाराचा ट्रेलरच्या धडकेत चाकाखाली गेल्याने जागीच मृत्यू झाला. गजानन बाबुराव बोलकेकर (वय- २७), रा. येलवाडी, ता. खेड, जि. पुणे) असे अपघातात मृत्यू पावलेल्या कामगाराचे नाव आहे. त्याच्या शरीराचा अक्षरक्ष: चेंदामेंदा झाला होता. दुचाकी चालक जखमी असून त्याच्यावर चाकण […]

अधिक वाचा..

करडे-न्हावरे रस्त्यावर भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत वडिलांचा मृत्यू, चालक फरार

शिंदोडी (तेजस फडके) करडे-न्हावरे रस्त्यावर दि ८ जून २०२५ रोजी सायंकाळी ७:३० च्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात बाळासाहेब रंगनाथ थोरात (वय५३, रा. निमोणे, ता. शिरुर, जि.पुणे) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असुन अपघातानंतर संबंधित वाहनाचा चालक घटनास्थळावरुन वाहनासह फरार झाला असुन या प्रकरणी अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी बाळासाहेब थोरात यांचा मुलगा शुभम […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात भरधाव कंटेनर ट्रकच्या धडकेत तिघांचा मृत्यू, एक जखमी

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील न्हावरे येथे भरधाव कंटेनर ट्रकच्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून, एक महिला गंभीर जखमी झाली आहे. हा अपघात 23 मार्च 2025 रोजी रात्री 7.30 वाजता तळेगाव ढमढेरे-न्हावरे रस्त्यावर संदीप महादेव सरके यांच्या घरासमोर घडला. अपघाताची सविस्तर हकीकत, मृत कैलास कृष्णाजी गायकवाड (49) हे त्यांच्या ताब्यातील पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कार […]

अधिक वाचा..

टेंपो व मोटार सायकलच्या धडकेत १ जण मृत्युमुखी, तर २ जण जखमी

शिरूर दि. १२ ( अरुणकुमार मोटे): शिरसगाव काटा, (ता. शिरूर) येथे मोटार सायकलला टेंम्पोने दिलेल्या धडकेत एक जण मृत्युमुखी पडला. तर दोन जण जखमी झाले आहेत. करणसिंग ग्यारसिंग जमरे (वय ४९ वर्ष ) रा. जरखडीया, जहूर, चितवल, बडवाणी जि. राजपुर, राज्य मध्य प्रदेश असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव असून टिकम जमरे व गेंदालाल जमरे हे दोघे […]

अधिक वाचा..

शिरुर-तांदळी रस्त्यावर गुनाटजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर-तांदळी रस्त्यावर गुनाट गावच्या हद्दित मंगळवार (दि २७) रोजी पहाटे अज्ञात वाहनाच्या धडकेत एक बिबट्या जागीच ठार झाला. सकाळी ही घटना समजल्यानंतर ग्रामस्थांनी शिरुर वनविभागाला याबाबत माहिती दिली. गुनाट-निर्वी गावच्या शिवेजवळ फंड वस्तीनजीक पहाटे अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत पावल्याचे समजल्यानंतर मंगळवार (दि २७ ) सकाळी ग्रामस्थांनी याठिकाणी बिबट्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी […]

अधिक वाचा..

मांडवगण फराटा येथे टेम्पो व दुचाकीच्या धडकेत पंधरा वर्षीय विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू…

मांडवगण फराटा (संपत कारकुड) शिरुर तालुक्याच्या पुर्वभागातील मांडवगण फराटा गावापासुन दिड किमी अंतरावर असलेल्या कोळपेवस्ती येथे मालवाहतूक करणारा टेम्पो आणि दुचाकीच्या धडकेत नववीत शिकणाऱ्या श्रावणी देविदास थोरात (वय १५) हिचा जागीच मृत्यू झाला आहे. आज (दि ९) रोजी शाळा सुटल्यानंतर ४:३० ते ४:४५ दरम्यान घरी जाताना भरधाव टेंपोने या शाळकरी मुलीचा बळी घेतला आहे. तिच्या […]

अधिक वाचा..

पुणे नगर रोडवर दारुच्या नशेत भरधाव वेगाने आलेल्या कारच्या धडकेत दोघांचा मृत्यू…

शिरुर (अरुणकुमार मोटे): पुणे -नगर रोडवर विजय बाळासाहेब रानवडे रा जि. प. शाळेजवळ नांदे, पो.लवळे ता. मुळशी याने त्याच्या ताब्यातील टाटा झेस्ट कंपणीची कार दारू पिवून भरधाव वेगाने चालवून पुढे चालणाऱ्या टुव्हीलरला पाठीमागून जोरदार धडक देवून टुव्हीलरवरील निलेश हैबती विटे, शिवाजी अरून जवळगे (रा. प्रितम प्रकाशनगर, शिरूर) यांच्या डोक्याला, हाताला, पायाला लहान मोठया गंभीर दुखापती […]

अधिक वाचा..

खैरेनगर मध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार तर एक गंभीर

शिक्रापूर (शेरखान शेख): खैरेनगर (ता. शिरुर) येथील रस्त्यावर अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक बसून मनोज पांडुरंग मोरे या युवकाचा जागीच मृत्यू होऊन अक्षय मोहन बोराडे हा गंभीर जखमी झाला असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात वाहन चालकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. खैरेनगर (ता. शिरुर) येथून अक्षय बोराडे व त्याचा मित्र मनोज मोरे हे दोघे २४ […]

अधिक वाचा..

शिक्रापूर चाकण रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत युवकाचा मृत्यू

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील शिक्रापूर चाकण रस्त्यालगत हॉटेल पुर्णब्रम्ह वडापाव सेंटरचे समोर महिंद्रा सुप्रो कारला अज्ञात वाहनाची धडक बसून झालेल्या अपघातात साजिद मुनावर पठाण या युवकाचा मृत्यू झाला असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील शिक्रापूर चाकण रस्त्याने साजिद पठाण हा युवक […]

अधिक वाचा..