एका शेतकऱ्याच्या शेतातील ऐंशी टन ऊसाची चोरी: दोघांवर गुन्हे दाखल

क्राईम

शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता. शिरुर) येथील एका शेतकऱ्याच्या शेतातील ऊसाची शेतकऱ्याच्या परस्पर शेतातील 80 टन ऊसाची चोरी केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे संतोष बबन ढोकले व नितीश बबन ढोकले या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

करंदी (ता. शिरुर) येथील महेश ढोकले यांच्या अडीच एकर शेतात सहा महिन्यांचा ऊस लावलेला आहे, दहा ऑगस्ट रोजी महेश यांची आई शेतात गेलेली असताना संतोष ढोकले व नितीश ढोकले हे दोघे शेतात उभे होते त्यावेळी ते महेश यांच्या शेतातील ऊस अन्य लोकांना घेऊन जा असे सांगत होते, तर 1 सप्टेबर रोजी महेश हे शेतात गेले असता त्यांना त्यांच्या शेतातील सर्व ऊस चोरीला गेल्याचे निदर्शनास आले.

याबाबत महेश गोरक्ष ढोकले (वय 31) रा. करंदी (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी संतोष बबन ढोकले व नितीश बबन ढोकले दोघे रा. करंदी (ता. शिरुर) जि. पुणे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक भरत कोळी हे करत आहे.