स्वतःच्या पक्षाचा पत्ता नसलेल्या एकनाथ शिंदेंनी काँग्रेसवर बोलू नये…

मुंबई: मुंबईतील बीकेसी मैदानावरील एकनाथ शिंदे गटाच्या मेळाव्याला राज्यातील विविध भागातून सामान्य जनतेला खोटी माहिती देऊन भाडोत्री गर्दी जमवण्यात आली होती परंतु या जनतेने शिंदेचे भाषण न ऐकताच काढता पाय घेतला. राज्याचा मुख्यमंत्री हा भारतीय जनता पक्षाच्या हातचे बाहुले असल्याचे राज्यातील जनतेने काल पाहिले. एकनाथ शिंदे यांनी आपल्या गद्दारीचे समर्थन करत भारतीय जनता पक्षाने लिहून […]

अधिक वाचा..

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथीस उपस्थित रहावे

शिक्रापूर (शेरखान शेख): वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळी होणाऱ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहण्याची मागणी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील धर्मवीर संभाजी महाराज स्मृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट […]

अधिक वाचा..

मुख्यमंत्री शिंदेना महाराष्ट्रात वेदांत फॉक्सकॉन टिकवता आले नाही…

मुंबई: वेदांत फॉक्सकॉनने महाराष्ट्राऐवजी गुजरातमध्ये २० अब्ज डॉलरचा प्रकल्प उभारत असल्याचे समोर आल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे हित साधत आहेत की गुजरातचे हित साधत आहेत, असा थेट सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे. महाराष्ट्रातील मागील महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र राज्यात गुंतवणुकीसाठी वेदांत फॉक्सकॉनशी योग्य संवाद व चर्चा सुरु केली होती […]

अधिक वाचा..

पोलीस, अग्निवीर भरतीसाठी आलेल्या तरुणांना सोयी-सुविधा पुरवा: एकनाथ शिंदे 

मुंबई: पोलीस, अग्निवीर भरतीसाठी येणाऱ्या तरुणांची राहण्याची, नाश्त्याची सोय जिल्हा प्रशासनामार्फत करावी व त्याठिकाणी आवश्यक आरोग्य सुविधा पुरविण्यात याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. यासंदर्भात आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले होते. देशसेवा करण्याच्या दृष्टीने पोलीस व अग्निवीर या सेवेत भरतीसाठी युवा वर्ग उत्साहाने सहभागी होतात. त्यातील अनेक तरूण सर्वसामान्य गरीब […]

अधिक वाचा..

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन 

मुंबई: केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांच्या विजेत्यांमध्ये स्थान पटकावणाऱ्या राज्यातील तीन शिक्षकांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केले आहे. बीड जिल्ह्यातील दामुनाईकतांडा (ता. गेवराई) येथील जिल्हा परिषद शिक्षक शशिकांत कुलथे, याच जिल्ह्यातील पारगाव जोगेश्वरी येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे शिक्षक सोमनाथ बाळके तसेच, मुंबईतील छत्रभूज नरसी मेमोरियल स्कुलच्या मुख्याध्यापक कविता संघवी यांनी वर्ष […]

अधिक वाचा..

मी असा पहिलाच मुख्यमंत्री बघतोय जो लोकांच ऐकून घेतो: बच्चू कडू

अमरावती: गेल्या दोन दिवसांपासून आमरावतीमधलं राजकारण चांगलंच तापलं आहे. ‘गुवाहाटीला गेलेले आमदार’ या रवी राणांच्या टीकेवर बच्चू कडूंनी दिलेलं प्रत्युत्तर देखील स्थानिक राजकारणात चर्चेचा विषय ठरलं आहे. मात्र, एकीकडे रवी राणा यांना लक्ष्य करताना बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली आहेत. “महाराष्ट्राला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या रुपाने मजबूत माणूस मिळाला आहे”, असं बच्चू […]

अधिक वाचा..

गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफीची सवलत: एकनाथ शिंदे 

मुंबई: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना पथकर (टोल) माफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला असून त्याची अंमलबजावणी शनिवार (दि. २७) ऑगस्टपासून करण्यात येत आहे. मुंबई – बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग यावरील आणि इतर सार्वजनिक बांधकाम विभागांच्या रस्त्यांवरील पथकर नाक्यांवर ही सवलत दि. ११ सप्टेंबरपर्यंत असणार आहे. गेल्या महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]

अधिक वाचा..

बूस्टर लसीकरणाची गती वाढवावी: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज ‘कोविड व्हॅक्सिन अमृत महोत्सव’ अंतर्गत लसीकरणाचा औपचारिक प्रारंभ करण्यात आला असून राज्यातील जास्तीत जास्त नागरिकांना कोविड प्रतिबंधक लशीचा दुसरा तसेच बूस्टर डोस देण्यासाठी नियोजन करुन लसीकरणाची गती वाढवावी, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिल्या. यावेळी विधिमंडळातील समिती कक्षात सुभाष पाटील आणि […]

अधिक वाचा..
Eknath Shinde and Nathabhau Shewela

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई द्या: नाथाभाऊ शेवाळे

रांजणगाव गणपती (तेजस फडके): महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई द्या, अशी मागणी महाराष्ट्र जनता दल (सेक्युलर) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन केली आहे. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस चालू आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर अतिवृष्टी होऊन राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे, फळझाडे, […]

अधिक वाचा..

एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत…

मुंबई: एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच उद्धव ठाकरे माध्यमांशी बोलले. यावेळी बोलताना मला निश्चित दुःख झाले आहे असे त्यांनी म्हंटलं आहे. शिवाय एकनाथ शिंदे शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत असं उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदे दरम्यान सांगितलं. शिवसेनेशी बंड केल्यापासून एकनाथ शिंदे वारंवार आम्ही शिवसेनेचे आहोत. आम्ही हे सर्व हिंदुत्वासाठी करतोय असे सांगितले आहे. बाळासाहेबांचा विचार पुढे […]

अधिक वाचा..