शिरूर: श्री क्षेत्र खंडाळे-रांजणगाव गणपती येथून श्री क्षेत्र पैठण कडे निघालेल्या शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज पालखी सोहळ्याचा प्रस्थान समारंभ भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.
संत एकनाथ महाराज संस्थान पैठण चे फडकरी म्हणून मान मिळालेल्या भक्तिवेदांत वारकरी शिक्षण संस्था / संत निळोबाराय गाथा मंदिर संस्थान यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या पायी वारीचा प्रस्थान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. ही वारी संत एकनाथ महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळा – श्री नाथ षष्ठी उत्सवानिमित्त पैठण येथे जात आहे. यावेळी संत एकनाथ महाराजांचे १४ वे वंशज पुष्कर महाराज गोसावी यांचे वारी प्रस्थान किर्तन झाले. त्यांच्या कीर्तनाने उपस्थित भाविकांना अध्यात्मिक उर्जा आणि भक्तीभावाची प्रेरणा मिळाली.
पालखी प्रस्थान प्रसंगी शिरूर, खेड, आंबेगाव, जुन्नर, पारनेर, श्रीगोंदा, दौंड, हवेली व मावळ तालुक्यांतील हजारो वारकरी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हभप संतोष महाराज खेडकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या पालखी सोहळ्यात दरवर्षी सुमारे ५०० ते ६०० वारकरी पूर्ण दिवस पायी वारीत सहभागी होतात. पुणे जिल्ह्यातून पैठण वारीसाठी जाणारा हा एकमेव पालखी सोहळा असल्याने त्याला विशेष महत्त्व आहे. भक्ती, श्रद्धा आणि वारकरी परंपरेचा संगम असलेला हा पालखी सोहळा संपूर्ण परिसरात आध्यात्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण करून पैठणकडे प्रस्थान झाले.
खंडाळे तीर्थक्षेत्रात संतश्रेष्ठ निळोबाराय गाथा मंदिराचा भव्य भूमिपूजन सोहळा संपन्न!
खंडाळे येथे पालखी सोहळ्याचा सांगता समारंभ; हजारो भाविक सहभागी…
खंडाळे येथे श्री संत एकनाथ महाराज पालखी सोहळा सांगता समारंभ संपन्न!
वाघाळे येथून वाघेश्वर पायी दिंडी सोहळ्याचे भक्तिमय वातावरणात प्रस्थान…