गुडघेदुखीवर पारंपरिक, घरगुती आणि अत्यंत असरदार उपाय,

आरोग्य

जसं वय वाढतं तसं गुडघेदुखी ही एक सामान्य पण त्रासदायक समस्या बनते. आजकाल ही समस्या तरुणांमध्येही मोठ्या प्रमाणावर दिसून येते. कारणं अनेक चुकीची जीवनशैली, पोषणाची कमतरता, सतत उभं राहणं, अपुरी झोप इत्यादी.

औषधं, गोळ्या, मलमं वापरून थकलात तर आता करून पहा पारंपरिक घरगुती उपाय

कांदा व मोहरीचा पोटली मसाज

कांदा आणि मोहरी हे उष्ण व अँटीइंफ्लामेटरी घटक शरीरातील रक्ताभिसरण वाढवतात, सूज कमी करतात आणि वेदनांवर प्रभावी ठरतात.

हा उपाय कसा करायचा 

साहित्य

१ मध्यम कांदा (सालीसकट), वाटीभर मोहरी, 3 चमचे मोहरीचं तेल, कॉटनचा रुमाल

पद्धत

1) रुमालात मोहरी टाका व मधोमध कांदा ठेवा.

2)चारही टोकं एकत्र करून पोटली बांधा.

3) गुडघ्यावर गरम तेल लावून हलकं मसाज करा.

4) पोटली पॅनवर थोडी गरम करा (जितकी गरमी सहन होईल तितकीच).

5) त्याच पोटलीने गुडघा शेक घ्या.

या मसाजाचे फायदे

संधिवात व सूज कमी होते

रक्ताभिसरण सुधारते

स्नायूंचा कडकपणा कमी होतो

वेदना लवकर कमी होतात

(सोशल मीडियावरून साभार)

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत