शिवसेनेच्या बॅनरवरुन एकनाथ शिंदेचा फोटो गायब, फक्त त्यांचाच भगव्या शालीतला एकच मोठा फोटो

मुंबई: काही दिवसांपूर्वी मुंबईच्या आमदार निवासातील कँटिनच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेले शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड हे सध्या पक्षात नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. यासाठी बुलढाण्यातील चिखली येथे होत असलेल्या शिंदे गटाचा संवाद मेळाव्यातील एक बॅनर कारणीभूत ठरला आहे. या बॅनरवर संजय गायकवाड यांचा स्वत:चा भगवी शाल परिधान केलेला आणि त्यांच्या मुलाचा […]

अधिक वाचा..

मोठी बातमी! एकनाथ शिंदेंचा अजित पवारांना जबर धक्का 

मुंबई: राज्यात कोणत्याही क्षणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा होऊ शकते. हीच बाब लक्षात घेता वेगवेगळ्या महापालिकांवर आपलीच सत्ता यावी यासाठी राज्यातील पक्ष कामाला लागले आहेत. युती आणि आघाडीच्या माध्यमातून बेरजेचे राजकारण करण्यात येत आहे. तर दुसरीकडे नेतेमंडळीही आपल्या सोईसाठी पक्षांतर करत आहेत. असे असतानाच आता पुण्यातून मोठी माहिती समोर येत आहे. इथे मोठ्या राजकीय […]

अधिक वाचा..

एकनाथ शिंदेंचा एक घाव दोन तुकडे, केलं मोठं वक्तव्य

मुंबई: शिवसेना शिंदे गटाचे काही आमदार आणि मंत्री वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचं पाहायला मिळत आहे. आमदार संजय गायकवाड यांनी शिळे आणि खराब अन्नपदार्थ दिल्याचा आरोप करत आकाशवाणी आमदार निवास येथील कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण केली होती, हे प्रकरण चांगलंच तापलं होतं, त्यानंतर शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांचा बॅगेसोबतचा एक व्हिडीओ समोर आला, त्या बॅगेमध्ये पैसे असल्याचा आरोप […]

अधिक वाचा..

एकनाथ शिंदेंची ताकद वाढली! ठाकरे बंधूंच्या २ शिलेदारांनी हाती धरलं धनुष्यबाण

५०० कार्यकर्त्यांचाही शिंदे गटात प्रवेश मुंबई: महानगरपालिका निवडणुका जवळ आल्या असून, सत्ता काबीज करण्यासाठी महायुती आणि महाआघाडीने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार असल्याचे संकेत दिसत असतानाच, शिवसेना शिंदे गट अधिक बळकट होताना दिसतो आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. मुंबईची सत्ता काबीज करण्यासाठी महायुती तसेच महाआघाडीनं […]

अधिक वाचा..

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या ‘या’ नेत्याने उघड केली नाराजी

नाशिक: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीकाटिप्पणी केली जात आहे. अनेक नेतेमंडळीही भाजप असो वा शिंदे गट यामध्ये प्रवेश करताना दिसत आहे, असे असताना आता शिंदे गटाचे नेते आणि माजी खासदार हेमंत गोडसे यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. ‘मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नाराज नाही. पण पक्षांतर्गत […]

अधिक वाचा..

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला ठाकरेंचा सुरुंग! भाजप प्रदेशाध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात दे धक्का

काँग्रेस, राष्ट्रवादीतूनही इन्कमिंग मुंबई: भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा बालेकिल्ला असलेल्या डोंबवलीमध्येच शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाने भाजपसह एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे. डोंबिवलीमधील शिंदेंच्या शिवसेनसह राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षातील 200 हून अधिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख दीपश म्हात्रे यांनी पक्षप्रवेश […]

अधिक वाचा..

नाशिकमध्ये एकनाथ शिंदे यांचा उबाठा गटाला जोर का धक्का…

संपलेला पक्ष असा उल्लेख केलेल्या पक्षासोबत युतीसाठी विनवण्या करण्याची उबाठा गटावर आली वेळ ठाणे: नाशिकमधील उबाठा गटाचे माजी महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्यासह नाशिक महानगरपालिकेतील सात नगरसेवक, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांनी आज शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. पक्षप्रवेश झालेल्यामध्ये नाशिक मनपातील माजी नगरसेवक […]

अधिक वाचा..

कोल्हापूर जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांचा काँग्रेसला जोरदार धक्का

कोल्हापूर मनपातील 25 माजी नगरसेवकांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश मुंबई: कोल्हापूर महानगरपालिकेतील 25 माजी नगरसेवक आणि काँग्रेसच्या असंख्य पदाधिकाऱ्यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला. यात कोल्हापूर मनपामधील तीन माजी महापौरांचाही समावेश आहे. या सर्वांचे शिंदेंनी पक्षात स्वागत करून आगामी मनपा निवडणुकांच्या रणांगणात पक्षाच्या वतीने शड्डू ठोकला आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या मुक्तागिरी या शासकीय […]

अधिक वाचा..

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अडचणी वाढणार…

नगरविकास मंत्रालयाचा आणखी एक भूखंड घोटाळा? मुंबई: नागपूर येथील भूखंड घोटाळ्यामुळे हिवाळी अधिवेशनात विरोधकांच्या तडाख्यात सापडलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अडचणी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. शिंदे हे नगरविकास मंत्री असताना वांद्रेतील अनाथालयाच्या ट्रस्टची मालमत्ता अनारक्षित केली गेली व ती विश्वस्तांनी धर्मदाय आयुक्तांची परवानगी नसताना के.बी.के. रिअल्टरला वाणिज्य विकासकामांसाठी विकली, असा आरोप करीत मुंबईतील रहिवासी किरण […]

अधिक वाचा..