संविधान रक्षणासाठी संघर्षाची तयारी ठेवा; अनुसूचित जातींची भूमिका महत्त्वाची; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: देशात लोकशाही आणि संविधान धोक्यात असून संविधान व लोकशाहीच्या रक्षणासाठी सर्वांनी एकजुटीने संघर्ष करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले. मुंबईतील टिळक भवन येथे महाराष्ट्र काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे नवनियुक्त चेअरमन अनिरुद्ध वनकर यांच्या पदग्रहण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष ॲड. गणेश पाटील, […]

अधिक वाचा..

जनादेशाचा बाजार, संविधानावर घाव; पक्षफोडीच्या राजकारणावर काँग्रेसची टीका

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माध्यम समन्वयक ॲड. श्रीनिवास बिक्कड यांनी जनादेशाची पायमल्ली, पक्षफोडीचे राजकारण आणि संविधानिक संस्थांच्या भूमिकेबाबत भाष्य करत सध्याच्या राजकीय घडामोडींवर टीका केली आहे. लोकशाही ही केवळ निवडणुकांची प्रक्रिया नसून जनतेच्या विश्वासाची आणि जनादेशाच्या पवित्रतेची व्यवस्था असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ‘ऑपरेशन लोटस’ आणि ‘ऑपरेशन टायगर’सारख्या राजकीय घडामोडींचा उल्लेख करत त्यांनी निवडून […]

अधिक वाचा..

‘कॉकरोच जनता पार्टी’ ते संविधानप्रेम; बदलले फक्त शब्द नव्हे, भूमिकाही!

मुंबई : सार्वजनिक जीवनात काही घटना अशा घडतात की त्यांची नोंद इतिहासापेक्षा विनोदाच्या पुस्तकात व्हावी असे वाटते. कालपर्यंत सोशल मीडियावरील एका काल्पनिक “कॉकरोच जनता पार्टी”कडे हेटाळणीने पाहणारी मंडळी आज संविधानाचे महत्त्व सांगताना दिसत आहेत, हा त्यापैकीच एक राजकीय चमत्कार ठरत आहे. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सूर्यकांत यांनी नुकत्याच एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात “संविधान हे सर्व […]

अधिक वाचा..

संविधान बदलण्याचा भाजपा-RSS चा डाव हाणून पाडा; हर्षवर्धन सपकाळ

त्रंबकेश्वर: देशातील प्रत्येक नागरिकाला हक्क व अधिकार देणाऱ्या संविधानावर आधारित देश उभारण्याचे काम काँग्रेस पक्ष करत आहे. मात्र या विचारधारेच्या विरोधात लोकांना लाचार बनवणारी, शोषणावर आधारित व्यवस्था निर्माण करण्याचा विचार भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. संविधानविरोधी मनुवादी विचारसरणीवर आधारित व्यवस्था निर्माण करण्याचा डाव उधळून […]

अधिक वाचा..

व्हॉट्सअॅपच्या गोपनीयता धोरणावर सर्वोच्च न्यायालयाचा कडक पवित्रा; ‘संविधान पाळू शकत नसाल तर भारत सोडा’

नवी दिल्ली: व्हॉट्सअॅप आणि त्याची मूळ कंपनी मेटा यांच्या २०२१ च्या गोपनीयता धोरणावर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी कडक शब्दांत ताशेरे ओढले. या धोरणामुळे वापरकर्त्यांच्या गोपनीयतेवर गदा येत असल्याचा गंभीर मुद्दा न्यायालयासमोर उपस्थित झाला. सुनावणीदरम्यान केंद्र सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी युक्तिवाद करताना व्हॉट्सअॅपचे गोपनीयता धोरण “शोषणकारी” असल्याचा आरोप केला. केवळ वापरकर्त्यांचा डेटा शेअर करणेच […]

अधिक वाचा..

संविधान सर्वसामान्यांना समजावून सांगणारा देशात दुसरा मुख्यमंत्री नाही

भारतीय संविधानाची गौरवशाली अमृत महोत्सवी वाटचाल या देवेंद्र फडणवीस लिखित पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन नागपूर: “संविधान समजून घेणारा आणि ते सर्वसामान्यांना सहज समजेल अशा भाषेत मांडणारा देशात दुसरा मुख्यमंत्री नाही,” अशा गौरवोद्गारांतून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भरभरून कौतुक केले. विधानसभेत फडणवीस यांनी केलेल्या भाषणावर आधारित ‘भारतीय संविधानाची गौरवशाली अमृतमहोत्सवी वाटचाल’ या […]

अधिक वाचा..

संविधान भारतीय माणसाचा आत्मा आहे; ॲड.अनुराधा परदेशी 

ठाणे: आपल्याला बोलायचा ,जगण्याचा,श्वास घ्यायचा अधिकार आहे हे आपण विसरून घेलो होतो.हे सर्व अधिकार आपल्याला आपल्या भारतीय संविधानामुळे परत मिळालेले आहेत. माणसाला माणसा सारख जगण्याचा अधिकार आपल्याला संविधानाने दिलाय, असे कोकण मराठी साहित्य परिषदेच्या कळवा शाखेने आयोजित केलेल्या संविधान दिनाच्या कार्यक्रमात ज्येष्ठ वकिल अनुराधा परदेशी यांनी प्रमुख वक्त्या म्हणुन संविधानावर बोलताना प्रतिपादन केले. व्यासपीठावर प्रमुख […]

अधिक वाचा..

संविधान जनमानसात रुजवणे ही काळाची गरज; ‘संविधान प्रत्येक घरात’ हा संदेश अधिक जोमाने पोहोचवू 

संभाजीनगर ही बाबासाहेबांची कर्मभूमी; संविधान सर्वसमावेशकतेचे सर्वोत्तम उदाहरनार्थ; मंत्री संजय शिरसाट छत्रपती संभाजीनगर: संविधान दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगरातील वंदे मातरम सभागृह येथे भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात प्रमुख मान्यवर म्हणून विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि सामाजिक न्याय मंत्री मा. संजय शिरसाट उपस्थित होते. कार्यक्रमास […]

अधिक वाचा..

शाखा तिथे संविधान ह्या शिवसेना अभियानाची मुंबईतुन सुरुवात….

मुंबई: शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच युवा खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून “*शाखा तिथे संविधान*” या अभियानाची सुरुवात भारतीय संविधान दिनाच्या पूर्व संध्येला शिवसेनेचे मुख्यालय बाळासाहेब भवन येथे संविधानाची प्रस्ताविका आणि भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे जाहीर वाचन करून शिवसेनेच्या नेत्या आणि विधानपरिषद सभापती निलमताई गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. […]

अधिक वाचा..

कोणत्याही परिस्थितीत संविधान आणि कायद्याचे पालन करायला हवे

मुंबई: कोणत्याही परिस्थितीत संविधान आणि कायद्याचे पालन करायला हवे. आपल्या श्रद्धेला कुणी डिवचलं तरी देखील कायदा हातात घेऊ नका, असं आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त दिल्लीत आयोजित केलेल्या कार्यक्रमातून केलं आहे. कार्यक्रमात बोलताना मोहन भागवत यांनी देशासह जगभरात सुरू असलेल्या विविध घडामोडींवर भाष्य केलं. सध्या जगभरात कट्टरता असहिष्णुता आणि […]

अधिक वाचा..