भारतीय विदेश सेवेतील अधिकाऱ्यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमुळे महाराष्ट्र विकासाच्या महामार्गावर; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई: भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी महाराष्ट्राचे मोठे योगदान असणार आहे. अटल सेतू, कोस्टल रोड, समृद्धी महामार्ग, मेट्रोचे जाळे यासारख्या महत्वपूर्ण पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमुळे महाराष्ट्र विकासाच्या महामार्गावरच्या गतिमान असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. प्रशिक्षणाचा भाग म्हणून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेल्या […]

अधिक वाचा..

भारतीय नागरिकत्वाचा ठोस पुरावा म्हणजे ‘आधार कार्ड’ नव्हे…

मुंबई: भारतीय नागरिकत्व म्हणजे केवळ देशात जन्म घेणे नव्हे, तर त्या राष्ट्राशी असलेली एक सखोल ओळख आणि जबाबदारीची बांधिलकी. परंतु आज जेव्हा आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आणि इतर ओळखपत्रांची इतकी चलती आहे, तेव्हा सामान्य माणसाच्या मनात साहजिकच प्रश्न निर्माण होतो “मग खरंच, माझ्याकडे नागरिकत्व सिद्ध करणारं कोणतं कागदपत्र आहे?” बिहारमध्ये मतदार नोंदणीच्या विशेष मोहिमेमुळे आणि […]

अधिक वाचा..

भारतीय सशस्त्र दलाच्या कारवाईने दहशतवाद्यांना दिले उत्तर, त्यांच्या धैर्याला सलाम

पहलगाम इथे निष्पाप भारतीयांवर भ्याड हल्ला केलेल्या पाकिस्तानला चोख उत्तर नागपूर: पहलगाम इथे निष्पाप भारतीयांवर भ्याड दहशतवादी हल्ला करण्यात आला होता.त्यात भारतीयांनी आपल्या प्रियजनांना गमावले होते.आज त्या दहशतवादी कारवायांना भारतीय सेनेन चोख उत्तर दिले आहे ऑपरेशन सिंदूरच्या ‘ माध्यमातून पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या नऊ अड्ड्यावर क्षेपणास्त्र हल्ला भारतीय हवाई सेनेन केली. यात अनेक दहशतवादी ठार झाले […]

अधिक वाचा..

भारतीय राज्यघटनेमुळेच भारताची जागतिक स्तरावर एक शक्तिशाली राष्ट्र म्हणून ओळख…

पटणा: जागतिक स्तरावर भारताने एक शक्तिशाली राष्ट्र म्हणून ओळख प्राप्त केली आहे.आपल्या राज्यघटनेने त्यादृष्टीने भक्कम आधारशिला प्राप्त करून दिली असल्यानेच हे शक्य झाले. लोकशाही संस्था बळकट करणे,सकारात्मक सहभाग नोंदवून संसद आणि राज्य विधानमंडळे यांचे वैभव टिकवणे आणि त्यायोगे लोक कल्याणाच्या प्रति प्रतिबद्धता सुनिश्चित करणे हे, आपले कर्तव्य आपण चोखपणे बजावले पाहिजे असे प्रतिपादन महाराष्ट्र विधान […]

अधिक वाचा..

भारतीय शिक्षण पद्धती उपयुक्त; दीपक केसरकर

मुंबई: भारतीय शिक्षण पद्धती उपयुक्त आहे. जगातील ज्या चांगल्या शिक्षण पद्धती अथवा चांगले अभ्यासक्रम असतील त्यांचा अवश्य स्वीकार करा. तथापि प्राथमिक स्तरावर भारतीय शिक्षण पद्धती योग्य असल्यास ती विनाकारण बदलू नका, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिले. तसेच इंग्रजीच्या अट्टाहासातून बाहेर पडण्याचे आवाहनही त्यांनी केले. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन […]

अधिक वाचा..

हिंदू मुस्लीम ऐक्यातून भारतीय संस्कृतीचे दर्शन;  प्रमोद क्षिरसागर

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर परिसरातील हिंदू मुस्लीम बांधव एकोप्याने राहून सर्व सन उत्सव साजरे करत असल्याची बाब कौतुकास्पद असून हिंदू मुस्लीम ऐक्यातून भारतीय संस्कृतीचे दर्शन होत असल्याचे मत शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांनी व्यक्त केला आहे. शिक्रापूर (ता. शिरूर) येथील जामा मस्जिदमध्ये मुस्लीम बांधवाच्या पवित्र अशा रमजान महिन्यातील रोजे निमित्त शिक्रापूर पोलीस […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात इंडियन ऑईल पेट्रोल पंपांवर पार्क केलेल्या जेसीबीची चोरी

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील करडे येथील प्रदीप सरोदे यांच्या इंडियन ऑइल पेट्रोल पंपांवर विलास भाउ देशमुख रा. अंबोली ता. खेड यांची पार्क केलेले जेसीबी मशिन 2 अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले आहे. याबाबत जेसीबी ड्रायव्हर जितेंद्र संजय पठारे यांनी शिरुर पोलिस स्टेशनला जेसीबी चोरीला गेल्याची फिर्याद दाखल केली आहे. याबाबत सविस्तर हकीकत अशी की, (दि. […]

अधिक वाचा..

स्वातंत्र्य अमृत महोत्सवनिमित्त ‘हर घर तिरंगा’ जनजागृती फेरी

शिरुर (अरुणकुमार मोटे): देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत असल्याने केंद्र सरकारने “हर घर तिरंगा” च्या माध्यमातून “भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” साजरा करण्याचे आवाहन देशातील नागरिकांना केले असल्याने महावितरणच्या महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी यांनी एकत्र येऊन कार्यकारी अभियंता राजेंद्र एडके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मलठण (ता. शिरुर) येथे याबाबत जनजागृती केली आहे. शिरुर उपकार्यकारी अभियंता माने, […]

अधिक वाचा..