देशात इंग्रज राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही व संविधान गिळंकृत करु पाहणाऱ्या प्रवृत्तींनो ‘चले जाव’

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त काँग्रेस पक्ष व सामाजिक संघटनांची पदयात्रा व हुतात्म्यांना आदरांजली मुंबई: आजच्या दिवशी १९४२ साली राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी ‘करो या मरो’चा मंत्र देत जुलुमी इंग्रजांना ‘चले जाव’चा नारा दिला. आज देशात तीच परिस्थिती आहे, हुकूमशाही प्रवृत्ती फोफावली असून ती लोकशाही व संविधान गिळंकृत करु पहात आहे. आज या प्रवृत्तीच्या विरोधात आवाज उठवण्याची […]

अधिक वाचा..

संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा संघ व भाजपाचा अजेंडा आजही कायम

संघाच्या होसबळेंचे विधान त्याच व्यापक कटाचा भाग मुंबई: भाजपा व त्यांची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पहिल्यापासूनच संविधान मान्य नाही. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा त्यांचा अजेंडा लपून राहिलेला नाही. संविधानाच्या उद्देशिकेतून सेक्युलर आणि सोशालिस्ट हे शब्द काढण्याच्या रा. स्व. संघाचे सरचिटणीस दत्तात्रय होसबळे यांच्या मागणीतून आज ते पुन्हा एकदा स्पष्ट […]

अधिक वाचा..

लोकशाही व संविधान संरक्षणाची भूमिका घेणाऱ्या पक्षांना बरोबर घेऊन काँग्रेस भाजपाविरोधात लढत राहील

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट एकत्र येत असतील तर त्यावर आक्षेप असण्याचे काही कारण नाही. पण यासंदर्भात काही ठोस समोर आल्यावरच त्यावर प्रतिक्रिया देणे उचित होईल. दुभंगलेले पक्ष, मने वा दोन भाऊ एकत्र येत असतील तर हरकत नाही. काँग्रेस पक्ष भारत जोडोचा विचार घेऊन पुढे जात आहे, सर्वांनी एकत्र येताना विभाजनवादी विचाराला मुठमाती दिली […]

अधिक वाचा..

देशात दडपशाहीचे राज्य, संविधान व अल्पसंख्यांकांना संपवण्याचे प्रयत्न, सर्व समाज भितीच्या सावटाखाली

आम्ही भारत जोडोवाले, कुटुंब फोडणारे नाही. राज व उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर स्वागतच पुणे: देशात लोकशाही व संविधानाला धाब्यावर बसवून राज्य कारभार सुरु आहे. आज सर्व समाज घटक दबावाखाली, भितीखाली जगत आहे. सत्तेतील लोक घाबरवण्याचे काम करत आहेत. याला न डगमगता एकता व अखंडतेची मशाल हाती घेऊन पुढे जाऊ आणि विरोधी पक्षनेते राहुल […]

अधिक वाचा..

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा संविधान हाती घेऊन सहकाऱ्यांसह ऐतिहासिक काळाराम मंदिरात प्रवेश

समतेचा, बंधुत्वाचा, संविधानाचा विचार नांदू दे”, अशी प्रभू रामाच्या चरणी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची कामना नाशिक: नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरातील प्रवेशासाठी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आंदोलन केले होते पण तत्कालीन व्यवस्थेने त्यांना मंदिर प्रवेश नाकराला होता. आज रामनवमीचे औचित्य साधत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भारताचा नागरिक या नात्याने बाबासाहेबांनी लिहिलेले पवित्र संविधान हाती घेऊन […]

अधिक वाचा..

संविधान हा लोकशाही मूल्यांचा पाया; डॉ. नीलम गोऱ्हे

भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विधान परिषदेत संविधान गौरव चर्चा मुंबई: भारतीय संविधान स्वीकारण्याच्या ७५ वर्षांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये संविधानाच्या गौरवशाली वाटचालीवर विशेष चर्चा झाली. या चर्चेच्या अनुषंगाने विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी भारतीय राज्यघटनेच्या ऐतिहासिक प्रवासावर, महिलांच्या योगदानावर आणि सध्याच्या परिस्थितीतील अंमलबजावणीवर सखोल विवेचन केले. सभापती राम शिंदे यांनी संविधानाच्या अमृत […]

अधिक वाचा..

भारतीय राज्यघटनेच्या ७५ व्या वर्षपूर्तीनिमित्त “संविधान गौरव महोत्सव

सहा हजार महाविद्यालयांमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन मुंबई: भारतीय राज्यघटनेच्या ७५ वर्षांच्या ऐतिहासिक पर्वानिमित्त राज्यातील सहा हजार पेक्षा अधिक महाविद्यालयांमध्ये फेब्रुवारीमध्ये संपूर्ण महिनाभर “संविधान गौरव महोत्सव” निमित्ताने विविध उपक्रमाचे आयोजन करणार असल्याची घोषणा उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केली. मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, भारतीय राज्यघटनेने भारताला एक सार्वभौम, लोकशाही प्रजासत्ताक म्हणून स्थापित केले. भारताच्या […]

अधिक वाचा..

भारतीय राज्यघटनेमुळेच भारताची जागतिक स्तरावर एक शक्तिशाली राष्ट्र म्हणून ओळख…

पटणा: जागतिक स्तरावर भारताने एक शक्तिशाली राष्ट्र म्हणून ओळख प्राप्त केली आहे.आपल्या राज्यघटनेने त्यादृष्टीने भक्कम आधारशिला प्राप्त करून दिली असल्यानेच हे शक्य झाले. लोकशाही संस्था बळकट करणे,सकारात्मक सहभाग नोंदवून संसद आणि राज्य विधानमंडळे यांचे वैभव टिकवणे आणि त्यायोगे लोक कल्याणाच्या प्रति प्रतिबद्धता सुनिश्चित करणे हे, आपले कर्तव्य आपण चोखपणे बजावले पाहिजे असे प्रतिपादन महाराष्ट्र विधान […]

अधिक वाचा..

डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संविधानाचा अवमान, संविधानाची विटंबना करणा-यांना कठोर शासन करा

मुंबई: परभणीत भारतीय राज्यघटनेची विटंबना करण्याची घटना अत्यंत निषेधार्ह आहे. हा प्रकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबडेकर व संविधानाला मानणा-या कोट्यवधी लोकांचा घोर अपमान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या पवित्र संविधानाची विटंबना करण्याचे धाडस होतेच कसे, असा संतप्त सवाल करून संविधानाची विटंबना करणा-यांच्या मुसक्या आवळून त्यांना कठोर शासन करा, असे महाराष्ट्रात प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष […]

अधिक वाचा..

संविधान दिनानिमित्त टिळक भवनमध्ये संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन

मुंबई: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय जनतेला संविधानाच्या माध्यमातून धर्मनिरपेक्ष व सामाजिक एकात्मतेचे अधिकार दिले. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने राज्यघटना स्वीकारली. २६ जानेवारी १९५० साली हे संविधान लागू करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेल्या या संविधानाला आज ७५ वर्ष पूर्ण झाली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे दादर येथील मुख्यालय टिळक भवनमध्ये संविधान दिनानिमित्त […]

अधिक वाचा..