मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार मुंबई भूषण पुरस्कार विजेत्यांचा गौरव

महाराष्ट्र

मुंबई: पुण्यश्लोक फाउंडेशन महाराष्ट्राच्या वतीने चक्रवर्ती सम्राट महाराजा यशवंतराव होळकर यांच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त यंदा मुंबई भूषण पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सामाजिक कार्यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या डॉ. विशाल मदने, उद्योजक हिरालाल पाल, शिक्षक शिवाजी शेंडगे, संस्थापक ज्ञानमंदिर हायस्कूल संस्थापक इंजिनीयर अनिल झोरे, पत्रकार ॲड. इरबा कोणापुरे, सी एस आर लीडर दादासाहेब सरगर, नव जागृती सेवाभावी बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापिका डॉ. स्मिता काळे, नागोबा फाउंडेशन ट्रस्टी कू. आकांशा शंकर विरकर, व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते निलेश मोटे, सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता सुभाष शिंदे यांचा मुंबई भूषण पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.

येत्या मंगळवारी मंत्रालयासमोरील यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्याचे कार्यक्रम अध्यक्षपद विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुलजी नार्वेकर भूषवणार आहेत. त्याचबरोबर वैभवशाली होळकर घराण्याचे वंशज माननीय युवराज यशवंत राजे होळकर ( तृतीय) यांची या सोहळ्याला विशेष अतिथी म्हणून उपस्थिती राहणार आहे. या सोहळ्या दरम्यान परीक्षा आणि मूल्यांकन मंडळ मुंबई विद्यापीठाचे संचालक डॉक्टर प्रसाद कारंडे युवा उद्योजक सागर नाझीरकर लेखक व पत्रकार भारत कविता के युवा उद्योजक योगेश राऊत यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.

तसेच या पुरस्कार वितरण सोहळ्याला प्रमुख पाहुणे उद्योग मंत्री मा. आ. उदय सामंत, सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मा. आ.तानाजी सावंत, सहकार आणि इतर मागास बहुजन कल्याण मा. आ.मंत्री अतुल सावे विधान परिषदेचे माजी सदस्य आणि माजी मंत्री मा. आ. महादेव जानकर माजी मंत्री तथा विधान परिषद सदस्य मा. आ. प्रा. राम शिंदे माजी मंत्री तथा विधानसभा सदस्य मा. आ. दत्तात्रय मामा भरणे, माजी मंत्री तथा विधानसभा सदस्य मा. आ. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू विधान परिषद सदस्य मा. आ. गोपीचंद पडळकर अतिरिक्त आयकर आयुक्त मुंबई डॉक्टर नितीन वाघमोडे आयकर उपयुक्त डॉक्टर सचिन मोटे माजी राज्यसभा सदस्य पद्मश्री डॉक्टर विकास महात्मे माजी विधान परिषद सदस्य रामहरी रुपनवर, माझी विधान परिषद सदस्य प्रकाश अण्णा शेंडगे माजी विधान परिषद सदस्य रमेश भाऊ शेंडगे माजी विधान परिषद सदस्य रामराव वडकुते यांची खास उपस्थिती राहणार आहे.

तसेच या सोहळ्याला भाजप प्रवक्ता मा. गणेशा हाके, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळी मेंढी विकास महामंडळ मा. अध्यक्ष बाळासाहेब दोलतोडे, मा. शिक्षण सभापती ठाणे मनपाचे मा. योगेश जानकर, जय मल्हार सेना सरसेनापती मा. लहुजी शेवाळे, युवा आघाडी शेकाप प्रदेशाध्यक्ष मा बाबासाहेब देशमुख यशवंत सेना सरसेनापती मा माधव गडगे धनगर समाज नेते मा उत्तम जानकर मल्हार आर्मी संस्थापक मा सुरेश भाऊ कांबळे सम्राट मौर्य सेना संस्थापक मा अर्जुन सलगर मुंबई महानगरपालिका मा संचालक मा श्री लक्ष्मण हटकर यांची सन्माननीय उपस्थिती राहणार आहे.

या सोहळ्याचे संयोजक पुण्यश्लोक फाउंडेशनचे संस्थापक तथा धनगर माझा चे संपादक संयोजक धनंजय तानले आहेत तसेच सेवानिवृत्त क्रीडा उपसंचालक यांनी मोठे या सोहळ्याचे स्वागताध्यक्ष आणि सिडको युनियन लीडर अनिल राऊत सोहळ्याचे कार्याध्यक्ष पद भूषवणार आहेत. या सोहळ्याच्या संयोजन समितीमध्ये डॉक्टर विजय पाटील ऍड नितीन शेजार राजाराम काळे नाना राजगे अशोक पाटील सागर सुरवसे जालिंदर वाघमोडे अमुक सिद्ध पाटील समाधान बागल अण्णा वावरे उपाध्यक्ष भुजंगराव दुधाळे सचिव राजेंद्र गाडेकर डॉक्टर झुंजारराव बडदे सौ रुक्मिणी धरमे, सौ रेशमा खरात घोडके सौ दीप्ती ताणले, मीना सूर्यवंशी, विश्वनाथ साळकर यांचा समावेश आहे.

या सोहळ्याला उद्योजक सर्वश्री दत्तात्रय यमगर, पांडुरंग धायगुडे, प्रकाश शेळके, ज्ञानेश्वर परदेशी, राजू जांभळे, प्रकाश चराटे, केशव तरंगे, प्रा. शिवाजी सरगर, प्रा प्रमोद भिडे, शिक्षक नेते हरीश बुरंगे, सदानंद लाळगे, साईनाथ बंडगर, विकास लांबोरे, महादेव इरकर, राज बंडगर, धनाजी धायगुडे, अजित लाडे हे निमंत्रक आहेत.

या सोहळ्याला महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच, अहिल्या शिक्षक संघ, नवी मुंबई, धनगर समाज सेवा संस्था, सरगर समाज संघर्ष समिती ठाणे, ओम साई मित्र मंडळ ठाणे, यशवंत सेना मुंबई, महाराष्ट्र, यशवंत सेना, ऋणानुबंध सामाजिक संस्था मुंबई, राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान नवी मुंबई, पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेडीकोज असोसिएशन, उत्तर महाराष्ट्र धनगर समाज महासंघ, आदर्श पाल समाज ठाणे, कोरबा संघ, मुंबई, धनगर समाज उन्नती मंडळ ठाणे, धनगर प्रतिष्ठान ठाणे, मानगंगा प्रतिष्ठान ठाणे, धनगर प्राध्यापक महासंघ, यशवंत संघर्ष सेना, राजमाता अहिल्यादेवी सेवा संस्था कामोठे, अथर्व जेष्ठ नागरिक कल्याण मंडळ नेरुळ, महाराष्ट्र क्रांती संघटना, मुंबई धनगर समाज एकीकरण समिती आणि धनगर समाज उत्कर्ष महासंघ मुंबई यांचा विशेष सहभाग राहणार आहे.

 

हे आहेत यंदाचे पुरस्काराचे मानकरी

डॉ.विशाल मदने, उद्योजक हिरालाल पाल, शिक्षक शिवाजी शेंडगे, संस्थापक ज्ञानमंदिर हायस्कूल संस्थापक इंजिनीयर अनिल झोरे, पत्रकार ॲड. इरबा कोणापुरे, सी एस आर लीडर दादासाहेब सरगर, नव जागृती सेवाभावी बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापिका डॉ. स्मिता काळे, नागोबा फाउंडेशन ट्रस्टी कू. आकांशा शंकर विरकर, व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते निलेश मोटे, सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता सुभाष शिंदे यांचा विशेष सन्मान परीक्षा आणि मूल्यांकन मंडळ मुंबई विद्यापीठाचे संचालक डॉक्टर प्रसाद कारंडे युवा उद्योजक सागर नाझीरकर लेखक व पत्रकार भारत कविता के युवा उद्योजक योगेश राऊत यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.