सामाजिक उपक्रम राबवून जनतेच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करा; डॉ. नीलम गोऱ्हे

महाराष्ट्र

सातारा शिवसेना जिल्हा पदाधिकाऱ्यांची घेतली बैठक 

सातारा: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासाठी सामाजिक उपक्रमांनी जनतेला जोडून घ्या. समाजाच्या कामाच्या माध्यमातून आपली प्रतिमा तयार करता येतील. या माध्यमातून आपल्या भागातील प्रश्न सोडविण्यावर लक्ष केंद्रित करा, असे प्रतिपादन आज विधान परिषद उपसभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी येथे केले.

आज त्यांनी सातारा शासकीय विश्रामगृह येथे येथे शिवसेना जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यावेळी त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, प्रत्येक कार्यकर्त्याने जिल्हा संपर्क आणि जिल्हा समन्वयक यांना शिवसेना पक्षप्रमुख मा.उद्धवजी ठाकरे यांच्या होणाऱ्या मार्गदर्शनानुसार उपक्रमांच्या आखणीबाबत निर्णय घेता येईल, असे पाहावे.

आज डॉ. गोऱ्हे यांनी सातारा जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी आणि पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्याशी जिल्ह्यातील सामाजिक प्रश्नांवर चर्चा केली. यावेळी जिल्ह्यात पर्यटन, रोजगार, सामाजिक सुरक्षा, कायदा आणि सुव्यवस्था राखण्याबाबत त्यांना डॉ. गोऱ्हे यांनी सूचना दिल्या आहेत.

उपसभापती कार्यालयाच्या माध्यमातून सामाजिक प्रश्न सोडविताना आवश्यक तिथे मदत करता येऊ शकते. कार्यकर्त्यांनी आपल्या भागात सामाजिक उपक्रम, बैठका घ्याव्यात. विशेषत: ऑनलाईन पद्धतीने बैठका घेतल्यास त्यात मार्गदर्शन करता येईल, असे त्या म्हणाल्या. यावेळी सातारा जिल्हा प्रमुख हर्षल कदम, सचिन मोहिते, वाई, जावळी, कोरेगाव,कराड तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी, महिला आघाडीच्या छायाताई शिंदे आदी उपस्थित होत्या.