हिंदू मुस्लीम ऐक्यातून भारतीय संस्कृतीचे दर्शन;  प्रमोद क्षिरसागर

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर परिसरातील हिंदू मुस्लीम बांधव एकोप्याने राहून सर्व सन उत्सव साजरे करत असल्याची बाब कौतुकास्पद असून हिंदू मुस्लीम ऐक्यातून भारतीय संस्कृतीचे दर्शन होत असल्याचे मत शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांनी व्यक्त केला आहे.

शिक्रापूर (ता. शिरूर) येथील जामा मस्जिदमध्ये मुस्लीम बांधवाच्या पवित्र अशा रमजान महिन्यातील रोजे निमित्त शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले असता यावेळी पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर बोलत होते.

याप्रसंगी शिक्रापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन अतकरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय चौधर, पोलीस हवालदार संदीप कारंडे, चंद्रकांत काळे, आत्माराम तळोले, संतोष शिंदे, राहुल वाघमोडे, अब्दुलभाई तांबोळी, सिराजभाई शेख, आशपाक मोमीन, मुबारक तांबोळी, आयुव तांबोळी, प्रा. नुरमहमद मुल्ला, शमशेर तांबोळी, फिरोज तांबोळी, तौफीक इनामदार, सादिक तांबोळी, महंमद तांबोळी, जमीर तांबोळी यांसह आदी मुस्लीम बांधव व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांनी सर्व मुस्लिम बांधवाना रमजानच्या शुभेच्छा देऊन हिंदू मुस्लिम ऐक्याची जोपासना करण्याचे आवाहन केले आहे. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नूरमहम्मद मुल्ला यांनी केले तर सीराज शेख यांनी आभार मानले.