शिरुरमध्ये रांगोळीतून साकारली स्व. माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांची हुबेहुब प्रतिमा

शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या जीवनशैली व चित्रप्रदर्शनानिमित्त शिरुर येथे राणी शिवाजी बनकर या गृहीणीने शिरुर-हवेलीचे माजी आमदार स्वर्गीय बाबुराव पाचर्णे यांची हुबेहुब पोट्रेट रांगोळी काढली आहे. या रांगोळीतुन साकारलेले पाचर्णे यांचे हुबेहुब चित्र पाहून बनकर यांनी काढलेल्या रांगोळीचे शिरूर शहरातील नागरीकांकडून कौतुक होत आहे.

राणी बनकर यांनी अनेक छंद जोपासत कला क्षेत्रात कलरस्केचिंग, सुंदर रांगोळी,शिवणकाम, पार्लर हे छोटे -मोठे लघुउद्योग सुरु केले आहे. अनेक महिलांना कलेच्या माध्यमातून व्यवसायासाठी परावृत्त करुन त्यांना रोजगार मिळवून देण्याचा त्यांचा मानस आहे.