शिरुरमध्ये कॉलेजच्या वतीने जागतिक औषध निर्माता दिन उत्साहात साजरा…

शिरूर तालुका

सविंदणे (अरुणकुमार मोटे): श्री छत्रपती संभाजी शिक्षण संस्थेचे सीताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्मसी व बी. फार्मसी) आणि शिरुर तालुका केमिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार (दि. २४) सप्टेंबर रोजी “जागतिक औषध निर्माता” दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

फार्मसिस्ट हा डॉक्टर व रुग्ण यांच्यातील एक महत्त्वाचा दुवा म्हणून काम करतो. समाजाला निरोगी ठेवण्यासाठी अहोरात्र ते आपले योगदान देत असतात व त्याचबरोबर रुग्णांचे मनोबल वाढविण्याचे कामही फार्मसिस्ट कडून केले जाते.

कॉलेज च्या वतीने संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्रजी थिटे, सचिव धनंजयजी थिटे यांनी सर्वांना जागतिक औषध निर्माता दिनाच्या शुभेच्छा दिल्या. बी. फार्मसी चे प्राचार्य डॉ. बाहेती सर व डी. फार्मसी चे प्राचार्य डॉ. शहा सर यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले. या निमित्ताने अभय दरडा, संचालक ब्रिटॉन फार्मा यांनी विद्यार्थ्यांना रिटेल मेडिकल शॉप व्यतिरिक्त उपलब्ध असलेल्या करिअर संधींबद्दल मार्गदर्शन केले.

बच्चुभाई ओसवाल, अध्यक्ष एसएमसीडीए पश्चिम विभाग यांनी जागतिक फार्मसिस्ट दिनाचे महत्त्व आणि विविध क्षेत्रांमध्ये फार्मसिस्ट ची असलेली गरज तसेच ऑनलाईन फार्मसी मुळे होणारे नुकसान याबद्दल सुशील शहा, जिल्हा अध्यक्ष सीएपीडी, पुणे यांनी याबद्दल माहिती दिली. दिनेश खिंवसरा सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन पुणे यांनी प्रशासनामध्ये असलेल्या विविध संधींबद्दल मार्गदर्शन केले तसेच विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिली. बाबाजी गलांडे कार्यकारिणी सदस्य यांचे मोलाचे मार्गदर्शन उपस्थित विद्यार्थी व फार्मसिस्ट यांना लाभले.

महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमार्फत शिरुर शहरामधून रॅली काढण्यात आली तसेच औषधांच्या गैरवापरामुळे होणारे दुष्परिणाम या विषयावर पथनाट्य सादर करण्यात आले.

सदर कार्यक्रमास शिरुर शहरातील चोथमल कोठारी, पुष्पराज कोळपकर, हनुमंत गाडे, सचिन गाडे, अजिंक्य थोरात, आकाश लंके, ज्ञानदेव सूर्यवंशी, दीपक ताथेड, संदीप साठे आदी उपस्थित होते. यावेळी ज्ञानदेव सूर्यवंशी यांचा वरिष्ठ फार्मसिस्ट म्हणून सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. विजया पडवळ व प्रा. मोनाली परभने यांनी केले तसेच प्रा. कारखिले सर यांनी सर्वांचे आभार मानले.