leopard

शिरूर! निमगाव म्हाळुंगी ग्रामस्थांचा संयम लागला सुटू; बिबट्यांचा कळपच दिसला…

तळेगाव ढमढेरे (ओमकार भोरडे) : शिरूर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी येथे बिबट्यांचा वावर दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामस्थांनी वेळोवेळी वनविभागाकडे पिंजरे लावण्याची मागणी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे आता नागरिकांचा संयम सुटू लागला असून ‘जीवितहानी झाल्यावरच पिंजरा लावणार का?’ असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. निमगाव म्हाळुंगी […]

अधिक वाचा..
leopard

शिरूर! पिंपरखेड परिसरातील बिबट्याचा अखेर खात्मा…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील पिंपरखेड परिसरात सलग तीन निष्पाप नागरिकांचा बळी घेतल्यानंतर नागरीक आक्रमक झाले होते. यानंतर ०४ रोजी रात्री १०:३० च्या सुमारास एका बिबट्याला ठार करण्यात शार्पशूटर व वनविभागाला यश आले आहे. तब्बल वीस दिवसांपासून भीतीचं सावट निर्माण करणाऱ्या या बिबट्याला वनविभागाच्या संयुक्त पथकाने मंगळवारी (ता. ४) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास अचूक […]

अधिक वाचा..
leopard

बिबट्यांबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय…

मुंबईः पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात नरभक्षक बिबट्याची प्रचंड दहशत पसरली आहे. गेल्या महिनाभरात बिबट्याने दोन लहान मुले आणि एका वृद्ध महिलेचा बळी घेतला आहे. या पार्श्वभूमीवर सध्या या पट्ट्यातील नागरिक संतप्त झाले आहे. या नागरिकांनी सोमवारी पुणे-नाशिक महामार्ग तब्बल 16 तास रोखून धरला होता. यानंतर सरकारी पातळीवर गंभीर दखल घेण्यात आली असून वेगाने हालचाली सुरु […]

अधिक वाचा..
rohan-bombe-pimparkhed

बिबट्याने मुलाला ओढल्यानंतर रक्ताच्या गुळण्या अन् डोळे पांढरे झाले…

शिरूर : शिरूर तालुक्यातील पिंपरखेडमध्ये बिबट्याने केलेल्या हल्ल्यात रोहन विलास बोंबे (वय १३) या मुलाचा मृत्यू झाल्यानंतर ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. यापूर्वी 13 ऑक्टोबर 2025 रोजी शिरूरमध्ये 5 वर्षांची मुलगी बिबट्याच्या हल्ल्यात मृत पावली. रोहनच्या मृत्यूनंतर वडिलांनी न्यायाची मागणी केली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना रोहनच्या वडिलांचे अश्रू थांबत नव्हते. आपल्या मुलाला न्याय मिळावा अशी मागणी करत […]

अधिक वाचा..
leopard

शिरूर! बिबट्याला शूट करण्याची दिली परवानगी…

शिरूर (सुनिल जिते) : शिरूर तालुक्यातील पिंपरखेड (आंबेवाडी) येथे रविवारी (ता. २) दुपारी बिबट्याच्या हल्ल्यात रोहन विलास बोंबे (वय १३) या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. तातडीची उपाययोजना म्हणून प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी संबंधित बिबट्याला ठार मारण्याची परवानगी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रोहन घराजवळील मोकळ्या शेतात खेळत असताना हत्तीगवतात दबा धरून […]

अधिक वाचा..
rohan-bombe-pimparkhed

शिरूर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात मुलाचा मृत्यू; वीस दिवसांत तिसरी घटना…

शिरूर (सुनिल जिते) : शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे भरदिवसा आज (रविवार) दुपारी पावणे चार वाजण्याच्या सुमारास बिबट्याने रोहन विलास बोंबे (वय १३) या मुलावर हल्ला करत ऊसाच्या शेतात ओढून नेले. या हल्ल्यात मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे पिंपरखेड परिसरात खळबळ उडाली आहे. पिंपरखेड येथे आज दुपारी पावणे चारच्या सुमारास रोहन विलास […]

अधिक वाचा..
bhagubai-jadhav-jambut

शिरूर तालुक्यात बिबट्याचा दहशतीचा कहर कायम; आठ दिवसांत दुसरा बळी…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील बेट भागात बिबट्याचा दहशतवाद दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. अवघ्या आठ दिवसांपूर्वी पिंपरखेड (ता. शिरूर) येथील पाच वर्षीय चिमुरडी शिवन्या बोंबे हिचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा एकदा बिबट्याने मानवी जीव घेतला आहे. जांबुत (ता. शिरूर) येथील थोरातवस्ती येथे बुधवार (दि. २२) रोजी पहाटे सहाच्या सुमारास […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात बिबट्याचा हल्ल्यात वृद्ध महिलेचा मृत्यू

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील इनामगाव (नलगे मळा रोड, कौल वस्ती) येथे आज पहाटेच्या सुमारास घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडवली आहे. लक्ष्मीबाई बबन भोईटे (वय ८२) या वृद्ध महिलेला घराच्या पढवीत झोपलेले असताना बिबट्याने शिकार समजून फरफटत नेले आणि हल्ला करून ठार केले. ही घटना पहाटे साडेचारच्या दरम्यान घडली. सुरुवातीला घरासमोर असलेल्या […]

अधिक वाचा..

अन्नापुरमध्ये दिवसाढवळ्या बिबट्याचा थरार, मेंढपाळाची मेंढी फस्त

सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांची शासनाला घणाघाती मागणी शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील बिबट प्रवण क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मौजे अन्नापुर येथे पुन्हा एकदा बिबट्याने थैमान घातले. १४ एप्रिल २०२५ रोजी सकाळच्या सुमारास मेंढपाळ मोहन दामू चोरमले (वय ५०) आणि त्यांचा मुलगा सोनबा मेंढरे चारत असताना, ऊसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक एक मेंढी […]

अधिक वाचा..

सविंदणे येथे बिबट्याने शेळी व करडूवर हल्ला करून केले ठार 

शिरूर (अरुणकुमार मोटे): सविंदणे (ता. शिरूर) येथे सुरेश ज्ञानेश्वर लंघे यांच्या शेळी आणि करडूवर वाघाने हल्ला करून त्यांना ठार केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा प्रकारच्या हल्ल्यांमुळे जनावरे आणि माणसांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शिरूर तालुक्यात यापूर्वीही वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांचे अनेक प्रकार घडले […]

अधिक वाचा..