शेतकऱ्यांच्या शिवारात उभे असलेले सोनेरी पीक काही क्षणांत नष्ट

सोलापूर: शेतकऱ्यांच्या शिवारात उभे असलेले सोनेरी पीक काही क्षणांत नष्ट झाले. शेतकरी डोळ्यांत अश्रू घेऊन आपला संसार उद्ध्वस्त होताना बघत आहे. शेतकऱ्यांना पंचनाम्याच्या प्रक्रियेत अडकवून अधिक मानसिक छळ देण्यापेक्षा सरसकट नुकसानभरपाई देणे हाच योग्य मार्ग आहे. त्यामुळे एकरी किमान ₹५०,००० इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ […]

अधिक वाचा..

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मार्गदर्शक व्यक्तिमत्व हरपले

डॉ. दीपक टिळक यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भावपूर्ण श्रद्धांजली मुंबई: लोकमान्य टिळकांचे पणतू, केसरी’चे विश्वस्त-संपादक आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती डॉ. दीपक टिळक यांच्या निधनाने सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मार्गदर्शक व्यक्तित्व हरपले, अशा शोकभावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केल्या. डॉ. दीपक टिळक यांच्या निधनावर दु:ख व्यक्त करून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष […]

अधिक वाचा..

क्रिकेट व सिनेमा क्षेत्रांचा चालताबोलता ज्ञानकोष हरपला…

मुंबई: “कोट्यवधी भारतीयांचं वेड असलेल्या क्रिकेट व सिनेमा क्षेत्रांचा चालताबोलता ज्ञानकोष ही शिरीष कणेकर यांची ओळख होती. क्रिकेट, सिनेमासह अनेक क्षेत्रातील रंजक गोष्टींचा खजिना त्यांच्याकडे होता. या रंजक गोष्टी खुमासदार शैलीत लिहिण्याची, सांगण्याची कला त्यांच्याकडे होती. या कलागुणांच्या जोरावर त्यांनी क्रिकेट, सिनेमावेड्या मराठी माणसांच्या हृदयात स्थान मिळवलं होतं. त्यांचं निधन ही महाराष्ट्राला चटका लावणारी घटना […]

अधिक वाचा..

विठ्ठलवाडीत शेतातील पिके नांगरुन कुटुंबाला मारहाण

शिक्रापूर (शेरखान शेख): विठ्ठलवाडी (ता. शिरुर) येथे शेताच्या वादातून शेतकऱ्याच्या शेतातील पिकांसह जनावरांचा चारा 3 ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरून नुकसान करत शेतकऱ्यासह त्याच्या कुटुंबियांना मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे योगेश पांडुरंग गवारी, दिपक दत्तात्रय गवारी, महेश दत्तात्रय गवारी, संभाजी पांडुरंग गवारी, भूषण गुरुनाथ गवारी, गुरुनाथ केरबा गवारी यांच्या विरुद्ध […]

अधिक वाचा..

शेततळ्यासाठी चार हजारावर शेतकऱ्यांच्या अर्जावर प्रक्रिया

शिक्रापूर (शेरखान शेख): राज्यात मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजने अंतर्गत वैयक्तिक शेततळ्यांसाठी ६ हजार ४१२ शेतकऱ्यांची सोडत पद्धतीने निवड करण्यात आली असून त्यापैकी तांत्रिक कारणामुळे नाकारण्यात आलेले आणि शेतकऱ्यांनीच रद्द केलेले अर्ज वगळता ४ हजार १३७ शेतकऱ्यांच्या अर्जावरील कार्यवाही सुरु असल्याची माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याच्या विविध भागातील पावसातील अनिश्चित येणाऱ्या […]

अधिक वाचा..

शेत, पाणंद व शिवरस्ते खुले करण्यासाठी विशेष मोहिम राबविणार

मुंबई: शेतकऱ्यांच्या शेतीला दळणवळणासाठी रस्त्याच्या अडचणी निर्माण होत आहेत. त्यासाठी गावनकाशाप्रमाणे अतिक्रमित व बंद झालेले गाडीवाट, रस्ते, पाणंद, पांधण, शेतरस्ते, शिवार रस्ते, शेतावर जाण्या-येण्याचे रस्ते खुले करण्यासाठी मिशनमोडवर विशेष अभियान राबवण्यात येईल, असे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानसभेत सांगितले विधानसभा सदस्य अभिमन्यु पवार यांनी याबाबत लक्षवेधी सूचना विधानसभेत मांडली होती. मंत्री विखे-पाटील म्हणाले, राज्यातील शेत […]

अधिक वाचा..

कासारीत विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

शिक्रापूर (शेरखान शेख): कासारी (ता. शिरुर) येथील नरकेवाडी येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्त महात्मा फुले जयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला असल्याने महिलांना त्यांच्या क्षेत्रात कार्य करण्यास उर्जा मिळाली आहे. कासारी (ता. शिरुर) येथील नरकेवाडी येथे महात्मा फुले जयंती उत्सव समितीच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती […]

अधिक वाचा..