उसाच्या शेतात दबा धरुन बसलेल्या बिबट्याचा शेतकऱ्यावर हल्ला…

अहमदनगर: संगमनेर तालुक्यातील खांडगाव शिवारात सकाळी शेतातील ऊसाला पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकर्‍यावर बिबट्याने हल्ला केला. यात परसराम जिजाबा गुंजाळ (वय 43) हे जखमी झाले आहे. परसराम गुंजाळ हे शेतातील ऊसाला पाणी देण्यासाठी गेले होते. ऊसाच्या शेतात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. जखमी परसराम गुंजाळ यांना घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. […]

अधिक वाचा..

करंदीत धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद…

शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता. शिरुर) येथे वारंवार बिबट्याचे जनावरांवर हल्ले तसेच नागरिकांना दर्शन होत असताना नुकताच एका बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना एका बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाच्या पथकाला यश आले आहे. करंदी (ता. शिरुर) येथे वारंवार बिबट्याचे दर्शन होत असताना नागरिकांनी येथे पिंजरा लावण्याची मागणी केली असता शिरुर वनविभागाच्या वतीने येथील राहुल ढोकले […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात शेतात आढळला मृत अवस्थेतील बिबट्या

शिरुर वनविभाग व प्राणीमित्रांनी पंचनामा करत घेतले ताब्यात शिक्रापूर: करंदी (ता. शिरुर) येथील गणपती माळ येथे एका शेतकऱ्याच्या शेतात मृतावस्थेतील बिबट्या आढळून आला असून शिरुर वनविभाग व वन्य पशु पक्षी संरक्षण सामाजिक संस्थेच्या प्राणीमित्रांनी सदर मृत बिबट्याचा पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदन साठी पाठवून दिला आहे. करंदी (ता. शिरुर) येथील गणपती माळ येथे नलिनी वर्पे यांच्या […]

अधिक वाचा..

गुनाट येथे बिबट्याच्या हल्ल्यात दोन मेंढ्या मृत्युमुखी

शिंदोडी (तेजस फडके): गुनाट (ता. शिरुर) येथील चिंचणी-गुनाट रोडवर असणाऱ्या गुणवंतवाडी येथील सोमनाथ दत्तात्रेय गिरमकर या शेतकऱ्याच्या दोन मेंढ्यावर रविवार (दि १७) रोजी पहाटे २:३० च्या सुमारास बिबट्याने हल्ला केल्याने त्या मृत्यूमुखी पडल्या असुन या शेतकऱ्याचे सुमारे २५ हजारांचे नुकसान झाले आहे. चासकमानचा कॅनॉल गुनाट येथुन जात असल्याने गावात जवळपास ८० टक्के उसाचे क्षेत्र झाले […]

अधिक वाचा..

बिबट्याचा बंदोबस्त करा: शेखर पाचूंदकर यांची मागणी

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): शिरुर तालुक्यातील अनेक भागात बिबट्याचा वावर वाढला आहे. त्यात ऊस तोडणी झाल्यामुळे बिबट्याला आश्रयासाठी जागा उरली नसल्याने बिबट्याने त्याचा मोर्चा लोकवस्तीकडे वळविला आहे. शेळ्या, मेंढ्या, कुत्रे, वासरांवर सातत्याने बिबट्या हल्ला करत आहे. आता त्याचा वावर लोकवस्तीकडे वाढल्याने माणसांवर देखील हल्ला करण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी […]

अधिक वाचा..