आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल; नेमकं कारण काय

मुंबई: सरकारी कामात अडथळा आणल्यामुळं जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात मुंबईतील मरिन ड्राइव्ह पोलिसांनी  गुन्हा दाखल केला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची परवानगी घेऊन गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना काल पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. देशमुख यांना विधानभवना बाहेर घेऊन जात असतानाच आव्हाड आक्रमक झाले. त्यांनी […]

अधिक वाचा..

नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना

मुंबई: नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेल्या कथित गैरव्यवहाराची सखोल चौकशी करण्यासाठी राज्य सरकारकडून विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा पणन मंत्री जयकुमार रावल यांनी आज विधानसभेत केली. भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी या प्रकरणात गंभीर स्वरूपाचे आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला होता. त्यानंतर याप्रकरणी कारवाईची प्रक्रिया सुरू झाली […]

अधिक वाचा..

अशोक भोरडे यांच्या तक्रारीवरून भुमाफिया राहुल करपे याच्याविरुद्ध अखेर गुन्हा दाखल

प्रशासन अशोक भोरडे यांच्या हत्येची वाट पाहत आहे का? शिरुर (तेजस फडके) शिरूर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी येथील आरटीआय व व्हिसल ब्लोअर कार्यकर्ते अशोक भोरडे यांच्या तक्रारीवरून भुमाफिया राहुल करपे याच्याविरुद्ध शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. विशेष म्हणजे, अशोक भोरडे हे गेल्या अनेक वर्षांपासून अवैध गौण खनिज उत्खनन, अनधिकृत प्लॉटिंग व प्रशासनातील भ्रष्टाचाराविरोधात सातत्याने […]

अधिक वाचा..

शिरूरमध्ये ऑनलाईन सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार

प्रितम-प्रकाश नगरमधील नागरिकाच्या खात्यातून १ लाख रुपये लंपास शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील प्रितम-प्रकाश नगर येथील एका रहिवाशाच्या बँक खात्यातून अज्ञात सायबर चोरट्यांनी ऑनलाईन फसवणूक करत तब्बल १ लाख रुपये लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, सायबर सुरक्षेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणी […]

अधिक वाचा..

प्रेमविवाहाचा राग ठेवून लोखंडी कोयत्याने तरुणावर हल्ला, तीन जणांविरोधात गुन्हा दाखल

शिरूर (अरुणकुमार मोटे): प्रेमविवाहाच्या रागातून एका तरुणावर थेट कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना टाकळीहाजी (ता. शिरूर) येथे घडली आहे. कुडांई मेन्स पार्लरमध्ये हे नाट्य घडले असून दुकानाची तोडफोड करत दुकानमालकाच्या हातावर व पाठीवर लोखंडी कोयत्याने वार करण्यात आले. याप्रकरणी तिघांविरुद्ध शिरूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्तात्रय हौशीराम वाघ (वय २२, रा. […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात विहिरीवरील मोटार चोरीला; अज्ञात व्यक्ती विरोधात पोलिसात गुन्हा दाखल

शिंदोडी (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील निर्वी गावात एका शेतकऱ्याच्या विहिरीवरुन कंपनीची अंदाजे 10 हजार रुपये किंमतीची पाण्यातील इलेक्ट्रीक मोटार चोरीस गेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी शिरुर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शिरुर पोलीस स्टेशन येथे ओमकार अरुण शहाणे (वय 24, व्यवसाय शेती, रा. निर्वी, ता. शिरूर, जि. पुणे) […]

अधिक वाचा..

इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करून मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा

मुंबई: मृत्यू हे सरकारच्या हलगर्जीपणाने घेतलेले बळी आहेत. कुंडमळा येथे पावसाळ्यात शेकडो पर्यटक येतात याची माहित असताना तो धोकादायक पुल खुला का ठेवला? असा प्रश्न विचारून हे सरकारने घेतलेले बळी आहेत, जबाबदारी निश्चित करून संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. इंद्रायणी पुल […]

अधिक वाचा..

सरकार सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यात कमी पडले, पुनर्विचार याचिका दाखल करावी

मुंबई: विदर्भातील सहा जिल्ह्यातील झुडपी जंगलाला वनक्षेत्र घोषित करून ८६ हजार हेक्टर क्षेत्र महसूल विभागाने वनविभागाला हस्तांतरित करण्यात येणार आहे. यामुळे या जमिनीला डिनोटीफाय करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला मोठा धक्का बसला आहे. सुप्रिम कोर्टाच्या निर्णयामुळे पूर्व विदर्भातील लाखो कुटुंबे बेघर आणि भूमिहीन होण्याचा धोका असून या भागाच्या विकासाला खिळ बसणार आहे. राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात […]

अधिक वाचा..

अनाधिकृत माती वाहतुकीप्रकरणी शिरूर तहसिलदारांची कारवाई, हायवा ट्रक ताब्यात

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील शिरूर-हिंगणी रोडवर १५ मे रोजी रात्री अंदाजे ११.३० वाजता शिरुर तहसिलदारांसह महसूल पथकाने कारवाई करत एक हायवा ट्रक (MH-AD-३९१८) अनधिकृतपणे माती वाहतूक करताना पकडला. ट्रकमध्ये सुमारे ५ ब्रास माती आढळली असून, त्याबाबत कोणतीही रॉयल्टी पावती सादर करण्यात आलेली नव्हती. तपासणीत असे निदर्शनास आले की, सदर माती ही श्रीगोंदा तालुक्यातील राजापूर […]

अधिक वाचा..

आश्रमशाळेत अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रकरणी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली गंभीर दखल

पोलीस प्रशासनाला तातडीने कठोर कारवाई करण्याचे निर्देश सांगली: सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील सनमडी येथील समाजकल्याण विभागाच्या आश्रमशाळेत अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या संतापजनक घटनेची उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेतली आहे. डॉ. गोऱ्हे यांनी राज्याचे मुख्य सचिव, पोलिस महासंचालक, समाजकल्याण आयुक्त आणि सांगली जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक यांच्याकडे निवेदन सादर करून दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्याची […]

अधिक वाचा..