प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदेंचा जलवा

सातारा: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नूतन प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे यांचे मायभूमी सातारा जिल्ह्यात शनिवारी धमाकेदार स्वागत करण्यात आले. शिरवळपासून कराडपर्यंत आ. शशिकांत शिंदे यांचा जलवा पाहायला मिळाला. फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांनी तोबा गर्दी केली. यावेळी सातार्‍यासह ठिकठिकाणी जेसीबीमधून त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. महाकाय क्रेनच्या सहाय्याने आ. शशिकांत शिंदे यांना पुष्पहार घालण्यात […]

अधिक वाचा..

रामलिंग महिला उन्नतीच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त ‘गुरुरत्न पुरस्कार’ वितरण सोहळा

शिरुर (किरण शेलार-पिंगळे) गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने ‘गुरुरत्न पुरस्कार’ वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी समाजात सकारात्मक दिशा देणारे, मार्गदर्शक ठरणारे व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला. आई-वडील, शिक्षक आणि जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला योग्य मार्गदर्शन करणाऱ्या व्यक्ती हीच खरी गुरुस्थाने असून, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांच्या हितासाठी खरीप हंगाम नियोजन बैठक उत्साहात पार; आमदार माऊली कटके यांचे मार्गदर्शन

शिरूर (अरुणकुमार मोटे): शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी शेती विभागाने अधिक गतिशीलतेने काम करावे, असे आवाहन आमदार ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली आबा कटके यांनी केले. शिरूर तहसील कार्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावरील सभागृहात आज सकाळी 10 वाजता खरीप हंगाम नियोजन व आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ही बैठक तालुका कृषी अधिकारी शिरूर व हवेली आणि पंचायत समिती शिरूर व हवेली […]

अधिक वाचा..

कासारीत शासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत महिलादिन उत्साहात साजरा..

शिक्रापूर (योगेश शेंडगे): शिरूर तालुक्यातील ग्रामपंचायत कासारी येथील कल्पतरू महिला ग्रामसंघ यांनी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत वार्षिक सर्वसाधारण सभा व सायबर सुरक्षा प्रशिक्षणाच्या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे केले होते. जागतिक महिला दिनानिमित्त प्रथमच कासारी गावात एवढ्या मोठ्या प्रमाणात तालुक्यातील अधिकाऱ्यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून बाळासाहेब मस्के (तहसीलदार शिरूर), […]

अधिक वाचा..

पन्नास वर्षे पायी वारी करणाऱ्या बाळासाहेब फराटे यांचा ‘वारी सुवर्ण सोहळा’ मोठ्या उत्साहात साजरा

वयाच्या बाराव्या वर्षापासून आळंदी ते पंढरपूर पायी वारी करणारे बाळासाहेब फराटे यांनी केली पन्नास वेळा पायी वारी  शिरूर (तेजस फडके): मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथील अखंड पन्नास वर्षे पंढरीची पायी वारी करणाऱ्या बाळासाहेब आत्माराम फराटे (नाना) यांची आंळदी ते पंढरपूर सलग पन्नास वर्ष परिपूर्ण वारीचे औचित्य साधुन ” वारी सुवर्ण सोहळा ” मोठ्या उत्साहाच्या वातावरणात […]

अधिक वाचा..

शिरुर येथील बालाजी विश्व विद्यालयात योग दिन उत्साहात साजरा

शिरुर (तेजस फडके): आपलं जीवन समृद्ध करायच असेल तसेच शरीर संपत्ती वाढवायची असेल आणि आजारांपासून बचाव करायचा असेल तर व्यायामाशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन शिरुर येथील बालाजी विश्व विद्यालयाचे मुख्याध्यापक विनायक म्हसवडे यांनी केले. तसेच आरोग्यासाठी व्यायामाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देत योगदिनाचे औचित्य साधत (दि 21) रोजी स्वतः योगाचे प्रात्यक्षिक मुलांना करुन दाखविले. यामध्ये उभे […]

अधिक वाचा..

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस तयार, भाजपाचा पराभव करण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

मुंबई: केंद्रातील नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारचे काऊंटडाऊन सुरु झाले आहे. ९ वर्षांपासून लूट सुरु असून जनतेच्या खिशातील पैसा उद्योगपती मित्रांच्या घशात घातला जात आहे. जनता या लुटीला कंटाळली असून लोकसभा निवडणुकीत भाजपाला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही. देशात परिवर्तनाचे वारे वाहत असून काँग्रेस हाच पर्याय जनतेला दिसत आहे. काँग्रेसच्या दोन दिवसीय आढावा बैठकीतही या […]

अधिक वाचा..

शिक्रापूरसह परिसरात रमजान ईद उत्साहात साजरी

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरूर) सह जवळील कोरेगाव भिमा, सणसवाडी, तळेगाव ढमढेरे, पाबळ यांसह आदी गावांमध्ये रमजान ईद निमित्त सामुहिक नमाज पठन करत एकमेकांना शुभेच्छा देत एक आगळ्या वेगळ्या उत्साहात मुस्लिम धर्मियांचा मुख्य व पवित्र असा रमजान ईद सण साजरा करण्यात आला असून मुस्लिम बांधवांनी देखील आनंद व्यक्त केला आहे. शिक्रापूर (ता. शिरूर) सह […]

अधिक वाचा..

रमजान शांततेत व उत्साहात पार पाडा; प्रमोद क्षिरसागर

शिक्रापूर: मुस्लिम धर्मियांचा पवित्र महिना म्हणजे रमजान असून देव देवतांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मुस्लिम नागरिकांनी सर्व धर्मांना एकत्रित घेऊन रमजान ईद सण शांततेत व व्यवस्थित साजरा करावा असे आवाहन शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांनी शिक्रापूर व परिसरातील मुस्लिम बांधवांना केले आहे. शिक्रापूर (ता. शिरूर) येथे मुस्लिम बांधवांच्या रमजान महिन्याच्या अनुषंगाने शिक्रापूर पोलीस […]

अधिक वाचा..

आरणगावात शिवजयंती उत्साहात साजरी

शिक्रापूर (शेरखान शेख): आरणगाव (ता. शिरुर) येथे श्री राजा शिवछत्रपती तरुण मंडळाच्या वतीने शिवजयंतीच्या निमित्ताने राजगड किल्ल्याहून शिवज्योत आणत गावातील शिवज्योतीची मिरवणूक काढून शिवव्याख्याते सुनीता ठोबरे यांच्या सूश्राव्य व्याख्यानाने शिवजजयंती साजरी करण्यात आली आहे. आरणगाव (ता. शिरुर) येथे श्री राजा शिवछत्रपती तरुण मंडळाच्या वतीने शिवजयंतीचे आयोजन करण्यात आले असताना सकाळच्या सुमारास किल्ले राजगड येथील शिवज्योत […]

अधिक वाचा..