शेतकरी प्रश्नांवर सरकार गंभीर नाही; शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम; नाना पटोले

मुंबई: राज्यातील भाजपाप्रणित ट्रिपल इंजिन सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गंभीर नाही. सरकार कर्ज वाटप व बियाणांसंदर्भात चुकीची माहिती देत आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने निर्देश जारी केल्याने अनेक सहकारी बँकांनी कर्ज वाटपच केले नाही, राष्ट्रीयकृत बँका तर शेतकऱ्यांना दारातही उभे करत नाहीत आणि सरकार सांगते कर्जवाटप झाले. सरकार चुकीचे उत्तर देत असून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा […]

अधिक वाचा..

शिरुर नगरपालिकेतील बेकायदेशीर बांधकाम व इतर प्रश्नांसाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांचे उपोषण सुरु 

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर शहरामध्ये अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणात झाली आहेत. येथील पांजरपोळ या ठिकाणचे वृक्ष तोड करून अमरधामाची भिंत तोडली आहे. तसेच सुभाष चौक या बाजारपेठेत अनाधिकृत बांधकामे मोठया प्रमाणावर केली आहे. या प्रश्नांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष महिबुब सय्यद यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे. शिरुर हद्दीत बेकायदेशीर हॉटेल व्यवसायासाठी नगरपरिषदेने दिलेला वापर […]

अधिक वाचा..

राज्यातील नायब तहसिलदारांचे प्रश्न प्राधान्याने सोडविणार; महसूलमंत्री 

मुंबई: राज्यातील नायब तहसिलदारांचे प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहेत. राज्यातील नायब तहसिलदारांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यात येतील यासाठी लवकरच प्रशासनाची बैठक घेऊन मार्ग काढणार असल्याची ग्वाही राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. नायब तहसिलदारांच्या विविध मागण्याबाबतचे निवेदन स्वीकारल्यानंतर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. महाराष्ट्र राज्य तहसिलदार व नायब तहसिलदार संघटनेच्यावतीने अहमदनगर येथील कार्यक्रमादरम्यान महसूलमंत्री राधाकृष्ण […]

अधिक वाचा..

सामाजिक उपक्रम राबवून जनतेच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करा; डॉ. नीलम गोऱ्हे

सातारा शिवसेना जिल्हा पदाधिकाऱ्यांची घेतली बैठक  सातारा: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासाठी सामाजिक उपक्रमांनी जनतेला जोडून घ्या. समाजाच्या कामाच्या माध्यमातून आपली प्रतिमा तयार करता येतील. या माध्यमातून आपल्या भागातील प्रश्न सोडविण्यावर लक्ष केंद्रित करा, असे प्रतिपादन आज विधान परिषद उपसभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी येथे केले. आज त्यांनी सातारा शासकीय विश्रामगृह येथे येथे शिवसेना जिल्हा […]

अधिक वाचा..

अंगणवाडी सेविका-मदतनीसांच्या आंदोलनाची दखल घेऊन त्यांचे प्रश्न तातडीने सोडवा…

मुंबई: राज्यात दोन लाखांहून अधिक अंगणवाडी सेविका-मदतनीस कार्यरत आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या न्याय मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनाला बसल्या आहेत. या आंदोलनाची दखल घेऊन त्यांच्या प्रश्नांना तातडीने न्याय देण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी यापूर्वी हिवाळी […]

अधिक वाचा..

एस. टी. कर्मचाऱ्यांच्या समस्या अधिवेशनात लावून धरु; कर्मचाऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये…

मुंबई: शिंदे-फडणवीस सरकार एस. टी. महामंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवर करू शकत नाही. पगार होत नसल्याने सांगली जिल्ह्यातील एस. टी. कर्मचारी भीमराव सुर्यवंशी यांना आत्महत्या करावी लागली ही सरकारसाठी लाजीरवाणी बाब आहे. एस. टी. कर्मचाऱ्यांच्या पाठीशी काँग्रेस पक्ष खंबीरपणे उभा असून अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यांचे प्रश्न लावून धरु, कर्मचाऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन […]

अधिक वाचा..

राज्यातील प्रश्नांना न्याय देण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशन किमान पाच आठवडे घ्यावे…

मराठवाडा मुक्ती संग्रामाचा अमृतमहोत्सव सर्वपक्षीयांच्या सहभागातून भव्य प्रमाणात साजरा करावा… मुंबई: नागपूरचे हिवाळी अधिवेशन किमान तीन आठवडे घेण्याची विरोधी पक्षांनी मागणी असतानाही हिवाळी अधिवेशन तीन आठवडे घेण्यात आले नाही. त्यामुळे राज्यातील सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशन किमान पाच आठवड्याचे घेण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत केली. […]

अधिक वाचा..

मुख्यमंत्री महोदयांच्या भाषणातील मुद्दे

दत्ता मेघे शिक्षण व संशोधन संस्थेच्या माध्यमातून रूग्णसेवेचे ईश्वरीय कार्य करण्यात येत आहे माजी खासदार दत्ता मेघे यांचे रुग्णसेवेचे कार्य कौतुकास्पद महात्मा गांधी विनोबांच्या भूमीत रुग्णसेवेचे मोठे कार्य माजी खासदार दत्ता मेघे यांनी सुरू केले आहे त्यांच्या रुग्णसेवेचा वारसा त्यांची दोन्ही मुले पुढे चालवीत आहेत रुग्णसेवा ही ईश्वर सेवा असून या संस्थेच्या माध्यमातून विदर्भातील अनेक […]

अधिक वाचा..

पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेसह शिरूर लोकसभा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावा…

पुणे: गेल्या काही महिन्यांपासून केंद्रीय कॅबिनेटच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पासंदर्भात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी लक्ष घालाव, अशी मागणी शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी खासदारांच्या बैठकीत केली. शिरुर लोकसभा मतदारसंघातील पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे, इंद्रायणी मेडिसिटी, शिवसंस्कार सृष्टी अशा महत्वाच्या प्रलंबित विषयावर चर्चा करण्यासाठी खासदार डॉ. कोल्हे मागील काही […]

अधिक वाचा..

पुणे- पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक, पाणीप्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलवावी..

नागपूर: पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. गृहनिर्माण सोसायट्यातील रहिवाश्यांचेही अनेक प्रश्न आहेत. वाढत्या लोकसंख्येसोबत शहरातील सोयीसुविधांमध्ये वाढ होण्याची गरज आहे. हिंजवडीसारख्या परिसरातील उद्योग राज्याबाहेर हैदराबादकडे स्थलांतरीत होत आहेत. युवकांच्या नोकऱ्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महत्वाची शहरे असून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली लोकप्रतिनिधी व […]

अधिक वाचा..