राज्यातील भाजपाप्रणित शिंदे सरकार हे गम्मत जम्मत सरकार; नाना पटोले 

मुंबई: राज्यातील भाजपाप्रणित शिंदे सरकार हे गम्मत जम्मतचे सरकार आहे. या सरकारमध्ये एक मंत्री सहा जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, ३६ जिल्ह्याला १९ पालकमंत्री नियुक्त केले असून १७ जिल्ह्याला अजून पालकमंत्रीच नाहीत. १५ ऑगस्टला ध्वजारोहण कोण करणार यावरून सरकार संभ्रमात आहे. पालकमंत्री नसताना जिल्हाधिकारी व आयुक्त यांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाईल असे सरकारने जाहीर केले होते पण […]

अधिक वाचा..

राष्ट्रवादी काँग्रेस आणि राज्यसरकार बेरोजगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटीबद्ध; छगन भुजबळ

नाशिक: नाशिक जिल्ह्यात उद्योगांचा अधिक विकास करून रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करत तरुणांना स्थानिक पातळीवर रोजगार मिळवून देण्यासाठी व बेरोजगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस तसेच राज्यसरकार कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी भवन नाशिक येथे भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांना कमीत कमी एक हजार रुपये पीकविमा मिळणारच; सरकारचा मोठा निर्णय…

संभाजीनगर: राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी शेतकऱ्यांसाठी कृषिमंत्र्यांची मोठी घोषणा करण्यात आली आहे. राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आणि सकारात्मक पाऊल उचललं असून शेतकऱ्यांना आता कमीत कमी एक हजार रुपये पीक विमा मिळणार असून, विमा कंपनीची रक्कम कमी असल्यास उर्वरित रक्कम राज्य सरकार देणार असल्याची मोठी घोषणा कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात सरकारी कार्यालयात तब्बल ६७ वर्षांपासून सुरु आहे वीजचोरी

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील आंधळगाव ग्रामपंचायतीमध्ये तब्बल ६७ वर्षापासून विजचोरी होत आहे. ही ग्रामपंचायत सन १९५६ साली निर्माण झाली होती. परंतु आंधळगाव ग्रामपंचायत कार्यालयाने आजपर्यंत कोणतेही अधिकृत वीज कनेक्शन घेतले नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ग्रामपंचायतीमध्ये अनधिकृत वीज पुरवठा सुरु आहे. राज्यातील शहरी अन् ग्रामीण भागात वीज पुरवठा आणि वीज बिल वसुली करण्याचे […]

अधिक वाचा..

विरोधीपक्षाच्या प्रस्तावाची सत्ताधाऱ्यांकडून थट्टा, सरकार जनतेच्या प्रश्नावर गंभीर नाही…

मुंबई: पावसाळी अधिवेशनच्या शेवटच्या दिवशी विरोधी पक्षाकडून अंतिम आठवडा प्रस्ताव मांडण्यात येतो, हा प्रस्ताव राज्यातील जनतेचे प्रश्न मांडणारा असतो पण विरोधी पक्षाच्या या प्रस्तावाची सत्ताधारी पक्षाकडून थट्टा करण्यात आली. भाजपाप्रणित सरकार जनतेच्या प्रश्नांवर गंभीर नाही. महागाई कमी करण्यासाठी या सरकारकडे कोणतेही धोरण नाही. सामान्य जनतेचे जगणे कठीण झाले आहे. १०-१५ हजार रुपयांच्या पगारात शहरातील कुटुंबाला […]

अधिक वाचा..

आरोग्य सुविधांअभावी मृत्यू हे सरकारला शोभणारे नाही; बाळासाहेब थोरात

मुंबई: इगतपुरीतील एका आदिवासी महिलेला वेळेवर उपचार मिळत नाही, सुविधा मिळत नाही आणि तिचा मृत्यू होतो हे महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याला शोभणारे नाही, सरकारने या परिस्थितीकडे गंभीरपणे पाहण्याची आवश्यकता आहे, असे मत काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. इगतपुरी आणि मोखाडा या आदिवासी दुर्गम बहुल भागात केवळ सुविधा नसल्याने दोन गर्भवती महिला दगावल्या. […]

अधिक वाचा..

इगतपुरी तालुक्यातील आदिवासी गरोदर महिलेच्या मृत्युस सरकारच जबाबदार; नाना पटोले

मुंबई: राज्यात रस्त्यांसाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले असतानाही रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य आहे तर दुसरीकडे गाव-खेड्यात, आदिवासी पाड्यात रस्तेच नाहीत. रस्ता नसल्याने इगतपुरीतल्या आदिवासी गरोदर महिलेचा मृत्यू झाला, हे महाराष्ट्राला भुषणावह नाही. आदिवासी गरोदर महिलेचा हा मृत्यू नसून एकप्रकारची हत्या आहे तसेच शासकीय असंवेदनशीलतेचा बळी आहे. आदिवासी गरोदर महिलेच्या मृत्यूस शासनच जबाबदार आहे, असा गंभीर […]

अधिक वाचा..

विधानसभेत लक्षवेधीला उत्तर आणि दोन तासात शासन निर्णय; सुधीर मुनगंटीवार

मुंबई: राज्य शासनाच्या गतिमान कारभाराची चर्चा नेहमीच होते. आज त्याच गतिमान कारभाराची चुणूक वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दाखवली. विधानसभेत एका लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात त्यांनी गडचिरोली येथील बांबू व्यवस्थापन संदर्भात समिती स्थापन घोषणा केली होती. त्यानंतर त्यांनी तात्काळ संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश देत केवळ दोन तासातच यासंदर्भातील शासन आदेश जारी केला. वनविभाग गडचिरोली, आलापल्ली व वडसामध्ये […]

अधिक वाचा..

सलग दोन महिने मणिपूर धगधगतंय मात्र सरकार निष्क्रिय; जयंत पाटील 

मुंबई: मणिपूर येथे घडणाऱ्या हिंसाचार विरोधात व केंद्र सरकारच्या निष्क्रियतेविरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात आले. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालय परिसरातील गांधी पुतळ्यासमोर मौन व्रत धारण करून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाबाबत माहिती देताना जयंत पाटील म्हणाले की, भारतात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती किती ढासळलेली आहे हे मणिपूर […]

अधिक वाचा..