hsc sambhajiraje vidyalay

संभाजीराजे विद्यालयात गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत…

शिरूर तालुका

शिक्रापूरः महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची परीक्षा मंगळवारपासून (ता. २१) सुरू झाली आहे. बारावीच्या परीक्षेसाठी शिरूर तालुक्यातून एकूण ४६७२ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले आहेत. तालुक्यात बारावीची एकूण ६ मुख्य केंद्र आहेत, अशी माहिती केंद्रसंचालक प्राचार्य रामदास थिटे यांनी दिली.

मौजे जातेगाव बुद्रुक (ता. शिरूर) येथील श्री संभाजीराजे कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता बारावी परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी शिरूर बाजार समितीचे माजी सभापती व संस्थेचे सचिव प्रकाश बापू पवार, कै. रा. गे. पलांडे कनिष्ठ महाविद्यालयाचे सचिव सुरेशबापू पलांडे, जातेगाव बुद्रुकचे सरपंच किशोर खळदकर, उपसरपंच गणेश उमाप, संस्था संचालक दत्तात्रय उमाप साहेबराव उमाप, पोलीस पाटील चित्राताई इंगवले, सामाजिक कार्यकर्ते अनिल होळकर, हमीदभाई पठाण, केंद्र संचालक प्राचार्य रामदास थिटे, उपकेंद्र संचालक प्राचार्य तुकाराम शिरसाट, विजय वर्पे आदी मान्यवर उपस्थित होते.

शिरूर तालुक्यातील बारावी परीक्षा सुरळीतपणे, शिस्तबद्ध वातावरणात पार पाडणेकामी परिरक्षक गटशिक्षणाधिकारी आनिल बाब , उपपरिरक्षक जिजाबापू गट, सहायक परिरक्षक श्रीकांत निचित व केंद्रसचालक, परिक्षक व पर्यवेक्षक विशेष परिश्रम घेत आहेत.

शिरूर तालुक्यातील बारावी परीक्षेबाबत केंद्रनिहाय माहिती गटशिक्षणाधिकारी आनिल बाबर यांनी दिली. परीक्षा कामकाजाबाबत पूर्ण तयारी झाली असून कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरणात परीक्षा पार पाडली जाईल, असे त्यांनी सांगितले.

शिरूर तालुक्यातील केंद्राचे नाव – व विद्यार्थी संख्या पुढीलप्रमाणे:
१. श्री संभाजीराजे कनिष्ठ महाविद्यालय जातेगांव -६०३
२. सी. टी. बोरा कनिष्ठ महाविद्यालय – २००५
३. विद्याधाम प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय शिक्रापूर – ७०९
४. स्वा से. रायकुमार गुजर कनिष्ठ महाविद्यालय तळेगाव – ६२२
५. मल्लिकार्जुन विद्यालय न्हावरे – ३७९
६. वाघेश्वर विद्यालय मांडवगण फराटा – ३६२
एकूण -४६७२