सरकारी जागेवरील अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय

संभाजीनगर: महसूल विभागाने घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयामुळे, आता १ जानेवारी २०११ पूर्वी झालेली अतिक्रमणे नियमित केली जाणार आहेत. हा निर्णय अनेक गरजू कुटुंबांना कायमस्वरूपी घर मिळवून देणारा ठरणार आहे. या निर्णयाचा उद्देश काय आहे गावांमध्ये अनेक जुन्या रस्त्यांचा वापर बंद झाला आहे, कारण नव्या पर्यायी रस्त्यांची निर्मिती झाली आहे. बंद पडलेल्या रस्त्यांवर अनेक नागरिकांनी घरं बांधून […]

अधिक वाचा..

महसूल विभागाचा दणका! वादग्रस्त पूजा खेडकरचा पाय आणखी खोलात

मुंबई: बडतर्फ वादग्रस्त भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीत. आता श्रीमती खेडकर हिला महसूल विभागाने दणका दिला आहे. या दणक्याने खेडकर हिची नियुक्तीच कायमची रद्द होऊ शकते. वादग्रस्त पूजा खेडकर हिला प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी म्हणून पुणे येथे नियुक्ती देण्यात आली होती. या ठिकाणी त्या बीएमडब्ल्यू या महागड्या गाडीतून कार्यालयात […]

अधिक वाचा..

एसटी महामंडळातंर्गत ५ प्रादेशिक विभागांची निर्मिती

मुंबई: परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या निर्देशानुसार सुनियोजन व निर्णयाचे विकेंद्रीकरण करण्याच्या हेतूने कर्नाटक परिवहन महामंडळ धर्तीवर एसटी महामंडळातंर्गत ५ प्रादेशिक विभागांची निर्मिती करण्यात आली आहे. त्याची अंमलबजावणी करण्याचे परिपत्रक नुकतेच एस टी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ . माधव कुसेकर यांनी काढले असून पुढील काही दिवसात हे प्रादेशिक विभाग […]

अधिक वाचा..

जलसंधारण विभाग अधिक कार्यक्षम होणार; मंत्री संजय राठोड

मुंबई: मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी जलसंधारण विभागाच्या कार्यक्षमतेत वाढ आणि अनियमिततेत घट करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या राज्य जलसंधारण महामंडळाच्या आढावा बैठकीत मंत्री राठोड यांनी महामंडळाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी विविध उपाययोजना सुचविल्या. शासनाने या उपाययोजनांना मान्यता दिली असून लवकरच मुख्य सचिवांच्या मार्गदर्शनाखाली एका समितीची स्थापना केली […]

अधिक वाचा..

बिबट्याचा पशुधनावर हल्ला झाल्यास पंचनामा करण्यासाठी कार्यालयात येवून अर्ज देण्याची वनविभागाचा अजब निर्णय

शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील ग्रामीण भागात बिबट्याचे हल्ले सातत्याने वाढत आहेत. अशाच एका घटनेत सविंदणे येथे दि. २६ रोजी पहाटेच्या सुमारास बिबट्याने शेतकऱ्याच्या पशुधनावर हल्ला करून त्याला ठार केले. मात्र, नुकसान भरपाईसाठी आवश्यक पंचनाम्यासाठी संबंधित शेतकऱ्याला थेट सविंदण्यावरून शिरूरला येण्याच्या सूचना वनविभागातील कर्मचाऱ्यांनी दिल्या. त्यामुळे शेतकरी वर्गात प्रंचड तीव्र नाराजी पसरली […]

अधिक वाचा..

शासनाच्या सर्व विभागांची माहिती ‘सीएम डॅश बोर्ड’वर लवकरच उपलब्ध; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*

सीएम डॅश बोर्ड’ संकेतस्थळ आणि ‘स्वॅस’ माहिती प्रणालीचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ मुंबई: शासनाच्या सर्व विभागांची माहिती जनतेला ‘सीएम डॅश बोर्डवर’ लवकरच उपलब्ध होईल यामध्ये न्यायालय,रेरा तसेच कायदा व सुव्यवस्था या सेवांचाही समावेश करावा, ‘स्वॅस’ (S३WaaS) या माहिती तंत्रज्ञान विभाग अधिकृत प्रणालीमध्ये 34 विभागांच्या संकेतस्थळाच्या सेवांबरोबर शासनाच्या सर्व विभागांचाही लवकर समावेश करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र […]

अधिक वाचा..