बीडमध्ये बारावी परीक्षेचा मोठा घोटाळा? पेपरवर कॉलेज, परीक्षा दुसरीकडे; ‘बीड पॅटर्न’ची चर्चा

बीड: बीड जिल्ह्यात बारावी बोर्ड परीक्षेदरम्यान धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परळी येथील यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे हॉलतिकीटावर एक परीक्षा केंद्र तर प्रत्यक्ष परीक्षा मात्र दुसऱ्याच ठिकाणी घेतली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे शिक्षण व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. परळी तालुक्यात एकूण ११ परीक्षा केंद्रांवर सुमारे ५ हजार विद्यार्थी बारावीची […]

अधिक वाचा..

स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाचे काम दर्जेदार पद्धतीने करावे: उपमुख्यमंत्री अजित पवार

अंबाजोगाई येथे सुसज्ज असे १ हजार १५० खाटांचे रुग्णालय उभारावे मुंबई: मराठवाड्यातील ग्रामीण भागासाठी वैद्यकीय शिक्षण व आरोग्यसेवा अधिक सक्षम व्हावी यासाठी बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे १ हजार १५० खाटांचे सुसज्ज शासकीय रुग्णालय उभारण्यात यावे. तसेच स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाचे काम दर्जेदार पद्धतीने करावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या. स्वामी […]

अधिक वाचा..

महाविद्यालयीन युवकांनी ‘MY भारत’ पोर्टलवर सिव्हिल डिफेन्स वॉरिअर म्हणून नोंदणी करावी

मुंबई: आपत्ती व्यवस्थापन, वैद्यकीय सेवा, पोलीस दल, अग्निशमन दल यासारख्या आपत्कालीन क्षेत्रांमध्ये युवकांचा सक्रिय सहभाग असणे महत्त्वाचे आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीत रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्यास युवकांद्वारे रक्तदान करून, देशसेवेचे स्वप्न साकार करण्यासाठी महाविद्यालयीन युवकांनी,राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांनी ‘MY भारत’ पोर्टलवर सिव्हिल डिफेन्स वॉरिअर म्हणून स्वतःची नोंदणी करावी.असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील […]

अधिक वाचा..

शासकीय औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय कराड येथील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी करणार

मुंबई: शासकीय औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय कराड येथील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणाचा चौकशी अहवाल प्राप्त होताच नियमानुसार कारवाई केली जाईल, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी विधानसभेत सांगितले. या लक्षवेधीच्या उत्तराच्या वेळी अधिक माहिती देताना मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले, या महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक या […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात प्रत्येक शाळेत व कॉलेजमध्ये मुलींच्या समस्या मांडण्यासाठी तक्रारपेटी बसवा…

रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेची मागणी…   शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यात अनेक माध्यमिक विदयालय तसेच उच्च माध्यमिक विद्यालये आहेत. त्याठिकाणी अनेक मुली तालुक्याच्या विविध भागातून शिक्षणासाठी येत असतात. त्या मुलींना शाळेत किंवा महाविद्यालयात त्या मुलींना अनेक अडचणी असतात. तसेच त्यांची छेडछाडही केली जाते किंवा त्यांचे लैंगिक शोषण केले जाते. त्यामुळे शिरुर तालुक्यातील प्रत्येक शाळेत […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील महाविद्यालयीन युवतीची गळफास घेऊन आत्महत्या

शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता. शिरूर) येथील महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या 19 वर्षीय युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून आणि प्रणिता रामदास ढोकले असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे. करंदी (ता. शिरूर) येथील वाघोलीतील रायसोनी कॉलेज या महाविद्यालयात शिक्षण घेणारी प्रणिता ढोकले ही रात्रीच्या सुमारास […]

अधिक वाचा..

डंकन इंजिनिअरिंग कंपनीच्या CSR फंडातुन डि एन ताठे महाविद्यालयात शैक्षणिक साहित्याचे वाटप

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर पंचायत समितीचे माजी सभापती विश्वास कोहोकडे यांच्या पाठपुराव्यातून (दि 13) रोजी कारेगाव येथील डि एन ताठे माध्यमिक विद्यालयात रांजणगाव MIDC तील Duncan Engineering या कंपनीने CSR फंडातुन विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी 25 बेंच, 76 विद्यार्थ्यांसाठी गणवेश, बूट तसेच 275 मुलांसाठी 2700 फुलस्केप वह्या वाटप करण्यात आले. यावेळी कंपनीचे HR परमार, केवालसिंग, यांचा […]

अधिक वाचा..

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा परीक्षांवरील बहिष्कार मागे

मुंबई: राज्यातील महाविद्यालयीन शिक्षकांच्या विविध मागण्यांबाबत आज सकारात्मक चर्चा झाली. यामुळे महाविद्यालयीन शिक्षकांनी १२ वीच्या पेपर तपासणीवर टाकलेला बहिष्कार मागे घेतल्याने निकाल वेळेत लागणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज मुंबई येथे पत्रकार परिषदेत दिली. मंत्री केसरकर यांनी सांगितले की, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या अडचणीबाबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत […]

अधिक वाचा..

मॅनहटन कम्युनिटी कॉलेज समवेत करार…

कौशल्य विकासाबरोबरच विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा विस्तारण्यास होईल मदत मुंबई: मॅनहटन कम्युनिटी कॉलेज बरो सोबतच्या करारामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण कमी खर्चात उपलब्ध होणार असून कौशल्य विकासाबरोबरच विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा विस्तारण्यास आणि रोजगार उपलब्ध होण्यास देखील निश्चितच मदत होईल, असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. शालेय शिक्षण विभाग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात महाविद्यालयीन युवतीचा विनयभंग

शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता. शिरुर) येथील एका महाविद्यालयीन युवतीचा घरात घुसून विनयभंग केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे नारायण बिचुकले या व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. करंदी (ता. शिरुर) येथील महाविद्यालयीन युवती घरात अभ्यास करत असताना गावातील नारायण बिचुकले हा व्यक्ती दारुच्या नशेत युवतीच्या घराजवळ आला त्याने घरात जाऊन युवती अभ्यास […]

अधिक वाचा..