पीएम किसान व नमो किसान महासन्मान योजनेतून एकही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही; धनंजय मुंडे

नागपूर: केंद्र सरकारच्या पीएम किसान व राज्य सरकारच्या नमो किसान महासन्मान योजनेतुन राज्यातील एकही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही, यादृष्टीने कृषी विभाग कृतिशील असल्याची माहिती आज कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलताना दिली. पीएम किसान योजनेसाठी राज्यातून सुमारे 96 लाख शेतकरी पात्र ठरले होते. राज्य सरकारने नमो किसान महासन्मान योजना घोषित केल्यानंतर केंद्राच्या […]

अधिक वाचा..

राज्यातील 24 जिल्ह्यात आतापर्यंत 2216 कोटी अग्रीम पीकविमा मंजूर; धनंजय मुंडे

नागपूर: राज्यातील 24 जिल्ह्यांमध्ये खरीप हंगामात पावसाचा खंड यासह विविध नैसर्गिक आपत्ती मुळे शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले, त्याबाबत प्रधानमंत्री पीकविमा योजना अंतर्गत 24 जिल्ह्यातील सुमारे 52 लाख शेतकऱ्यांना सुमारे 2216 कोटी रुपये इतका अग्रीम पीकविमा 25% प्रमाणे मंजूर करण्यात आला असून, त्यापैकी आज सकाळ पर्यंत 1690 कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले असून सुमारव 634 कोटी […]

अधिक वाचा..

महाराष्ट्र कृषी उद्योग महामंडळाची उलाढाल दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवावे; कृषी मंत्री धनंजय मुंडे

मुंबई: शेतकऱ्यांना लागणाऱ्या खते, कीटकनाशक, कृषी अवजारे तसेच शेतीमध्ये उत्पादित होणाऱ्या मालावरील प्रक्रिया उद्योग यामधील नाविन्यता शोधून महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाची उलाढाल पुढील वर्षापर्यंत दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवावे, असे निर्देश कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ मर्यादित या महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या अधिनस्त असलेला महामंडळाच्या आढावा बैठकीमध्ये ते बोलत होते […]

अधिक वाचा..

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याचे सामर्थ्य; धनंजय मुंडे

मुंबई: नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याचे सामर्थ्य आहे. यासाठी खरीप व रब्बी हंगामात शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे यासाठी हवामान बदलाचा अंदाज घेऊन माती परीक्षण आणि बीज संशोधनावर अधिकाधिक भर द्यावा, अशा सूचना कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या. मंत्रालयात नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पासंदर्भात कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचे […]

अधिक वाचा..

पीक विमा भरण्यास तीन दिवसाची मुदत वाढ; धनंजय मुंडे 

मुंबई: पीक विमा भरण्यासाठी काही ठिकाणी तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने राज्य सरकारने केंद्र सरकारकडे याबाबत विनंती केली असता, पीक विमा ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी आता आणखी तीन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विट द्वारे दिली आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी एक रुपयात पीक विमा अर्ज […]

अधिक वाचा..

खतांचे लिंकिंग करणाऱ्या कंपन्यांच्या मालकांवरही आता गुन्हे दाखल होणार; धनंजय मुंडे

मुंबई: मोठ्या व प्रसिद्ध असलेल्या कंपन्या जास्त मागणी असलेल्या खताच्या सोबत आपल्याकडे उत्पादित करण्यात आलेले परंतु विक्री होत नसलेली खते शेतकऱ्यांना खरेदी करण्यासाठी डीलर व कृषी सेवा केंद्रांना सक्ती करायला लावतात. गरज नसताना पैसे खर्चून शेतकऱ्यांना ती खते विकत घ्यावी लागतात, यावर चाप बसवण्याच्या दृष्टीने आता थेट संबंधित कंपनीच्या मालकावरच गुन्हा दाखल करण्याचे प्रावधान अस्तित्वात […]

अधिक वाचा..

मराठवाडा वॉटर ग्रीड साठी सरकार प्रयत्नशील; धनंजय मुंडे

मुंबई: ग्रामीण भागातील शेतीला समृद्धी देण्याच्या व्यापक उद्देशाने तयार करण्यात आलेली पोकरा योजना अत्यंत फायदेशीर असून ती केवळ निवडक गावांपुरती मर्यादित न ठेवता प्रत्येक गावात लागू व्हावी, असे उद्दिष्ट आहे, भविष्यात यादृष्टीने आवश्यक निर्णय घेतले जातील. जास्तीत जास्त गावातील शेतकऱ्यापर्यंत या योजनेची व्याप्ती पसरावी, असा प्रयत्न राज्य सरकार करीत आहे, अशी माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे […]

अधिक वाचा..

कृषीमंत्री धनंजय मुंडे जिल्ह्यात येताच जाणार शेतकऱ्यांच्या बांधावर

परळी वैद्यनाथ: राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे हे रविवारी सकाळी कृषी विभागाचे मंत्री पद स्वीकारल्यानंतर प्रथमच बीड जिल्ह्यात येत असून आल्याबरोबर ते शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन गोगलगायींनी नुकसान केलेल्या क्षेत्राची पाहणी करणार आहेत. कृषिमंत्री धनंजय मुंडे हे सकाळी 11 वाजल्यापासून परळी वैद्यनाथ तालुक्यातील वाघबेट, बेलंबा आदी गावांना भेटी देऊन गोगलगायींनी बाधित क्षेत्राची पाहणी करतील व प्रशासनास आवश्यक […]

अधिक वाचा..

शेतक-यांना खतासंबंधी तक्रार करण्यासाठी व्हाट्सॲप क्रमांक सुरु करा; धनंजय मुंडे 

मुंबई: खत विक्रेते शेतक-यांना विशिष्ट कंपनीचे खत घेण्यासंदर्भात सक्ती करतात किंवा अनधिकृत खते विकुन फसवणुक करतात. शेतकरी गरजेपोटी अशी सक्ती मान्य करतात. खताची लिंकिंग करणा-या अशा खत विक्रेत्यांविरुद्ध शेतक-यांना तक्रार करण्यासाठी तात्काळ व्हाट्स ॲप क्रमांक सुरु करुन तो शेतक-यांपर्यंत पोहचवा, असे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी विभागला दिले आहेत. कृषी निविष्ठा व गुण नियंत्रण […]

अधिक वाचा..

बोगस बियाणे, खते विक्री विरोधात कडक कायदा करणार; धनंजय मुंडे

मुंबई: राज्यात बोगस बियाणे, खते, कीटकनाशके यांची विक्री करणाऱ्या काही जणांवर अलीकडे कारवाई झाली आहे. मात्र बोगस बियाणे-औषधे विक्री करणाऱ्यांविरोधातील अधिक कडक कायदा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असून चालू पावसाळी अधिवेशनातच बोगसगिरी करणाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याचा अधिक कडक कायदा अस्तित्वात आणला जाईल, अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी मुंबई येथे पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या […]

अधिक वाचा..