कोरेगाव भीमात जुगार खेळणाऱ्या 6 जणांवर गुन्हे

क्राईम शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील नरेश्वर वस्ती येथे पत्त्यांचे साहाय्याने जुगार खेळणाऱ्या व्यक्तींवर शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने छापे टाकत कारवाई करुन जुगार खेळणाऱ्या अजित अशोक भंडलकर, दिपक अशोक गायकवाड, संजय ज्ञानेश्वर वाजे, रतन आनाजी गावडे, गणपत मारुती भंडलकर व संतोष काळूराम ओव्हळ या व्यक्तींवर गुन्हे दाखल केले आहे.

कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील नरेश्वर वस्ती येथे संभाजी ढेरंगे यांच्या शेतात विहिरीजवळ काही व्यक्ती पैसे टाकून पत्त्यांच्या सहाय्याने जुगार खेळत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांना मिळाली. त्यानंतर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पानसरे, पोलीस हवालदार श्रीमंत होनमाने, शिवाजी चितारे, पोलीस शिपाई जयराज देवकर, किशोर शिवनकर, विकास पाटील यांसह आदींनी सदर ठिकाणी जाऊन छापा टाकला असता 6 व्यक्ती पैसे व पत्त्याच्या सहाय्याने जुगार खेळत असल्याचे पोलिसांना दिसून आले. दरम्यान पोलिसांनी सर्व व्यक्तींना जागेवर पकडून जुगारासाठी वापरलेले पत्ते तसेच 10 हजार 200 रुपये जप्त केले.

याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई जयराज वसंत देवकर रा. शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अजित अशोक भंडलकर (वय ४०) रा. वढू खुर्द ता. हवेली जि. पुणे, दिपक अशोक गायकवाड वय ३८ वर्षे रा. उबाळे नगर वाघोली ता. हवेली जि. पुणे, संजय ज्ञानेश्वर वाजे (वय ४९) रा. वाजेवाडी (ता. शिरुर) जि. पुणे, रतन आनाजी गावडे (वय ४8) रा. घाटवस्ती डोंगरगाव ता. हवेली जि. पुणे, गणपत मारुती भंडलकर (वय ५०) रा. पेरणे ता. हवेली जि. पुणे व संतोष काळूराम ओव्हळ (वय ३८) रा. सणसवाडी (ता. शिरुर) जि. पुणे यांच्या विरुध्द गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पानसरे हे करत आहे.