पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक पंकज देशमुख यांच्या धडाकेबाज कारवाईची सगळीकडे जोरदार चर्चा

क्राईम मुख्य बातम्या

कारेगाव (तेजस फडके) पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षक पदाचा कार्यभार स्वीकारताच पोलिस अधिक्षक पंकज देशमुख यांनी अवैध धंद्यावर धडाकेबाज कारवाया सुरु केल्या असुन सर्वसामान्य जनतेने त्यांच्या या भूमिकेचे कौतुक केले आहे. दोनच दिवसांपुर्वी रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन हद्दीतील कारेगाव येथील यश इन चौकात एका तीन मजली इमारतीमधील खोलीमध्ये चालणाऱ्या वेश्याव्यवसायावर कारवाई केल्याने स्थानिक नागरीकांनी पंकज देशमुख यांचे आभार मानले आहेत.

 

दि 22 फेब्रुवारी 2024 रोजी कारेगाव येथील यश इन चौकात तीन मजली इमारतीत वेश्या चालु असल्याची गोपनिय माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. त्यानुसार दर्शन दुगड (I.P.S) यांनी रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे व त्यांच्या कर्मचाऱ्यांना बोलावुन घेत येथील वेश्याव्यवसायावर कारवाई करत एका 40 वर्षीय पिडीत महिलेची सुटका करत तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.

 

सूत्रांनी दिलेल्या खात्रीलायक माहितीनुसार हि इमारत एका राष्ट्रवादी (अजित पवार गट) च्या संबंधित असलेल्या राजकीय व्यक्तीची असुन त्या इमारतीच्या आसपास मोठी लोकवस्ती आहे. या गजबजलेल्या परीसरात खुलेआम वेश्याव्यवसाय चालत होता. त्यामुळे अनेक स्थानिक नागरीकांना याचा त्रास सुद्धा होत होता. तसेच रांजणगाव औद्योगिक वसाहतीत रात्री अपरात्री कामाला जाणाऱ्या युवती तसेच महिलांना या परीसरातुन जातानाही असुरक्षित वाटत होते. परंतु हि इमारत एका राजकीय व्यक्तींच्या नातेवाईकाची असल्याने त्याच्या विरोधात कोणीही तक्रार करण्यास पुढे येत नव्हते.

 

रांजणगावचे पोलिस निरीक्षक वाघमोडे ऍक्टिव्ह मोडवर 

रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनचा कारभार हाती घेताच पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी परीसरातील सर्व अवैध धंद्यावर कारवाईचा बडगा उगारला असुन गुटखा, मटका, जुगार तसेच इतर अवैध धंद्यावाल्यांचे सध्या धाबे दणाणले आहेत. यश इन चौक येथे असलेल्या एका वाईन्सच्या दुकानात दारु विकत घेऊन तिथंच ठाण मांडत दारु पिणाऱ्या तळीरामांना पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवविल्याने या चौकात विनाकारण होणारी तळीरामांची गर्दी कमी झाली आहे.

शिरुर तालुक्यात वेश्या व्यवसाय करणा-या तिघांविरुध्द गुन्हा दाखल; पोलिसांनी केली एका महिलेची सुटका

शिरुर तालुक्यात गुन्हेगारी वाढल्याने कायदा व सुव्यवस्था धोक्यात…? पोलिस सिंघमगिरी दाखवणार का