लग्नाच्या आमिषाखाली फसवणूक? मुंबई महानगरपालिकेच्या सहायक आयुक्ताला अटक; प्रशासनात खळबळ

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या के-ईस्ट वॉर्डचे सहायक आयुक्त नितीन शुक्ला यांना एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून संबंध ठेवत फसवणूक केल्याच्या गंभीर आरोपांवरून अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे पालिका प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. विक्रोळी पार्कसाईट पोलिसांनी तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करून शुक्ला यांना ताब्यात घेतले असून प्रकरणाचा तपास वेगाने सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, […]

अधिक वाचा..

छाप्यावेळी उडी की दबाव?महिलेच्या पतीची आयुक्तांकडे धाव, सीआयडी चौकशी सुरू

पुणे: विमाननगर येथील मसाज पार्लरमध्ये पोलिसांच्या कारवाईदरम्यान महिलेने इमारतीवरून उडी मारून मृत्यू झाल्याच्या प्रकरणाची चौकशी आता राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) सोपवण्यात आली आहे. महिलेच्या पतीने अमितेशकुमार यांची भेट घेऊन सखोल चौकशीची मागणी केली आहे. काय आहे प्रकरण? पुणे येथील विमाननगर परिसरातील ‘द रुट्स स्पा’ येथे देहव्यापार सुरू असल्याची माहिती विमानतळ पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार […]

अधिक वाचा..

मुंबईत भव्य प्रवेशद्वार आणि क्लॉक टॉवर उभारण्याची मागणी; महापौर रितू तावडे यांचे आयुक्तांना पत्र

मुंबई: देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात भव्य प्रवेशद्वार आणि क्लॉक टॉवर उभारण्याची मागणी महापौर रितू तावडे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी महानगरपालिका आयुक्तांना पत्र पाठवून यावर्षीच्या अर्थसंकल्पात आवश्यक तरतूद करण्याची विनंती केली आहे. मुंबईत दररोज लाखो पर्यटक आणि व्यावसायिक ये-जा करत असतात. शहरात प्रवेश करतानाच मुंबईची वेगळी आणि आकर्षक ओळख निर्माण व्हावी, तसेच जागतिक […]

अधिक वाचा..

मनसेचा नेता थेट आयुक्तांच्या अंगावर धावून गेला अन् म्हणाला…

पुणे: राज्यभर चाललेल्या मराठी अमराठीचा वाद आता पुणे महापालिकेमध्ये देखील रंगल्याचे पाहायला मिळाल. महापालिका आयुक्तांची बैठक सुरू असतानाच मनसेचे काही पदाधिकारी थेट बैठकीच्या ठिकाणी दाखल झाले. त्या ठिकाणी बैठक सुरू असल्याचं सांगत या पदाधिकाऱ्यांना हटकलं असता आयुक्त आणि मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. हा वाद इतका विकोपाला गेला की मनसेच्या नेत्याने थेट आयुक्तांच्या अंगावर धाव […]

अधिक वाचा..

नोकरी! विभागीय आयुक्त, छ. संभाजीनगर विभागात ‘शहर समन्वयक’ पदांची मेगाभरती; तब्बल ६४ जागा

संभाजीनगर: विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर विभागाने ‘शहर समन्वयक’ या पदासाठी तब्बल ६४ जागांची बंपर भरती काढली आहे. ही संधी म्हणजे तुमच्या करिअरला नवी दिशा देणारी सुवर्णसंधी आहे कोण अर्ज करू शकत या संधीसाठी तुम्ही खालीलपैकी कोणतीही पदवी धारण केली असेल तर तुम्ही नक्कीच अर्ज करू शकता B.E./B.Tech. (कोणत्याही शाखेतील). B. Arch B. Planning B.Sc. (कोणत्याही […]

अधिक वाचा..

भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट

मुंबई: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू आणि डॉ. विवेक जोशी यांची आज भारतीय जनता पक्षाचे (भाजपा) राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दिल्लीतील निर्वाचन सदन येथे भेट घेतली. ही भेट निवडणूक आयोगाकडून विविध राष्ट्रीय व राज्य पातळीवरील राजकीय पक्षांच्या अध्यक्षांशी सुरू असलेल्या संवादाचा एक भाग आहे. […]

अधिक वाचा..

आयुक्त गगराणी यांची विकासविरोधी धोरणे मुंबईच्या प्रगतीला अडथळा

प्रवक्ते तथा युवक मुंबई अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार; ॲड. अमोल मातेले मुंबई: “मुंबईचा विकास हा फक्त उंच इमारती बांधण्यापुरता मर्यादित नाही, तर नियोजनबद्ध प्रगती आणि प्रदूषणमुक्त शहराचा समतोल राखणे हा त्याचा गाभा आहे. परंतु सध्या बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी बांधकामांवर निर्बंध लावून मुंबईच्या विकासाच्या चाकाला अडथळा आणला आहे. ‘नावाला भूषण पण कामाला […]

अधिक वाचा..

निवडणूक आयुक्तांच्या निवड समितीत सरन्यायाधीशांऐवजी कॅबिनेट मंत्री?

दिल्ली: केंद्रीय निवडणूक आयोगात निवडणूक आयुक्त नियुक्त करण्यासाठी निवड समिती स्थापन करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले होते. यासंदर्भात दाखल याचिकेवर मार्च महिन्यात झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयानं हे निर्देश दिले होते. या निकालात न्यायालयाने पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि सरन्यायाधीशांचा या समितीत समावेश असेल, असेही जाहीर केले होते. आता केंद्रीय निवडणूक आयुक्त ठरवण्यासाठी समितीची रचना जाहीर झाली […]

अधिक वाचा..

धडाकेबाज IAS अधिकारी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी घेतली स्वेच्छा निवृत्ती

संभाजीनगर: आपल्या साध्या राहणीमानासाठी प्रसिद्ध असलेले सुनील केंद्रेकर यांनी छत्रपती संभाजीनगर येथे विक्रीकर सहआयुक्त, प्रभारी जिल्हाधिकारी, बीडचे जिल्हाधिकारी, सिडकोचे मुख्य प्रशासक, प्रभारी मनपा आयुक्त या पदावर काम केले. त्यानंतर त्यांची कृषी आयुक्त पुणे या पदावर बदली झाली. नंतर क्रीडा विभागात बदली झाली. त्यानंतर ते विभागीय आयुक्त म्हणून छत्रपती संभाजीनगर येथे परतले. धडाकेबाज आयएएस अधिकारी विभागीय […]

अधिक वाचा..

पाबळच्या ग्रामपंचायत सदस्याला विभागीय आयुक्तांचा दणका

जिल्हाधिकाऱ्यांनंतर विभागीय आयुक्तांनी रवींद्र चौधरींना ठरवले अपात्र शिक्रापूर (शेरखान शेख): पाबळ (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायतचे सदस्य रवींद्र चौधरी यांच्यावर शासकीय जागेत अतिक्रमणाचा ठपका ठेवत यापूर्वी जिल्हाधिकारी यांनी अपात्र ठरवलेले असताना त्यांनी विभागीय आयुक्तांकडे अपील केले असता विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय कायम ठेवत ग्रामपंचायत सदस्य रवींद्र श्रीरंग चौधरी यांना अपात्र ठरवले असल्याने शिरुर तालुक्यात खळबळ उडाली […]

अधिक वाचा..