कृषीमंत्री धनंजय मुंडे जिल्ह्यात येताच जाणार शेतकऱ्यांच्या बांधावर

महाराष्ट्र

परळी वैद्यनाथ: राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे हे रविवारी सकाळी कृषी विभागाचे मंत्री पद स्वीकारल्यानंतर प्रथमच बीड जिल्ह्यात येत असून आल्याबरोबर ते शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन गोगलगायींनी नुकसान केलेल्या क्षेत्राची पाहणी करणार आहेत.

कृषिमंत्री धनंजय मुंडे हे सकाळी 11 वाजल्यापासून परळी वैद्यनाथ तालुक्यातील वाघबेट, बेलंबा आदी गावांना भेटी देऊन गोगलगायींनी बाधित क्षेत्राची पाहणी करतील व प्रशासनास आवश्यक सूचना देतील, असे धनंजय मुंडे यांच्या संपर्क कार्यालयातून कळवण्यात आले आहे.

मागील वर्षी प्रमाणे याही वर्षी परळी, अंबाजोगाई व केज या तीन तालुक्यात प्रामुख्याने सोयाबीन पिकास गोगलगायी नष्ट करत असल्याच्या अनेक तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आहेत, त्याच पार्श्वभूमीवर कृषीमंत्री धनंजय मुंडे हे स्वतः या क्षेत्राची पाहणी करणार असून, कृषी विभागाचे अधिकारीही या दौऱ्यात सहभागी असतील.