मायभूमीसाठी रक्त सांडणाऱ्या वीरांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले रक्तदान

जम्मू आणि काश्मीर (श्रीनगर):  भारतीय सैन्यदलाच्या ९२ बेस हॉस्पीटलला भेट देऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः रक्तदान करून सिन्दुर महारक्तदान यात्रेत सहभाग नोंदवला. ऑपरेशन सिन्दुरच्या यशानंतर भारतीय सैन्य दलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. सांगली येथील शिवसेनेचे चंद्रहार पाटील यांनी या ‘ सिन्दुर महारक्तदान यात्रे’ च्या आयोजनासाठी पुढाकार घेतला असून त्यांच्यासह […]

अधिक वाचा..

बिहारच्या निवडणुकीत पराभव दिसू लागल्याने रडगाणं सुरु; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राहुल गांधींवर खरमरीत टीका

निवडणुकीवर शंका घेणे म्हणजे कोट्यवधी लाडक्या बहिणींचा अपमान नवी दिल्ली: बिहारच्या निवडणुकीत पराभव दिसू लागल्याने राहुल गांधी यांचे रडगाणे सुरु आहे, अशी खरमरीत टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली. बिहारमध्ये पराभव निश्चित असल्याचा अंदाज आल्याने त्यांच रडगाणं सुरु आहे. ‘ईव्हीएम’मध्ये घोटाळा, मतांची चोरी अशा कथा रंगवून ते पार्श्वभूमी तयार करत आहेत, असा टोला त्यांनी यावेळी गांधी […]

अधिक वाचा..

ठाणे आणि परिसरातील वाहतूक कोंडी तातडीने दूर करा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

सर्व यंत्रणांनी समन्वय साधून हा परिसर वाहतूक कोंडी मुक्त करावा ठाणे: ठाणे आणि परिसरातील वाहतूक कोंडीमुळे नागरिक अतिशय त्रस्त झाले आहेत. सर्व यंत्रणांनी समन्वय साधून हा परिसर वाहतूक कोंडी मुक्त करावा. तसेच, रस्ते तातडीने दुरुस्त करून खड्डे मुक्तीसाठी उपलब्ध असलेले उत्तम तंत्रज्ञान वापरावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या […]

अधिक वाचा..

बेळगावमधील अनेक मठाधिपतींचा शिवसेनेत प्रवेश; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कर्नाटकात शिवसेना पक्ष वाढीला मिळणार चालना ठाणे: हिंदुत्वाचे विचार पुढे घेऊन जाणारे शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील अनेक मठाधिपतींनी आज शिवसेनेत पक्ष प्रवेश केला. दत्त गगनगिरी ध्यानमंदीराचे मठाधिपती प.पु. पुरषोत्तम माळी महाराज यांच्या नेतृत्वात कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी येथील १२ महाराजांनी रविवारी संध्याकाळी ठाणे येथे […]

अधिक वाचा..

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीला; महाराष्ट्राच्या राजकारणात नक्की काय घडतय

मुंबई: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज बुधवारी अचानक दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु असताना एकनाथ शिंदे यांनी दिल्ली गाठली. शिंदेंच्या दौऱ्याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती.शिंदे गटाच्या मंत्र्यांना देखील उपमुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्याविषयी माहिती देण्यात आली नव्हती. एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याविषयी माध्यमांना देखील कोणतीही माहिती देण्यात आलेली नव्हती. दिल्ली दौऱ्यात एकनाथ शिंदे पावसाळी […]

अधिक वाचा..

काचेच्या घरात राहणाऱ्यांनी इतरांवर दगड मारू नये: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शासन आपल्या दारी विशेष शिबिरातून हजारो दाखल्यांचे शिंदे यांच्या हस्ते वाटप मुंबई: काचेच्या घरात राहणाऱ्यांनी इतरांवर दगड मारू नये, असा इशारा शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज उबाठा गटाला दिला.उबाठाच्या नेत्यांनी शिवसेना नेते रामदास कदम आणि गृहराज्य मंत्री योगेश कदम यांच्यावर अधिवेशनात आरोप केले होते. या आरोपांचा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आज […]

अधिक वाचा..

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार जाहीर

मुंबई: संत साहित्य, नामभक्ती आणि समाज प्रबोधनाचा अखंड तेजोमय दीप प्रज्वलित करणाऱ्या भक्तशिरोमणी संत श्रीनामदेव महाराज यांच्या ६७५ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त, “संत श्री नामदेव महाराज फड संस्थान व संत वंशज, पंढरपूर” यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षाचे मुख्य नेते मा. श्री. एकनाथ शिंदे यांना “भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार २०२५” जाहीर […]

अधिक वाचा..

मी कोणाला छेडत नाही पण मला छेडलं तर कोणाला सोडत नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

‘म’ मराठीचा नव्हे तर मलिदा आणि मतलबाचा मुंबई: बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंच्या मुशीत तयार झालेलो मी प्रामाणिक कार्यकर्ता आहे, मी कोणाला छेडत नाही, पण मला छेडलं तर कोणाला सोडत नाही, असा निर्वाणीचा इशारा शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठा गटाला आज दिला. विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री […]

अधिक वाचा..

बच्चू कडूंचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा; म्हणाले…

यवतमाळ : एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली इथपर्यंत ठीक होतं, पण त्यांनी पक्ष आणि चिन्ह घेऊन जायला नको होतं, असा टोला बच्चू कडू यांनी लगावला. अंबोडा येथे सभेसाठी मार्गस्थ झालेल्या सात बारा कोरा पदयात्रेदरम्यान ते बोलत होते. शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव तसेच दिव्यांगांना दरमहा अर्थसहाय्य दिले जावे, यासाठी कडू यांनी डॉ. पंजाबराव देशमुख यांचे जन्मगाव […]

अधिक वाचा..

अनधिकृत बांधकामांना शासन पाठीशी घालणार नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: मुंबईतल्या अनधिकृत बांधकामांची यादी आणि त्यांचे वर्गीकरण करण्याचे निर्देश मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना देण्यात येतील. शासन कोणत्याही अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालणार नाही. जर अधिकारी अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालत असल्याचे आढळले, तर त्यांच्यावरही कठोर कारवाई केली जाईल, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले. याबाबत सदस्य पराग अळवणी यांनी प्रश्न उपस्थित केला होता. […]

अधिक वाचा..