pooja-gai-shirur

Video: शिरूरमध्ये डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळेच महिलेचा जीव गेल्याचा गंभीर आरोप…

शिरूर: शिरूर शहरातील बाबुरानगर येथील एका खासगी रुग्णालयात हाताच्या फ्रॅक्चरवर शस्त्रक्रिया सुरू असताना एका विवाहित महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. पूजा राहुल गई (वय २८) असे मृत महिलेचं नाव आहे. याप्रकरणी डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळेच पत्नीचा जीव गेल्याचा गंभीर आरोप तिच्या पतीने केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिरूर शहरातील बाबुरानगर परिसरात असलेल्या ‘कोळपे मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल’मध्ये […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरूर तालुक्यात घोड नदीकाठी शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; कायदा-सुव्यवस्थेचा उडाला पुन्हा बोजवारा…?

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु करण्यासाठी गेलेल्या ५५ वर्षीय शेतकऱ्यावर दगडफेक करत कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची गंभीर घटना रविवारी (ता. २७) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. संपत गणपत काळे असे जखमी शेतकऱ्याचे नाव असून, त्यांच्या तक्रारीवरुन संजय राजाराम काळे आणि दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध शिरूर पोलिस […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरूर तालुक्यात गोळीबार करुन दहशत माजविणाऱ्या योगेश मचाले टोळीवर ‘मोक्का’…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील क्रिकेट स्पर्धेच्या वादातून बेकायदेशीर पिस्तुलाने गोळीबार करून दहशत निर्माण केल्याच्या गुन्ह्यातील कथित टोळीप्रमुख योगेश केशव मचाले व त्याच्या गुन्हेगारी टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये अर्थात ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई करण्यास विशेष पोलिस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा, कोल्हापूर परिक्षेत्र यांनी मंजुरी दिली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी सादर केलेल्या […]

अधिक वाचा..
karade-firing-case

शिरूर! करडे गोळीबार प्रकरणातील पाच आरोपी ७२ तासांत जेरबंद; पाहा नावे…

शिरूर (तेजस फडके) : करडे (ता. शिरुर) येथे जुन्या वादातून सराईत गुन्हेगारावर पिस्तुलातून तीन राउंड फायर करुन जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाच आरोपींना शिरुर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या ७२ तासांच्या आत अहिल्यानगर जिल्ह्यातून ताब्यात घेतले आहे. सुपा (ता. पारनेर) बसस्थानक परिसरात सापळा रचून करण्यात आलेल्या या कारवाईत शिरुर पोलिसांच्या डीबी पथकाने दमदार कामगिरी […]

अधिक वाचा..
ranjangaon-midc-police station

Video: रांजणगाव MIDC तील कंपनीत टेम्पो आणि रॅम्पमध्ये चेंगरून चालकाचा मृत्यू…

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या टेम्पोच्या मागील बाजूचा पडदा बांधत असताना टेम्पो अचानक मागे आल्याने रॅम्प आणि टेम्पोच्या मध्ये चेंगरून चालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी (ता. १९) पहाटे रांजणगाव MIDC परिसरातील ब्रिटानिया कंपनीत घडली आहे. दिलीप आत्माराम राठोड (वय ३४, रा. महागणपती हायस्कूलजवळ, रांजणगाव गणपती, ता. शिरूर, जि. पुणे) असे […]

अधिक वाचा..
pimple-jagtap-murder-case

शिरूर! पिंपळे जगताप पाझर तलावातील खुनाचा तीन दिवसांत छडा; तिघांना अटक; कारण उघड…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे) : पिंपळे जगताप येथील पाझर तलावात आढळलेल्या अज्ञात युवकाच्या खुनाचा शिक्रापूर पोलिसांनी अवघ्या तीन दिवसांत छडा लावला. तांत्रिक विश्लेषण, नातेवाईक व साक्षीदारांच्या चौकशीतून मृताची ओळख पटवत पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. पिंपळे जगताप (ता. शिरूर) येथील पाझर तलावात १७ जुलै २०२६ रोजी दुपारी ३.३० वाजण्यापूर्वी एका तरुणाचा मृतदेह आढळला. अज्ञात आरोपींनी […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात सर्वसामान्य दहशतीत, गुन्हेगार मोकाट; ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे केवळ ब्रीदवाक्यचं राहणार का…?

शिरूर (तेजस फडके) : महाराष्ट्र पोलिसांचे ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीदवाक्य म्हणजे ‘सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा नायनाट’ मात्र, शिरूर तालुक्यातील सध्याची कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती पाहता या ब्रीदवाक्याचा अर्थच उलटा झाला आहे का? असा संतप्त सवाल सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. पोलिस ठाण्यांच्या भिंतींवर आणि वाहनांवर झळकणारे हे ब्रीदवाक्य प्रत्यक्ष कारवाईत का दिसत नाही, याचे […]

अधिक वाचा..
ranjangaon-midc-police station

Video: शिरूर तालुक्यात स्वीट होममधील कामगाराला बेदम मारहाण…

शिरूर (तेजस फडके): समोसे देण्याच्या कारणावरुन झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर मारहाणीत झाल्याची घटना कारेगाव (ता. शिरूर) येथे घडली आहे. ‘आमच्या अगोदर दुसऱ्या व्यक्तीला समोसे का दिले…?’ असा जाब विचारत स्वीट होममध्ये काम करणाऱ्या कामगाराला मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी कारेगाव येथील दोन जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.   […]

अधिक वाचा..

साठे चौक रक्तरंजित! चाकूच्या सपासप वारांनी २१ वर्षीय तरुणाचा जीव घेतला

अंबाजोगाई: बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथे शनिवारी मध्यरात्री किरकोळ वादातून २१ वर्षीय तरुणाची चाकूने सपासप वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेत आणखी एक तरुण गंभीर जखमी झाला असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन करत आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली. मृत तरुणाचे नाव […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पती, सासू, दिराविरोधात तक्रार…

शिरूर (तेजस फडके) : विवाहानंतर अवघ्या एक महिन्यापासून पती, सासु आणि दिराने वारंवार शिवीगाळ, मारहाण व दमदाटी करुन शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप एका विवाहित महिलेने केला आहे. या प्रकरणी पीडित विवाहितेने शिरूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून, पतीसह सासू आणि दिराविरोधात कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. विद्या महेश चव्हाण (वय ३६) असे तक्रारदार […]

अधिक वाचा..