शिरुर; बैलगाडा शर्यतीतील वादातून तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न; बाप-लेका विरुद्ध गुन्हा दाखल

शिरुर (तेजस फडके): बैलगाडा शर्यतीदरम्यान झालेल्या वादाचा राग मनात धरून सणसवाडी येथील एका २७ वर्षीय तरुणाच्या दुचाकीला भरधाव महिंद्रा थार गाडीने समोरून धडक देत त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या घटनेत चेतन गणपत हरगुडे आणि त्यांचा चुलत भाऊ अथर्व नवनाथ हरगुडे हे दोघे जखमी झाले असून, त्यांच्यावर वाघोली येथील लाईफलाईन […]

अधिक वाचा..

शिरुरमध्ये पत्रकाराला गलिच्छ भाषेत शिविगाळ करून बातमीचा व्हिडिओ हटविण्याचा प्रयत्न; अँड.विकास कुटे यांच्यावर गुन्हा दाखल

शिरूर (अरुणकुमार मोटे): लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारितेवर दबाव टाकून डिजिटल पुरावे हटविण्यास भाग पाडण्याचा गंभीर प्रकार शिरूर तालुक्यात उघडकीस आला आहे. सार्वजनिक हिताच्या विषयांवर वृत्तांकन करणाऱ्या पत्रकाराला धमक्या देत सोशल मीडियावरील व्हिडीओ आणि बातम्या हटविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी रांजणगाव गणपती येथील अँड.विकास कुटे यांच्याविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदोडी (ता. […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील सिंचन साहित्य चोरी प्रकरणाला नवे वळण; आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न…? 

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील खंडाळे तसेच रांजणगाव परिसरात ठिबक सिंचन साहित्य चोरीचा प्रकार घडला होता. या प्रकरणाला आता नवे वळण लागले असून या प्रकरणामुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांच्या शेतातून मोठ्या प्रमाणात ठिबक सिंचन साहित्य चोरीला गेल्याची घटना काही दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. याबाबत संबंधित तक्रारदारांनी सुमारे आठवडाभरापूर्वी रांजणगाव पोलीस ठाण्यात […]

अधिक वाचा..

कोरेगाव मूळ पंचायत समिती गणात बोगस मतदानाचा प्रयत्न; सहा संशयित, तिघांना रंगेहाथ पकडले

हवेली: कोरेगाव मूळ पंचायत समिती गणातील प्रयागधाम (ता. हवेली) येथील जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्रावर मतदान प्रक्रियेला काळीमा फासणारा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. मतदान सुरू असतानाच बोगस ओळखीच्या आधारे मतदान करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सहा संशयित मतदारांपैकी तिघांना भरारी पथकाने रंगेहाथ पकडले असून, उर्वरित तिघे घटनास्थळावरून पसार झाले आहेत. या प्रकरणाची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी […]

अधिक वाचा..

उच्चशिक्षित विवाहितेवर विष पाजून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न; पती फरार

नाशिक: पुण्यात इंजिनिअर विवाहितेच्या आत्महत्येच्या घटनेनंतर राज्यात खळबळ उडालेली असतानाच नाशिकमधूनही तितकाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रेमविवाहानंतर सासरच्यांकडून मानसिक व शारीरिक छळ सहन करावा लागलेल्या एका उच्चशिक्षित विवाहितेला मारहाण करून जबरदस्तीने विषारी औषध पाजल्याचा गंभीर आरोप तिच्या माहेरच्यांनी केला आहे. या घटनेनंतर शहरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पीडित विवाहितेचे नाव महिमा मॉन्टी […]

अधिक वाचा..

पोलिसांची धाड आणि मोठा स्फोटक साठा जप्त; प्रजासत्ताक दिनानिमित्त घातपात टळला

राजस्थान: देशभरात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह असताना, नागौर जिल्ह्यात पोलिसांनी एका मोठ्या स्फोटक कटाचा उधळा लावला आहे. जिल्हा पोलीस आणि विशेष पथकाने शनिवारी रात्री हरसौर गावातील एका फार्म हाऊसवर धाड टाकून तब्बल १० हजार किलो अवैध अमोनियम नाइट्रेट जप्त केले आहे. ही आतापर्यंतची राज्यातील सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिस अधीक्षक मृदुल […]

अधिक वाचा..

डोळा लागला अन् घात झाला; PSI अश्विनीचा मृत्यू कसा झाला

पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) २०२३ मधील पोलिस उपनिरीक्षक (PSI) परीक्षेत मुलींमध्ये राज्यात प्रथम क्रमांक मिळवणारी अश्विनी बाबुराव केदारी (वय ३०) यांचा एका दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला. नाशिक येथे PSI प्रशिक्षण घेत असताना गणेशोत्सवासाठी दोन दिवसांच्या सुट्टीवर गावी आलेल्या अश्विनीवर काळाने घाला घातला. २८ ऑगस्ट रोजी सकाळी आंघोळीसाठी पाणी गरम करताना हिटरमुळे झालेल्या अपघातात ती […]

अधिक वाचा..

‘तुझे अनैतिक संबंध आहेत, मला तलाक दे’; पुण्यात भर चौकात तरूणीला जीवे मारण्याचा प्रयत्न

पुणे: पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. तलाक का देत नाही म्हणत २२ वर्षीय तरूणीला जीवे मारण्याचा भरसकाळी प्रयत्न केला. सुदैवाने ता या हल्ल्यातून बचावली. मात्र ती गंभीर जखमी झाली आहे. थेरगाव येथील एम. एम. चौकात हा सर्व प्रकार घडला. एका २२ वर्षीय तरुणीवर तिच्या पतीने तलाक न दिल्याच्या रागातून ब्लेडने वार करून खुनी […]

अधिक वाचा..

कबूतरखाना वादामागे भाजपा युती सरकारच, ज्वलंत प्रश्नांवरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न

अधिका-यांच्या पोस्टिंगवरून सरकारमध्ये गँगवार, एकाच पदावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी एकाच पदावर दोन अधिका-यांची नियुक्ती  मुंबई: मुंबईच्या दादर येथील कबुतरखान्यावरून वाद सुरु असून यात राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा हिरीरीने भाग घेताना दिसत आहेत. लोढा यांच्याकडे मुंबईत खूप मोठ्या प्रमाणात जमिनी व मोठ्या इमारतीही आहेत. तसेच सरकारने अदानीला मुंबईतील ३३ टक्के जमीन दिलेली आहे. लोढा व अदानी यांनी […]

अधिक वाचा..

आमदार रोहित पवार यांच्यावरील गुन्हा म्हणजे सत्य लपवण्याचा आणि प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा संतप्त निषेध मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यावर आझाद मैदान पोलीस ठाण्यात पोलिसांशी गैरवर्तन केल्याच्या कथित कारणावरून दाखल करण्यात आलेला गुन्हा हा केवळ एक राजकीय सूडभावनेचा भाग असून, सत्य परिस्थिती झाकण्यासाठी मुद्दाम तयार केलेले नाट्य आहे. घटनाक्रम काय होता?पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर, आमचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांच्यावर विधानभवनाच्या […]

अधिक वाचा..