मांडवगण फराटा ग्रामपंचायतमध्ये कमळ फुलले, घड्याळाची टिकटिक मात्र बंद

मुख्य बातम्या

दादा पाटील फराटे यांच्या पॅनलचा 11-6 ने दणदणीत विजय

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे दादा पाटील फराटे यांच्या पॅनेलने सरपंचपद जिकंत ११-६ ने दणदणीत विजय संपादन केला असून त्यांची सुन समीक्षा कुरुमकर(फराटे) यांची थेट जनतेतून सरपंचपदी वर्णी लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या निवडणुकीत सपशेल हार मानावी लागली असून आमदार अशोक पवार यांना यामुळे मोठा धक्का बसल्याचे मानला जात आहे.

शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा हि सर्वात मोठी ग्रामपंचायत मानली जात आहे. यापुर्वी भाजपचे दादा पाटील फराटे व शिवसेनेचे सुधीर फराटे यांनी गावच्या सोसायटीवर विजय मिळवला होता. त्याचप्रमाणे पुन्हा ग्रामपंचायतीमध्ये एकहाती सत्ता प्रस्थापित केल्याने राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवार यांच्या स्थानिक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची पिछेहाट झाली आहे. यामुळे आगामी जिल्हा परीषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमिवर हा विजय महत्वाचा मानला जात आहे.

घोडगंगा साखर कारखान्याच्या निवडणुकीतही मांडवगण, इनामगाव आणि वडगाव रासाई गटात मतदारांनी अशोक पवारांपेक्षा दादा पाटील फराटे यांना जास्त मताधिक्य दिलं होत. तसंच आताही ग्रामपंचायत निवडणुकीत दादा पाटील फराटे यांच्या पॅनलला बहुमत देऊन मतदारांनी दादा पाटील फराटे आणि सुधीर फराटे यांच्या नेतृत्वाला साथ दिल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.