मध्य रात्रीपासुन ज्योत नेण्यासाठी शंभूभक्तांची अनोखी गर्दि
शिक्रापूर (शेरखान शेख): श्री. क्षेत्र वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथे धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती अगदी साधेपणाने साजरी करण्यात असून आली असताना मध्य रात्रीपासुन ज्योत नेण्यासाठी विविध ठिकाणच्या शंभूभक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दि केली होती.
क्षेत्र वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथे छत्रपती संभाजी महाराज यांचे समाधीस्थळावर रात्रीपासूनच शंभुभक्तानी गर्दी करण्यास सुरुवात केली होती. दरम्यान समाधी स्थळावर मोठ्या संख्येने शंभुभक्त उपस्थित होते. यावेळी सातारा, सांगली, कराड, पंढरपूर या जिल्ह्यासह पुणे जिल्ह्यातून रात्री बारा वाजल्यापासून ज्योत येत असताना या सर्व ज्योतींचे वढू बुद्रुक येथे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. नंतर परिसरातील ज्योती पारंपरिक पद्धतीने आपापल्या मागार्ने मार्गस्थ झाल्या.
यावेळी शिक्रापुर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक वैभव पवार, वढू बुद्रूकच्या सरपंच सारीका शिवले, उपसरपंच राहुल ओव्हाळे, माजी सरपंच अंकुश शिवले, अनिल शिवले, माजी उपसरपंच हिरालाल तांबे, संजय शिवले, सोसायटीचे माजी अध्यक्ष संजय शिवले, संतोष शिवले यांसह आदि पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
आराखडा मंजुर कामही लवकर सुरु व्हावे…
वढू बुद्रूक (ता. शिरुर) येथे स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर स्वराज्यरक्षक श्री छत्रपती संभाजी महाराज यांचे समाधी स्थळ असलेल्या या ठिकाणी विकासाचा शासनाने विकास आराखडा मंजुर केला आहे. मात्र त्यावर लवकर निधी उपलब्ध करुन कामास गती देण्याची मागणी सरपंच सारीका शिवले यांनी केली आहे.
शिक्रापूर पोलिसांकडून बंदोबस्त…
क्षेत्र वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथे छत्रपती संभाजी महाराज यांचे समाधीस्थळावर सकाळपासून पुणे नगर महामार्गावरून तसेच इतर मागार्ने जाणारे शेकडो शंभुभक्त संभाजी महाराजांचा जयघोष करत होते. तर यावेळी शिक्रापुर पोलीसांच्या वतीने मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता.