जलदिंडी प्रतिष्ठान मार्फत एक पाऊल डिजिटल शाळेसाठी 

शिरूर तालुका

शिरूर (अरुणकुमार मोटे): जलदिंडी प्रतिष्ठान मार्फत व रावसाहेब भाऊ निचित यांच्या प्रयत्नानातुन जिल्हा परिषद शाळा ज्ञानेश्वरनगर, वडनेर खुर्द या शाळेला लॅपटॉप भेट देण्यात आला.

जलदिंडी प्रतिष्ठान कडून ग्रामीण भागातील शाळांना डिजिटल शाळा सुरू करण्यासाठी प्रोत्साहन म्हणून संगणक दिले जातात. या वर्षी १० लॅपटॉप वाटप करण्यात आले. त्यामध्ये जि. प. प्राथमिक शाळा ज्ञानेश्वर नगर, वडनेर खुर्द (ता. शिरूर), जि. पुणे. या शाळेला रावसाहेब निचित (विश्वस्त जलदिंडी प्रतिष्ठान पुणे) यांच्या माध्यमातून लपटॉप देण्यात आला.

याप्रसंगी वडनेर गावचे सरपंच नवनाथ निचित, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष निचित, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विश्वनाथ निचित, ग्रामपंचायत सदस्य अनिल वाजे, ग्रामपंचायत सदस्य नवनाथ निचित, जेष्ठ शिवसैनिक तुकाराम सुरकुंडे, युवा कार्यकर्ते संदेश निचित, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष श्रीदास निचित, नवनाथ जनार्दन निचित, शाळेचे शिक्षक कचरू घोडे सर, पुजा बोराडे मॅडम व छाया जाधव मॅडम व विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी नवनाथ निचित यांनी विद्यार्थ्यांना प्रबोधन केले. शाळेला काही उणीव भासणार नाही याची काळजी घेतली जाईल. रावसाहेब निचित यांनी मुलांना मार्गदर्शन करून मुलांना जलदिंडी प्रतिष्ठान कडून पोहण्याचे प्रशिक्षण दिले जाईल, तसेच सेमी इंग्रजी माध्यम सुरू करण्यासाठी लागणारे सहकार्य वेळोवेळी करण्याचे आश्वासन दिले. कचरू घोडे सर यांनी सर्वांचे स्वागत केले. पुजा बोराडे मॅडम यांनी आभार मानले.

शिरुर तालुक्यात एका विवाहित महिलेची त्याच्यामुळे आत्महत्या, तर दुसऱ्या महिलेला आत्मदहन करण्याची वेळ…?