UPSC पूर्व परीक्षा प्रशिक्षणासाठी CET-2026 प्रवेश प्रक्रिया सुरू

महाराष्ट्र

मुंबई: उच्च शिक्षण विभागांतर्गत राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC), मुंबई यांच्या माध्यमातून नागरी सेवा पूर्व परीक्षा प्रशिक्षण २०२६ साठी सामायिक प्रवेश परीक्षा (CET-2026-27) आयोजित करण्यात येणार आहे. राज्यातील विविध प्रशिक्षण केंद्रांमध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) नागरी सेवा पूर्व परीक्षेसाठी पूर्णवेळ विनामूल्य प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

या प्रशिक्षणासाठी राज्यातील SIAC मुंबई, तसेच नाशिक, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर येथील भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रांमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. याशिवाय यशदा संचलित डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका संचलित सावित्रीबाई फुले अकादमी, पुणे येथेही प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध आहे.

प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक

ऑनलाइन अर्ज सुरू : १ जून २०२६

अर्जाची अंतिम तारीख : ३० जून २०२६

परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख : २ जुलै २०२६

सामायिक प्रवेश परीक्षा (ऑफलाइन) : २ ऑगस्ट २०२६

विद्यार्थ्यांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीतील गुणांच्या आधारे केली जाणार आहे. अंतिम निकालानंतर उमेदवारांना ऑनलाइन पोर्टलद्वारे पसंतीचे प्रशिक्षण केंद्र निवडण्याची संधी दिली जाणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत