वाळू वाहतुकीस शेतातून जाण्यास मनाई केल्याने एकास जीवे मारण्याचा प्रयत्न

मुख्य बातम्या

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यातील डोंगरगण (ता. शिरुर) येथे वाळू उपसा करुन शेतातून वाहतुक करणाऱ्यास मनाई केल्याने सुरेश चोरे यास शिवीगाळ करून तलवारीने, हॉकी स्टीक ने जबर मारहाण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी शिरुर पोलिस स्टेशनमध्ये सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत सविस्तर हकीकत तरी (दि. २०) रोजी मौजे डोंगरगण ता. शिरूर जि पुणे गावचे हद्दीत अजित दिलीप चोरे यास फिर्यादी याने आमच्या शेतातातील रस्त्याने वाळु व माती वाहतुक करु नको त्यामुळे रस्त्याला मोठमोठ खड्डे पडले आहे. असे म्हणाले असता त्याचा राग मनात धरून आरोपी १) अजित दिलीप चोरे २) विकास उर्फ काज्या बाबाजी चोरे ३) सनी उर्फ सतिश विलास चोरे ४) अविनाश प्रकाश उचाळे ५) शिवाजी राजेंद्र चौरे ६) सुरेश राजेंद्र चोरे सर्व रा डोंगरगण ता शिरुर जि पुणे हे यांनी याला आज ठेवायचा नाही, असे म्हणुन त्यांचे हातातील तलवारीने हॉकीस्टीक ने हाताने लाथाबुक्याने आरोपीच्या पाठीत दोन्ही पायांवर दोन्ही हातावर उजवे पायावर उजये पायाचे नडगीवर, मांड्यावर मारहान करुन शिवीगाळ दमदाट करुन जीवे ठार मार मारण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच त्यापैकि कोणीतरी फिर्यादीचा मोबाईल फोडुन मोबाईलचे नुकसान केले आहे. या प्रकरणी सुरेश चोरे यांनी वरील आरोपीं विरुध्द कायदेशिर फिर्याद दिली असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अभिजित पवार करत आहे.

गेल्या अनेक दिवसापासून या भागात वाळूउपसा, मुरुम ऊपसा सुरु असून तेथील मंडल आधिकारी यांनी खालेल्या मीठाला जागण्याचे काम केले असून त्यांच्या आशिर्वादाने वाळूमाफीयांना अभय देवून राजरोसपणे हा प्रकार सुरु असल्याने गब्बर वाळूमाफी यांनी एकावर जीवघेणा हल्ला केला आहे.या स्थानिक मंडल आधिकाऱ्याची जबाबदारी निश्चित करून तात्काळ सजावरुन हकालपट्टी करुन सखोल चौकशी करुन त्याच्यावर योग्य कारवाई करण्याची मागणी परीसरात ग्रामस्थांकडून होत आहे. हा मंडल आधिकारी स्थानिक रहीवाशी असल्याने त्याचे वाळूमाफीयांशी चांगलेच आर्थिक संबध असल्याने तो चांगलाच ‘गब्बर ‘ बनला आहे.

(क्रमश:)