शिरुर येथील बालाजी विश्व विद्यालयात योग दिन उत्साहात साजरा

शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके): आपलं जीवन समृद्ध करायच असेल तसेच शरीर संपत्ती वाढवायची असेल आणि आजारांपासून बचाव करायचा असेल तर व्यायामाशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन शिरुर येथील बालाजी विश्व विद्यालयाचे मुख्याध्यापक विनायक म्हसवडे यांनी केले. तसेच आरोग्यासाठी व्यायामाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देत योगदिनाचे औचित्य साधत (दि 21) रोजी स्वतः योगाचे प्रात्यक्षिक मुलांना करुन दाखविले. यामध्ये उभे आणि बैठे योगासने, सूर्यनमस्कार आदी योगप्रकार यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केले.

शिरुर येथील बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ नेहमी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा विचार करते. या संस्थेचे अध्यक्ष सदाशिव पवार यांच्या संकल्पनेतुन दरवर्षी शाळेत विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यांचा एकच मानस आहे की, बालाजीचा विद्यार्थी सर्वांगपूर्ण झाला पाहिजे असा त्यांचा मानस असुन कुठलेही क्षेत्र असो आपला विद्यार्थी मागे पडता कामा नये हाच त्यांचा प्रयत्न असतो.

बालाजी विश्व विद्यालयात तिथीनुसार विविध दिन साजरे केले जातात. महापुरुषांची पुण्यतिथी, जयंती, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. तसेच खेळ, वक्तृत्व, निबंध अशा विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थी प्राविण्य मिळवतात. शैक्षणिक वर्ष 2023-24 नुकतेच सुरू झाले आहे आणि यावर्षीचा पहिला कार्यक्रम म्हणून 21 जून रोजी जागतिक योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपमुख्याध्यापिका स्वाती चत्तर यांनीही विद्यार्थ्यांना योगाचे प्रकार करून दाखवले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी क्रीडा शिक्षक दीपक कोठावळे तसेच सर्व शिक्षकांनी मोलाची कामगिरी बजावली.