शिरुर तालुक्यातील त्या ग्रामपंचायत मध्ये रंगतोय अपात्रतेचा खेळ

मुख्य बातम्या शिरूर तालुका

खैरेवाडीच्या दोन ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा दणका

शिक्रापूर (शेरखान शेख): खैरेवाडी (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायतचे उपसरपंच नंदकिशोर गोडसे व ग्रामपंचायत सदस्य मुरलीधर मांदळे या दोघांना जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांनी अपात्र ठरवलेले असताना आता त्याच ग्रामपंचायतच्या वैशाली शहाजी खैरे व जिजाबाई सतीश खैरे या दोघा ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी अतिक्रमणचे कारण देत अपात्र ठरवले असल्याने शिरुर तालुक्यात खळबळ उडाली आहे.

खैरेवाडी (ता. शिरुर) ग्रामपंचायतचे उपसरपंच नंदकिशोर गोडसे व ग्रामपंचायत सदस्य मुरलीधर मांदळे या दोघांनी शासकीय जागेमध्ये अतिक्रमण असल्याबाबतची तक्रार सामाजिक कार्यकर्ते वैभव मुरलीधर देशमुख यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली असता जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी उपसरपंच नंदकिशोर काळूराम गोडसे व ग्रामपंचायत सदस्य मुरलीधर प्रभू मांदळे यांनी दोघांची पदे अपात्र ठरवले होते. त्यांनतर विभागीय आयुक्तांकडे अपील केले असता विभागीय आयुक्तांनी देखील जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश कायम ठेवत उपसरपंच नंदकिशोर काळूराम गोडसे व ग्रामपंचायत सदस्य मुरलीधर प्रभू मांदळे या दोघांचे देखील पद अपात्र ठरवले आहे.

मात्र दोघांवर अपात्रतेची कारवाई सुरु असताना उपसरपंच नंदकिशोर काळूराम गोडसे व ग्रामपंचायत सदस्य मुरलीधर प्रभू मांदळे यांनी ग्रामपंचायत सदस्या वैशाली शहाजी खैरे, जिजाबाई सतीश खैरे व रोहिणी प्रल्हाद खैरे या तिघांनी शासकीय जागेत अतिक्रमण केल्याबाबतची तक्रार जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडे केली.

त्यानंतर त्याबाबत चौकशी होत असताना ॲड. शिवशंकर हिल्लाळ यांनी उपसरपंच नंदकिशोर गोडसे व मुरलीधर मांदळे यांच्या वतीने बाजू मांडली असताना जिल्हाधिकारी यांनी सदर प्रकाराचे पुरावे तपासून ग्रामपंचायत सदस्या वैशाली शहाजी खैरे, जिजाबाई सतीश खैरे या दोघांचे पद अपात्र ठरवले असून रोहिणी प्रल्हाद खैरे यांच्याबाबत अतिक्रमणचे पुरावे न मिळून आल्याने त्यांना पदावर कायम ठेवले आहे. मात्र खैरेवाडी सारख्या छोट्या गावामध्ये एकामागे एक अतिक्रमण असल्याच्या तक्रारी वरून काही दिवसातच चौघांना अपात्र ठरवण्यात आल्याने पुन्हा दोघा सदस्यांना चांगलाच दणका बसला असून शिरुर तालुक्यात चांगलीच खळबळ उडाली आहे.

खैरेवाडी ग्रामपंचायत सदस्या वैशाली खैरे व जिजाबाई खैरे यांच्याशी याबाबत चर्चा केली असता जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या अपात्रतेच्या निकालावर आम्ही विभागीय आयुक्तांकडे अपील करणार असल्याचे ग्रामपंचायत सदस्या वैशाली खैरे व जिजाबाई खैरे यांनी सांगितले.

सात जणांच्या बॉडीमध्ये अपात्रतेचा खेळ

खैरेवाडी ग्रामपंचायत हि दुर्गम व दुष्काळी भागातील समजली जाणारी ग्रामपंचायत असून 7 सदस्य संख्या असलेली ग्रामपंचायत असताना एकामागे एक चार सदस्यांना अपात्र ठरले तर तिघे जन पदावर कायम असल्याने ग्रामपंचायत मध्ये अपात्रतेचा खेळ चांगलाच रंगला असल्याचे दिसून येत आहे.