युवा पिढी बिघडलेली नाही; संवादाची भाषा बदलली; डॉ. नीलम गोऱ्हे

‘जनरेशन Z’ ला दोष नको; समजून घेणे गरजेचे; विश्वास नांगरे पाटील नाशिक: चौथ्या विश्व मराठी साहित्य संमेलनात “मराठी भाषेतील युवा वर्गाचा सहभाग” या विषयावर विशेष व्याख्यान सत्र उत्साहात पार पडले. या सत्रात विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि अतिरिक्त पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांनी युवा पिढीशी थेट संवाद साधत मार्गदर्शन केले. कार्यक्रमास अॅड. नितीन […]

अधिक वाचा..

भाषाविषयात हिंदुत्व आणू नका; मराठी भाषा-माणूसच आमचं सर्वोच्च प्राधान्य; राज ठाकरे

मुंबई: भाषाविषयावर आंदोलन करणं हा आजार असल्याच्या सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीव्र शब्दांत टीका केली आहे. राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्ट करत “भाषेच्या प्रश्नात हिंदुत्व आणून आम्हाला ज्ञानामृत पाजण्याचा प्रयत्न करू नका,” असा स्पष्ट इशारा दिला आहे. ८ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात मोहन भागवत यांनी भाषेबाबत […]

अधिक वाचा..

न्यायाच्या नावाखाली हिंसक आणि अमानवी भाषेला प्रोत्साहन देता येणार नाही; डॉ. नीलम गोऱ्हे

संविधान व मानवी अधिकारांच्या चौकटीत दखल आवश्यक; डॉ. नीलम गोऱ्हे यांची ठाम भूमिका मुंबई: भंडारा येथे आयोजित एका गायनाच्या कार्यक्रमात गायिका अंजली भारती यांनी बलात्कारासारख्या अतिशय संवेदनशील विषयावर भाष्य करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबाबत वापरलेली निंदनीय व आक्षेपार्ह भाषा अत्यंत अस्वस्थ करणारी असून ती कोणत्याही परिस्थितीत समर्थन करण्याजोगी नाही, अशी ठाम […]

अधिक वाचा..

सर्व कलमांची सखोल छाननी करून काळानुरूप बदल संवेदनशील शब्दप्रयोगासह प्रस्तावित करा

महाराष्ट्र भीक मागण्यास प्रतिबंध अधिनियमात सुधारणा प्रस्तावित करताना मनोरुग्ण,भिक्षेकरी यांची गरिमा राखण्याची काळजी घ्या नागपूर: महाराष्ट्र भीक मागण्यास प्रतिबंध करण्याबाबतच्या अधिनियमात सुधारणा करताना केवळ कायदेशीर नव्हे तर मानवी हक्क, सामाजिक संवेदनशीलता आणि आधुनिक धोरणात्मक दृष्टिकोन केंद्रस्थानी ठेवणे आवश्यक आहे. यासाठी संपूर्ण अधिनियमातील सर्व कलमांची बारकाईने छाननी करून उचित, सन्मानजनक आणि काळानुरूप शब्दांचा समावेश करण्यात यावा, […]

अधिक वाचा..

सनातन दहशतवाद ही भाषा हिंदू धर्माचा अपमान; नितेश राणे

मुंबई: माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यानंतर शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही सनातन धर्मावर वादग्रस्त विधान केलं. सनातन धर्माने भारताचे वाटोळं केलंय. सनातनी दहशतवाद मान्य करावाच लागेल. सनातनी दहशतवादाचे अस्तित्व आजचे नाही; तर, ते प्राचीन काळापासून आहे. भगवान बुद्धाला छळणारे हे सनातनी दहशतवादीच होते. सनातन धर्माने आमच्या शिवरायांना राज्याभिषेक नाकारला, असं विधान जितेंद्र आव्हाड […]

अधिक वाचा..

ज्या भाषेने यूपी, बिहारवाल्यांचं भलं केलं नाही त्या भाषेसाठी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री भांडत आहे 

मुंबई: आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांची मीरा भाईंदर येथे सभा पार पडली, या सभेत बोलताना राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा हिंदीच्या मुद्द्यावरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हिंदीसाठी भांडत आहे, इतर शाळात मराठी सक्तीची केली पाहिजे. ते सोडून हिंदी सक्तीची करत आहात, असं […]

अधिक वाचा..

विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार भाषिक धोरणाची अंमलबजावणी

मराठी भाषा अनिवार्य; हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक मुंबई: राज्यात सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा बंधनकारक विषय म्हणून शिकवण्यात येत असून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर भविष्यातील ‘अकॅडेमिक बँक ऑफ क्रेडिट’ या मूल्यमापनाच्या संकल्पनेचा विचार करुन आणि विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन राज्यात राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार भाषिक धोरणाची अंमलबजावणी केली जाईल. यामध्ये […]

अधिक वाचा..

अभिजात भाषेचा दर्जा मिळालेली मराठी भाषा साहित्य अकादमी पुरस्कारांमुळे अधिक समृद्ध

मुंबई: साहित्यिक प्रदीप कोकरे यांच्या ‘खोल खोल दुष्काळ डोळे’ मराठी कादंबरीस ‘साहित्य अकादमी युवा पुरस्कार’ तसेच बालसाहित्यकार, शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुरेश सावंत यांच्या ‘आभाळमाया’ काव्यसंग्रहास ‘बाल साहित्य पुरस्कार’ जाहीर झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. साहित्य अकादमीच्या पुरस्कारांमुळे अभिजात भाषेचा दर्जा मिळालेली मराठी भाषा साहित्यिक, सांस्कृतिकदृष्ट्या अधिक समृद्ध होण्यास मदत होईल. नवीन पिढी […]

अधिक वाचा..

पहिलीपासून तिसरी भाषा म्हणून हिंदी अनिवार्य न करता ऐच्छिक ठेवणार

मुंबई: राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. यात राज्यातील विद्यार्थी उद्याच्या स्पर्धेत कुठेही कमी पडू नयेत याचीही दक्षता घेतली जात आहे. सर्व शाळांमध्ये मराठी विषय बंधनकारक असून इंग्रजी भाषा शिकविण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे. आता नवीन धोरण राबविताना सुकाणू समितीने घेतलेल्या निर्णयानुसार पहिलीपासून तिसरी भाषा म्हणून हिंदी भाषा विषय अनिवार्य करण्यात […]

अधिक वाचा..

हिंदी भाषा सक्तीबाबत निर्माण झालेला मराठी-हिंदी वाद निरर्थक

मराठी भाषेसाठी महायुती सरकारने घेतले अनेक ऐतिहासिक निर्णय मुंबई: राज्याच्या नव्या शैक्षणिक धोरणात इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीबाबत केली जाणारी सर्व आंदोलने गैरसमजातून केली जात असून ती निरर्थक आहेत, असे प्रतिपादन शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते आणि माजी शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर यांनी आज केले. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत […]

अधिक वाचा..