शेतकऱ्यांची दिवाळी स्मशानभूमीत; बघा शेतकऱ्यांचे अनोखे आंदोलन…

औरंगाबाद: राज्यात परतीच्या पावसाने झालेल्या पिकांचे नुकसानीमुळे विरोधी पक्षांसह राज्यातील शेतकऱ्यांनी सरकारकडे मदत मागितली आहे. परंतु राज्य सरकारकडून अद्यापही औरंगाबाद जिल्ह्यात पिकांचे पंचनामे होत नसल्याने शेतकऱ्यांनी अनोखे आंदोलन करुन सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्याच्या वायगाव येथील शेतकरी आपली दिवाळी चक्क स्मशानभुमीत साजरी केली आहे. सरकारने आमच्याकडे कुठल्याही प्रकारचे लक्ष दिलेली नाही, […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात विषारी सर्पदंशाने शेतकऱ्याच्या गाईचा काही क्षणात तरफडून मृत्यू…

सविंदणे (अरुणकुमार मोटे): कवठे येमाई (ता. शिरुर) येथील वागदरे वस्ती नजीक घोणस या जातीच्या सापाने हरीभाऊ वागदरे यांच्या दुभत्या जर्शी गायीच्या तोंडास चावल्याने काही मिनीटातच त्या गाईचा सापाच्या विष बाधेने तरफडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. वागदरे वस्तीत राहणारे गिताराम हरिभाऊ वागदरे यांचा नातू ओंकार हा नेहमी प्रमाणे जनावरे, शेळ्या घेऊन जवळील उसाच्या शेतीनजीकच्या मोकळ्या रानात […]

अधिक वाचा..

शिरुर पोलिसांची कामगिरी, चोरी गेलेल्या विद्युत मोटारी शेतकऱ्यांना सुपूर्द…

सविंदणे (अरुणकुमार मोटे): आमदाबाद (ता. शिरुर) येथिल घोडनदी किनाऱ्यावरुन शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या 8 शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी (दि. २८) मे रोजी एकाच वेळी अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या होत्या. अंदाजे दीड लाख रुपयांच्या विद्युत मोटारी चोरीस गेल्याची फिर्याद शिरुर पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली होती. तसेच वारंवार विद्युत मोटारी चोरीचे सत्र सुरु झाले होते. बेट भागात विद्युत […]

अधिक वाचा..

अंबादास दानवे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची घेणार भेट…

संभाजीनगर: शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. सत्तेत आल्यावर राजकारण करण्यात व्यस्त असलेल्या सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या असल्याचा गंभीर आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी विरोधी पक्षनेते दानवे हे रविवार (दि. ४) सप्टेंबर रोजी बीड जिल्ह्याच्या […]

अधिक वाचा..

एका शेतकऱ्याच्या शेतातील ऐंशी टन ऊसाची चोरी: दोघांवर गुन्हे दाखल

शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता. शिरुर) येथील एका शेतकऱ्याच्या शेतातील ऊसाची शेतकऱ्याच्या परस्पर शेतातील 80 टन ऊसाची चोरी केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे संतोष बबन ढोकले व नितीश बबन ढोकले या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. करंदी (ता. शिरुर) येथील महेश ढोकले यांच्या अडीच एकर शेतात सहा महिन्यांचा ऊस लावलेला आहे, […]

अधिक वाचा..

कृषीमंत्र्यांचा शेती व शेतकऱ्यांशी काहीही संबंध नाही; केवळ इव्हेंटबाजी सुरु

मुंबई: अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असताना राज्य सरकारकडून केवळ मदतीची घोषणा केली आहे. ही मदत अजून शेतकऱ्यांना मिळालेली नाही. राज्यातील भाजपाप्रणित ईडी सरकार हे हिंदू हिताचा केवळ दिखावा करत आहे. प्रत्यक्षात हे सरकार शेतकरी विरोधी आहे. हिंदूंचे सरकार आले असून सण, उत्सव आनंदात साजरा करा असा डांगोरा पिटणाऱ्यांच्या राज्यातच हिंदू शेतकरी मात्र मदतीपासून वंचित […]

अधिक वाचा..

शेतकरी आणि सर्वसामान्यांना दिलासा मिळावा: जयंत पाटील

मुंबई: देशातील न्यायव्यवस्था उत्तम रहावी, अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा तसेच मध्यमवर्गीयांच्या मानगुटीवर बसलेला महागाईचा राक्षस नष्ट व्हावा, असे साकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी गणरायाला घातले. कोरोनाचे सावट कमी झाल्यानंतर आज दोन वर्षानंतर राज्यभरात गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या निवासस्थानीही […]

अधिक वाचा..

मोसंबीला लागलेल्या बुरशी रोगाची अंबादास दानवे यांनी केली पाहणी

जालना: जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील बहिरगड गावात राहणाऱ्या राधाकिसन दिवटे या शेतकऱ्याच्या मोसंबी बागेची पाहणी आज (दि. 28) रोजी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. मोसंबीला बुरशी रोगाची लागण झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अद्याप शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे देखील झाले नाही. त्यांना मदत मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दानवे […]

अधिक वाचा..

२५ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या पण शेतकऱ्यांसाठी दमडी नाही: नाना पटोले

शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शिंदे-फडणवीस सरकारचे दुर्लक्ष मुंबई: राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ओला दुष्काळ जाहीर करण्याची गरज आहे. परंतु एकनाथ शिंदे- फडणवीस सरकार मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे. शेतकऱ्यांसाठी केवळ मदत जाहीर केली तीसुद्धा तुटपुंजी आहे. २५ हजार कोटी रुपयांच्या पुरवण्या मागण्या सादर करण्यास आल्या पण त्यात शेतकऱ्यांसाठी दमडीची तरदूत केली नाही हे […]

अधिक वाचा..
Ajit Pawar

पावसाची आकडेवारी शेतकऱ्यांसाठी बंद, राज्य शासनाचा संशयास्पद निर्णय: अजित पवार

मुंबई: पीक विमा योजनेचा लाभ मिळण्यासाठी शेतकरी हवामान विषयक आकडेवारीचा अभ्यास करत असतात, मात्र गेल्या महिन्यापासून (दि. १५ जुलै २०२२) राज्य शासनाने सरकारी संकेतस्थळावर पावसाची माहिती देणे अचानकपणे बंद केले आहे. विमा कंपन्यांच्या फायद्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला असल्याचा शेतकरी हिताचा महत्वाचा मुद्दा विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून सभागृहात मांडला. […]

अधिक वाचा..