कांद्याला 40 रुपये भाव द्या: नाथाभाऊ शेवाळे

शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके): कांदा नाफेडमार्फत खरेदी करून कांद्याला ४० रुपये प्रति किलो भाव देण्याची मागणी जनता दलाचे सेक्युलर प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.

कांदा नाफेडमार्फत खरेदी करून कांद्याला ४० रुपये प्रतीकिलो भाव देण्याची मागणी जनता दलाचे सेक्युलर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

नाथाभाउ शेवाळे यांनी आज (दि. २३) रोजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री व कृषीमंत्री यांना यासंदर्भात निवेदन दिले असून कांद्याला ४० रुपये भाव मिळाला तरच शेतकरी टिकेल अन्यथा कांदा उत्पादक शेतकर्याना आत्महत्या करावी लागेल.

शेवाळे यांनी निवेदनात म्हटले आहे की कांदा हे पिक 4 साडेचार महिन्यात येत असल्याने राज्यातील शेतकरी हे नगदी पिक मोठ्या प्रमाणात घेत असतात शेतकरी कांदा पिक मार्च ते एप्रिल महिन्यात काढीत असतात.

सध्या भाव नसल्याने शेतकरी कांदा चाळीत सुरक्षित ठेवतात व भाव आल्यानंतर कांदा विकतात. साधारण कांद्याला हेक्टरी दिड ते दोन लाख रुपये खर्च येत असतो म्हणजे आजच्या मितीला कांदा विक्री केल्यास 40 ते 50 रुपये भाव आला. तरच शेतकरी बऱ्यापैकी नफ्यात असतात. मात्र कांद्याला मार्च महिन्यापासून आजपर्यंत भावच नाही म्हणून शेतकऱ्यांनी अद्यापही कांदा विक्री केलीच नाही. गेली 4 ते 5 महिन्यांत कांदा सोळा ते अठरा किलो दरम्यान विकला जातो.

त्यात 3 नंबर कांद्याचा भाव तर दहा ते बारा रुपये आहे. कांदा पिकाला चांगला भाव मिळायचा असेल तर नाफेडमार्फत खरेदी करून कांद्याला ४० रुपये किंवा त्यापेक्षा अधिक भाव देण्याची गरज आहे.तरच शेतकरी टिकेल अन्यथा आत्महत्या करण्याशिवाय शेतकऱ्यांना पर्याय राहणार नाही. शेतीमालाला भाव नसल्याने तसेच अति पावसामुळे राज्यात ओला दुष्काळ पडला आहे. यासाठी राज्य सरकारने शेतीमालाला चांगला भाव देण्याची गरज निर्माण झाली आहे.

याबाबत आपण जनता दल सेक्युलर पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना सविस्तर निवेदन दिले असून राज्य सरकार ही मागणी मान्य करील अशी अपेक्षा जनता दलाचे सेक्युलर प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांनी बोलताना व्यक्त केली आहे.