उद्धव ठाकरेंच्या हातून शिवसेना आणि धनुष्यबाण निसटले…

महाराष्ट्र

आता शिवसेना व धनुष्यबाण एकनाथ शिंदेंचाच…

औरंगाबाद: शिवसेना कुणाची याचा निर्णय अखेर झाला. केंद्रीय निवडणूक आयोगाने अखेर आपला निर्णय जाहीर केला. उद्धव ठाकरे यांना मोठा झटका बसला आहे. शिवसेना नाव आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना मिळाला आहे.

उद्धव ठाकरेंच्या हातून शिवसेना गेली…

होय, केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आणणारा फैसला अखेर सुनावला. निवडणूक आयोगातील कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष असताना केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिलं. निवडणूक आयोगाने शुक्रवारी सायंकाळी हा निर्णय दिला. निवडणूक आयोगाचा निर्णय हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का असून, आता ठाकरे काय भूमिका घेणार? सुप्रीम कोर्टाचं दार ठोठावणार का? हे पाहावं लागेल.

एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना घेऊन शिवसेना पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर शिवसेना पक्षावर आणि चिन्हावर त्यांनी दावा केला होता. निवडणूक आयोगासमोर याची लढाई सुरु होती. आज निवडणूक आयोगानं याबाबतचा निर्णय दिला आहे. यात उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव देखील मिळालं आहे. त्यामुळे यापुढे एकनाथ शिंदे यांचीच शिवेसना असणार आहे. ठाकरे कुटुंबाकडून शिवसेना निसटली आहे.