जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला मोठे बळ; माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे शिवसेनेत प्रवेशाच्या तयारीत

मुंबई: जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढण्याची शक्यता असून माजी आमदार व शेतकरी नेते शंकरअण्णा धोंडगे हे अख्ख्या पक्षासह शिवसेनेत विलीन होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आगामी नांदेड जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी त्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शंकरअण्णा धोंडगे यांनी […]

अधिक वाचा..

काँग्रेसचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी ‘प्रतिभा शोध’ अभियानात सहभागी व्हा; हरी शंकर गुप्ता

मुंबई: काँग्रेस पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी आणि काँग्रेसचा विचार, इतिहास, लोकशाही व संविधानवादी मूल्ये तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी पक्षाच्या वतीने ‘प्रतिभा शोध’ (Talent Hunt) अभियान सुरू करण्यात आले आहे. राज्यातील सर्व स्तरांतील लोकांनी या अभियानात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन दिल्लीचे माजी आमदार व या अभियानाचे महाराष्ट्र प्रभारी हरी शंकर गुप्ता यांनी केले आहे. प्रदेश काँग्रेसचे […]

अधिक वाचा..

पालघर आणि डहाणूतील उबाठा गटाच्या महिला आघाडीतील पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश

पालघर जिल्ह्यातील उबाठा गटातील महिला आघाडीच्या पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांनी आज ठाण्यातील टेंभी नाका येथील आनंदआश्रमात येऊन शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला. यावेळी शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यात प्रामुख्याने पालघरमधील महिला जिल्हाप्रमुख नीलम म्हात्रे, महिला तालुकाप्रमुख मनिष पिंपळे, माजी सभापती शैला कोलेकर, महिला शहर संघटक मनिषा […]

अधिक वाचा..

राज्यात काँग्रेसला आणखी एक जबर धक्का, नेता हाजरो कार्यकर्त्यांसह करणार भाजपात प्रवेश

मुंबई: विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा सपाटून पराभव झाला होता. महाविकास आघाडीला अवघ्या 50 जागांवर समाधान मानावं लागलं. तर दुसरीकडे मात्र लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीनं जोरदार पुनरागमन केल्याचं पाहायला मिळालं. महायुतीला या निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळालं. दरम्यान या निवडणुकीनंतर महाविकास आघाडीला धक्क्यावर धक्के बसत आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटाला […]

अधिक वाचा..

भाजपात जाताच कैलास गोरंट्याल यांची थेट ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखाला पक्षात येण्याची ऑफर

मुंबई: भाजपामध्ये प्रवेश करताच आगामी महापालिका निवडणूक स्वबळावर लढा, महापौर करतो, असा दावा करणारे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा आत्मविश्वास कमालीचा वाढला आहे. या वाढलेल्या आत्मविश्वासातूनच त्यांनी तिरंगा यात्रेच्या कार्यक्रमात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांना भाजपात येण्याची ऑफर देऊन टाकली. ‘बस झाले, आता तिकडे थांबू नका, आमच्याकडे या’ अशी जाहीर साद […]

अधिक वाचा..

बेळगावमधील अनेक मठाधिपतींचा शिवसेनेत प्रवेश; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कर्नाटकात शिवसेना पक्ष वाढीला मिळणार चालना ठाणे: हिंदुत्वाचे विचार पुढे घेऊन जाणारे शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील अनेक मठाधिपतींनी आज शिवसेनेत पक्ष प्रवेश केला. दत्त गगनगिरी ध्यानमंदीराचे मठाधिपती प.पु. पुरषोत्तम माळी महाराज यांच्या नेतृत्वात कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी येथील १२ महाराजांनी रविवारी संध्याकाळी ठाणे येथे […]

अधिक वाचा..

गेम पलटला, तेजस ठाकरेंसह 25 जणांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश 

मुंबई: आगामी स्थानिक स्वराज संस्था आणि महापालिकेच्या निवडणुका लवकरच जाहीर होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर अनेक पक्ष हे तयारीला लागले आहेत. सध्या विरोधी पक्षातून अनेक माजी नगरसेवक, कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेते हे सत्ताधारी पक्षात प्रवेश करताना दिसत आहेत. त्यातच आता यवतमाळ जिल्ह्यात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटाच्या आणि […]

अधिक वाचा..

मालवण मधील ‘उबाठा’ च्या चार माजी नगरसेवकांचा समर्थकांसह भाजपामध्ये प्रवेश

भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले स्वागत मुंबई: मालवण नगरपालिकेतील उबाठा गटाच्या चार माजी नगरसेवकांनी आपल्या समर्थकांसह सोमवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. जिल्हा प्रवक्ते तसेच माजी नगरसेवक मंदार केणी, उबाठा गटाचे मालवण पालिकेचे माजी बांधकाम सभापती यतिन खोत आणि माजी नगरसेविका दर्शना कासवकर व सेजल परब यांच्या पक्षप्रवेश कार्यक्रमात भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी […]

अधिक वाचा..

कुख्यात माफिया दाऊद इब्राहिमलाही भाजपा पक्षात प्रवेश देणार का; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: भारतीय जनता पक्ष स्वतःला जगातील सर्वात मोठा पक्ष समजतो पण शक्तीशाली असल्याचा आव आणणारा पक्ष मात्र कोणालाही पक्षात प्रवेश देत आहे. आतापर्यंत ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप भाजपाने केले त्यांनाच सन्मानाने पक्ष प्रवेश देऊन मंत्रीपदही दिले. आता तर भाजपाने सर्व सोडून दिले आहे. ज्या व्यक्तीवर माफीया दाऊद इब्राहिमशी संबंध जोडला त्यालाच सन्मानाने पक्षप्रवेश दिला. आता भाजपा […]

अधिक वाचा..

आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात तुम्ही प्रवेश केलात मात्र माझ्याकडून कधी भेदभाव होणार नाही 

मुंबई: आपला महाराष्ट्र हा महापुरूषांचा आहे. त्यांच्या विचारांवरच आपल्याला चालायचे आहे असे सांगतानाच मला जे पटते ते काम मी करतो. मी ज्याला शब्द दिला त्याचे काम कधी अपूर्ण ठेवले नाही. आज पक्षात तुम्ही प्रवेश केलात मात्र माझ्याकडून कधी भेदभाव होणार नाही अशी खात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आज दिली. आज […]

अधिक वाचा..