Shirur Police Station

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. घरात घुसलेल्या चोरट्याला पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या उमेश छाजेड (वय ४२) यांच्या पायावर गोळी झाडून आरोपीने घटनास्थळावरून पलायन केले. मात्र, या जीवघेण्या प्रसंगात अवघ्या १२ वर्षांच्या मानवी छाजेड हिने दाखवलेल्या धाडसाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. वडील […]

अधिक वाचा..

शिरूर गोळ्यांच्या आवाजाने हादरतोय; पाच घटनांमध्ये तिघांचा मृत्यू, एकाचा गंभीर मारहाणीत बळी…

शिरूर (तेजस फडके) : शांत, शेतीप्रधान तालुका म्हणून ओळख असलेल्या शिरूर तालुक्याची ओळख आता गुन्हेगारीच्या घटनांमुळे बदलत चालली आहे. मागील सहा महिन्यांत तालुक्यात गोळीबाराच्या पाच घटना घडल्या. या घटनांमध्ये तिघांचा मृत्यू झाला, तर एका घटनेत गोळीबार होऊनही तरुण बचावला. याच काळात रांजणगाव गणपती येथील गंभीर मारहाणीच्या घटनेतही एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यामुळे किरकोळ वाद, जुने […]

अधिक वाचा..
sandeep-gill-ranjangaon

Video: शिरूर तालुक्यात गोळीबार, डोक्यात गोळी लागल्याने एकाचा मृत्यू; गुन्हा दाखल…

शिरूर (तेजस फडके) : कारेगाव (ता. शिरुर) येथील साईनगर परिसरात आज (मंगळवार, ता. २९) सकाळी पाण्याच्या प्लांटमध्ये झालेल्या गोळीबारात हमजा उस्मान शेख (वय ३९) यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हमजा शेख यांच्या डोक्यात गोळी लागल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून, या प्रकरणी रांजणगाव MIDC पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.   View […]

अधिक वाचा..
hari-gangawane-shirur

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. शहरातील लाटेआळी येथील आंबेडकर नगर परिसरात सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास युवकावर अज्ञातांनी गोळीबार केला. या भीषण हल्ल्यात हरीश गंगावणे (वय ३३) याचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे शहरात काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते. या […]

अधिक वाचा..
hari-gangawane-shirur

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास झालेल्या गोळीबारात हरी गंगावणे या तरुणाचा मृत्यू झाला आहे. शिरूर शहरातील वर्दळीच्या परिसरात सकाळच्या वेळी गोळीबार झाल्याने शिरूर शहर हादरले असून, या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.   View this post on Instagram   A post shared by Shirur […]

अधिक वाचा..
arrest

व्यावसायिकावर गोळीबार करणारे उज्जैन येथून जेरबंद…

शिरूर: शिरसवडी (ता. हवेली) येथे जमीन व्यावसायिक संतोष गावडे यांची गाडी तिघांनी आपली गाडी बंद पडल्याचं दाखवत मदत मागण्याच्या बहाण्याने अडवली. यानंतर गोळीबार करून २२ तोळ्यांचे सोन्याचे दागिने लुटणाऱ्या तिघा कुख्यात दरोडेखोरांना पुणे पोलिसांनी अवघ्या १२ तासांत जेरबंद केले आहे. मध्य प्रदेश पोलिसांच्या मदतीने उज्जैन येथून या तिघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली […]

अधिक वाचा..
karade-firing-case

शिरूर! करडे गोळीबार प्रकरणातील पाच आरोपी ७२ तासांत जेरबंद; पाहा नावे…

शिरूर (तेजस फडके) : करडे (ता. शिरुर) येथे जुन्या वादातून सराईत गुन्हेगारावर पिस्तुलातून तीन राउंड फायर करुन जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाच आरोपींना शिरुर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या ७२ तासांच्या आत अहिल्यानगर जिल्ह्यातून ताब्यात घेतले आहे. सुपा (ता. पारनेर) बसस्थानक परिसरात सापळा रचून करण्यात आलेल्या या कारवाईत शिरुर पोलिसांच्या डीबी पथकाने दमदार कामगिरी […]

अधिक वाचा..

शिरूर! करडे गावात मध्यरात्री पिस्तुलातून तीन राऊंड फायर; गुन्हा दाखल; पाहा नावे…

सराईत गुन्हेगारांचा गावात सशस्त्र धुडगूस; प्रतिबंधक कारवाया कागदावरच राहिल्या का…? शिरूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह शिरूर (तेजस फडके) : शिरूर तालुक्यातील करडे गावात मध्यरात्रीच्या सुमारास पिस्तुलातून थेट तीन राऊंड फायर करून एका तरुणाचा खून करण्याचा प्रयत्न झाल्याची अत्यंत गंभीर घटना समोर आली आहे. जुन्या भांडणाच्या कारणावरून सात जणांच्या टोळक्याने बेकायदा जमाव जमवून शिवीगाळ व दमदाटी […]

अधिक वाचा..
vishal-kale-shirur

शिरूरच्या करडे घाटात गोळीबार, विशाल काळेसोबत नेमकं काय घडलं…

शिरूर : शिरूर तालुक्यातील करडे घाटात दोन गुन्हेगार गटांच्या वादातून झालेल्या गोळीबारात विशाल सुनील काळे याचा मृत्यू झाला आहे. केदार चंद्रकांत झाडगे आणि उमेश अनिल जगदाळे हे दोन युवक जखमी झाले आहेत. झाडगे याच्यावर पुण्यातील रूग्णालयात उपचार चालू आहेत. जगदाळे याने दिलेल्या फिर्यादीवरून सनी संजय यादव आणि विशाल पन्दी यांच्यासह इतर चार ते पाच जणांविरूद्ध […]

अधिक वाचा..
Crime

शिरूर तालुक्यात कारने एकमेकांना धडक देत केला गोळीबार; एकाचा मृत्यू….

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील शिरूर-न्हावरे मार्गावरील करडे घाट परिसर आज (सोमवरा) सायंकाळी पाच ते साडेपाचच्या दरम्यान अक्षरशः गोळीबाराच्या आवाजाने दणाणून गेला. भरधाव वाहनाला धडक देऊन अडवण्यात आले आणि त्यानंतर झालेल्या थरारक गोळीबारात एका युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली, तर दुसरा युवक गंभीर जखमी झाला. या घटनेमुळे शिरूर शहरासह संपूर्ण तालुक्यात मोठी खळबळ उडाली […]

अधिक वाचा..