शिरुर तालुक्यात मनरेगा योजनेत गैरव्यवहाराचा आरोप; उपोषणाचा इशारा

रांजणगाव गणपती (तेजस फडके) भांबर्डे (ता. शिरुर) येथील मच्छिंद्र बापूराव पवार यांनी मनरेगा योजनेत मोठा गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. याबाबत त्यांनी ग्रामविकास अधिकारी तसेच सरपंच यांना लेखी निवेदन दिले आहे. या प्रकरणाची तातडीने चौकशी करुन संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा उद्या २ ऑक्टोबर २०२५ रोजी उपोषण करण्याचा इशारा पवार यांनी दिला आहे. नेमकं […]

अधिक वाचा..

रांजणगाव MIDC मध्ये अवैध उत्खनन…पंचनामा प्रक्रियेत अनियमितता; महसूल प्रशासनावर प्रश्नचिन्ह…?

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील एका नव्या कंपनीने परवानगीपेक्षा जास्त प्रमाणात अवैधरित्या उत्खनन केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अशोक भोरडे यांनी केला असून, या प्रकरणी पंचनाम्यात झालेल्या अनियमिततेवरुन महसूल प्रशासनावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याशिवाय, संबंधित उत्खनन करणाऱ्या ठेकेदाराने भोरडे यांना फोनवरुन धमकी दिल्याने रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात (Ranjangaon MIDC Police Station) गुन्हा दाखल […]

अधिक वाचा..

शिक्षक बदल्यांतील गैरप्रकार उघड शिरूर तालुक्यात खोट्या वैद्यकीय दाखल्यांवरून सावळा गोंधळ

शिरूर (अरुणकुमार मोटे): राज्यात शिक्षण विभागामार्फत प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या प्रक्रियेचा शुभारंभ करण्यात आला असून, पुणे जिल्हा परिषदेकडूनही तालुकाअंतर्गत व तालुकाबाह्य बदल्यांची प्रक्रिया वेगात सुरू आहे. मात्र, शिरूर तालुक्यात या बदल्यांमध्ये गंभीर अनियमितता आणि गैरप्रकार समोर येत असून, खोट्या वैद्यकीय प्रमाणपत्रांच्या आधारे बदल्या करून घेतल्याचा आरोप काही शिक्षकांवर झाला आहे. यामुळे संवर्ग ४ मधील शिक्षकांमध्ये […]

अधिक वाचा..

नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना

मुंबई: नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेल्या कथित गैरव्यवहाराची सखोल चौकशी करण्यासाठी राज्य सरकारकडून विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा पणन मंत्री जयकुमार रावल यांनी आज विधानसभेत केली. भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी या प्रकरणात गंभीर स्वरूपाचे आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला होता. त्यानंतर याप्रकरणी कारवाईची प्रक्रिया सुरू झाली […]

अधिक वाचा..

हॉटेल व्हिट्स खरेदी व्यवहारात गैरप्रकार झाल्याचा अंबादास दानवेंचा गंभीर आरोप

अखेर मुख्यमंत्र्यांनी केली उच्चस्तरीय चौकशी करण्याची घोषणा मुंबई: संभाजीनगर येथील हॉटेल व्हिट्स खरेदी व्यवहार प्रकरणात मोठया प्रमाणात गैरप्रकार झाला असल्याचा गंभीर आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. या प्रकरणी अंबादास दानवे सभागृहात आक्रमक झाले. मुंबई शेअर बाजारात नोंदणीकृत असलेली धनदा कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनी विट्स हॉटेल चालवत असल्याची माहिती दानवे यांनी सभागृहात दिली. […]

अधिक वाचा..

मतदार याद्यातील गैरप्रकार रोखण्यासाठी काँग्रेसची समिती

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली समिती उपाय सुचवणार मुंबई: विधानसभा निवडणुकीत मतदारयाद्यात विविध मार्गाने गैरप्रकार करून भाजपाने विजय मिळवला आहे हे उघड झालेले आहे. निवडणूक आयोगाला हाताशी धरून भाजपाने चोरीच्या मार्गाने सत्ता मिळवली पण यापुढे असे प्रकार होऊ नयेत, ते कसे रोखता येतील यावर उपाय सुचवण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी […]

अधिक वाचा..

शासकीय औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय कराड येथील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी करणार

मुंबई: शासकीय औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय कराड येथील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणाचा चौकशी अहवाल प्राप्त होताच नियमानुसार कारवाई केली जाईल, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी विधानसभेत सांगितले. या लक्षवेधीच्या उत्तराच्या वेळी अधिक माहिती देताना मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले, या महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक या […]

अधिक वाचा..